लाडकी बहीण योजनेत मोठी फसवणूक,सरकारी महिलांनींच लुटलं अनुदान, सरकार करणार मोठी कारवाई.!!!

0 532

लाडकी बहीण योजनेत मोठी फसवणूक,सरकारी महिलांनींच लुटलं अनुदान, सरकार करणार मोठी कारवाई.!!!

मुंबई:-

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली. यामध्ये पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात.

निवडणुकीपूर्वी सरसकट महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला होता. या योजनेतील महिलांच्या अर्जाची छाननी काही महिन्यांपासून सुरू आहे. यात अनेक गैरप्रकार या योजनेतून समोर आले. एवढंच काय पुरूषांनी देखील बनावट खात्यांच्या बँक खात्याच्या आधारे पैसे घेतल्याचा प्रकार समोर आला होता.

त्यानंतर आता 2,652 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणी योजनेचा गैरफायदा घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. लाडकी बहिणी योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सरकारी कर्मचारी महिलांकडून राज्य सरकार वसुली करणार असल्याची माहिती आहे.

इतक्या सरकारी नोकरीतील महिलांनी घेतला योजनेचा लाभ?

1 लाख 20 हजार सरकारी कर्मचाऱ्यांची तपासणी केल्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे. आणखी 6 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची लाडक्या बहिणीसाठी पडताळणी होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाला 1 लाख 60 हजार सरकारी कर्मचाऱ्यांचा डेटा उपलब्ध करून दिला होता.

या डेटामधील यूआयडी मार्फत चौकशी केल्यानंतर 2,652 महिलांनी लाडकी बहीण योजनांचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. या महिलांनी ऑगस्ट 2024 पासून ते एप्रिल 2025 पर्यंत प्रत्येकी 13 हजार 500 रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्य सरकार आता या महिलांकडून 3 कोटी 58 लाख रुपयांची वसुली करणार असल्याचे सांगितले जात आहे.

नियमात नोंद असतानाही घेतला लाभ

लाडकी बहीण योजनेच्या नियमावलीत सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही असे स्पष्ट असतानाही वर्ग तीन आणि वर्ग चारच्या महिलांनी याचा लाभ घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. तर लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी योजना अशा दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या 7 लाख 70 हजार महिलांचा हप्ता फेब्रुवारीपासून बंद करण्यात आला आहे.

शासनाच्या वतीने होणार थेट कारवाई

राज्य शासनाच्या “लाडकी बहीण” योजनेचा लाभ घेता येणार नाही, हे शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद असतानाही अनेक शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी नियम झुगारून या योजनेचा लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. वर्ग तीन आणि वर्ग चार मधील अनेक महिला कर्मचाऱ्यांनी अर्ज भरून थेट पैसे उचलले, ही गंभीर बाब असून आता शासनाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

शासन करणार वसुली

आता ज्या 2652 कर्मचारी महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे उचलले त्यांच्याकडून आता या रकमेची (3 कोटी 58 लाख रु.) वसुली करण्यात येणार आहेत. प्रत्येक विभागाला त्या बाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून लवकरच सर्व शासकीय विभागांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!