भडगाव शहरात हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंहजी यांची ४८५ वी जयंती उत्साहात साजरी.!!!
भडगाव प्रतिनिधी:-
भडगाव शहरात हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंहजी यांची ४८५ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि थाटात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती, ज्यामध्ये सजीव (आरास), पारंपरिक वेशभूषा आणि ढोल-ताशांच्या गजरात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
महाराणा प्रतापसिंह चौक येथे झालेल्या कार्यक्रमात महाराजांच्या प्रतिमेची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. याचा मान सुमित पाटील आणि स्व. बापूजी युवा फाउंडेशनचे संस्थापक लखिचंद पाटील यांना देण्यात आला. परिसर घोषणांनी आणि जयजयकारांनी दुमदुमून गेला होता.
या जयंती उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी आर. व्ही. पाटील, गणेश अण्णा परदेशी, गुलाब (अण्णा) पाटील, हाटेसिंग पाटील, गोरखनाथ पाटील, आनंदसिंह राजपूत, झुंबर राजपूत, टिकाराम पाटील, सुनील पाटील (वडधे), बन्सीलाल परदेशी, मुन्ना परदेशी, नवल राजपूत, जयेश राजपूत, यश राजपूत, स्वप्निल परदेशी, जितू राजपूत, विशाल राजपूत, महेंद्रसिंह राजपूत, सूर्यभान राजपूत, चेतन परिहार, प्रकाश पाटील, दर्शन पाटील, विशाल परदेशी, भूषण राजपूत, सरदार पाटील, रूपेश राजपूत, परेश राजपूत व सर्व समाज बांधव यांनी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने पार पडले असून, सामाजिक ऐक्य व वीर महाराजांच्या विचारांची प्रेरणा यामध्ये प्रकर्षाने जाणवली.