भडगावमध्ये ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढवण्याची मागणी, शेतकरी संतप्त.!!!
भडगावला यंदा ज्वारी खरेदीसाठी फक्त साडे सात हजार क्किंटलचे उद्दीष्ट.उद्दीष्ट वाढविण्याची मागणी.
भडगावमध्ये ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढवण्याची मागणी, शेतकरी संतप्त.!!!
भडगावला यंदा ज्वारी खरेदीसाठी फक्त साडे सात हजार क्किंटलचे उद्दीष्ट.उद्दीष्ट वाढविण्याची मागणी.
भडगाव प्रतिनिधी :-
शासकीय हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत भडगाव शेतकरी सहकारी संघाच्या खरेदी केंद्रात आतापर्यंत एकुण १ हजार ६७ शेतकर्यांचे आनलाईन नाव नोंदणी केलेली आहे. ही आनलाईन नाव नोंदणीची ३१ मे अखेर आहे. दुसरीकडे शेतकर्यांच्या ज्वारी खरेदी करण्याचा विषय वार्यावर आहे. जिल्हा पणन अधिकार्यांचे भडगाव शेतकरी सहकारी संघास ज्वारी मोजणीचे फक्त ७ हजार ५०० क्किंटल पर्यंतच उद्दिष्टाचे पञ प्राप्त झालेले आहे. मग खरेदी केंद्रात आनलाईन नाव नोंदणी केलेल्या उर्वरीत शेतकर्यांनी ज्वारी मोजावी कुठे? मग आमचा शासकीय ज्वारी खरेदी केंद्रात आनलाईन नाव नोंदणी करुन फायदा काय?
असा संतप्त प्रश्न ज्वारी खरेदीसाठी आनलाईन केलेल्या सर्वच शेतकरी वर्गातुन उपस्थित होत आहे. ज्वारी मोजणीचे उद्दीष्ट खरेदी केंद्रास कमी आले आहे. नाव नोंदलेल्या व ज्वारी मोजणीपासुन वंचित राहावे लागणार्या शेतकर्यांवर हा अन्याय होईल. तरी शासनाने भडगाव तालुक्यासाठी ज्वारी खरेदीचे उद्दीष्ट वाढवावे. आनलाईन नाव नोंदणी केलेल्या सर्वच शेतकर्यांची ज्वारी मोजण्यात यावी. अशी मागणी ज्वारी उत्पादक अन आनलाईन नाव नोंदणी केलेल्या शेतकरी वर्गातुन जोर धरीत आहे. तसेच भडगाव शेतकरी सहकारी संघामार्फत भडगाव तहसिलदार शितल सोलाट यांना ज्वारी मोजणीसाठी धान्य गोडाऊन उपलब्ध करुन दयावे.याबाबतचे पञ दि. २२ रोजी देण्यात आले आहे. अशी माहिती भडगाव शेतकरी सहकारी संघाच्या सुञांनी दै. लोकमतशी बोलतांना दिली. तरी तहसिलदारांनी लवकर धान्य गोडाऊन उपलब्ध करुन दयावे. शासकीय खरेदी केंद्रामार्फत ज्वारी खरेदीचा तात्काळ शुभारंभ करावा. अशी मागणीही भडगाव तालुक्यातील ज्वारी उत्पादक शेतकरी वर्गातुन होतांना दिसत आहे.
यावर्षी भडगाव तालुक्यात रब्बी हंगामात ज्वारीचा पेरा २४६० हेक्टर असा मोठा झाला होता. ज्वारी धान्यासोबतच ज्वारीचा चाराही मुबलक पिकला. ज्वारीच्या उत्पन्नासाठी यंदा शेतकर्यांना अच्छे दिन आले.
शासकीय हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत शासनाने ज्वारी खरेदीसाठी एकुण ३३७१ रुपये असा चांगला हमीभाव जाहीर केला आहे. या रब्बी हंगामात भरड धान्य ज्वारी खरेदीसाठी मुदतीत एकुण १ हजार ६७ शेतकर्यांनी आपल्या नावांची नोंदणी ज्वारी खरेदी केंद्रात जाऊन पुर्ण केलेली आहे. भडगाव शेतकरी सहकारी संघास दोन ते तीन दिवसांपुर्वी जिल्हा पणन अधिकार्यांचे ज्वारी खरेदीचे साडेसात हजार क्किंटलचे उद्दीष्ट बाबत पञ प्राप्त झालेले आहे. शासनाने उत्पादकता हेक्टरी १६.९० क्किंटल ठरविलेली आहे.ही उत्पादकता शासनाने कमी दिली असुन उत्पादकता वाढविण्याची मागणी आहे. शासकीय ज्वारी खरेदीसाठी चांगला हमीभाव असुनही आतापर्यंत ज्वारी खरेदी करण्यात आली नाही. आता पाऊसाळा लागलेला आहे. आणि खरीप हंगामाच्या पिक पेरण्यांच्या काळात शासनाकडुन ज्वारी मोजणी करण्यात येईल. अन ज्वारी खरेदीसाठी उद्दीष्ट वाढविण्याची मागणी करण्याची वेळ येते. आनलाईन नाव नोंदणी सुरुवातीला उशीरा सुरु झाली. आनलाईन नोंदणीलाही वेळोवेळी पोर्टल बंदचा अडसर निर्माण झाला त्याचाही ञास शेतकर्यांना सहन करावा लागला. याबाबत शासनाचे नियोजन नसल्याने बहुतांश शेतकर्यांनी शासकीय ज्वारी खरेदी केंद्राकडे शेतकर्यांनी पाठ फिरविल्याचे दिसुन आले. खाजगी व्यापार्यांना वा मार्केटमध्ये ज्वारी मोजणी करुन शेतकरी मोकळे झाले. आणि दुसरीकडे शासकीय ज्वारी खरेदी केंद्राची शासनाच्या उदासीनतेमुळे शेतकर्याच्या ज्वारी मोजणीचा विषय अदयापही वार्यावरच आहे. ही शोकांतीका असल्याचे ज्वारी उत्पादक शेतकरी वर्गातुन बोलले जात आहे. आता तरी शासकीय खरेदी केंद्रासाठी शासनाने तात्काळ ज्वारी खरेदीचे उद्दीष्ट वाढवुन दयावे. तसेच खरेदी केंद्रात ज्वारी खरेदी सुरु करावी. अशी मागणी भडगाव शहरासह तालुक्यातील ज्वारी उत्पादक शेतकरी वर्गातुन होतांना दिसत आहे. भडगाव शेतकरी सहकारी संघाच्या पदाधिकार्यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा. याकडे आमदार किशोर पाटील यांनी लक्ष दयावे अशी अपेक्षा शेतकर्यांना आहे.
प्रतिक्रीया —
भडगाव तालुक्यासाठी जिल्हा पणन अधिकार्यांचे शासकीय ज्वारी खरेदी केंद्रासाठी ७ हजार ५०० क्किंटल मोजणीचे उद्दीष्ट बाबतचे पञ शेतकरी सहकारी संघास प्राप्त झालेले आहे. ज्वारी मोजणीचे उद्दिष्ट वाढवुन मिळावे यासाठी आम्ही संचालक मंडळामार्फत आमदार किशोर पाटील यांच्याकडे मागणी केलेली आहे. तसेच ज्वारी मोजणीसाठी भडगाव तहसिलदारांकडे धान्य गोडाऊनच्या मागणीचे पञही दिलेले आहे. गोडाऊन उपलब्ध झाल्यावर ज्वारी मोजणी सुरु करण्यात येईल.
भैय्यासाहेब पुंडलीक पाटील.
चेअरमन. भडगाव शेतकरी सहकारी संघ.
प्रतिक्रीया —
पंजाब, हरीयाणा राज्यात शासनाकडुन ९० टक्के शेतीमाल हमीभावाने खरेदी केला जातो. याउलट महाराष्टाृत शासनाकडुन हमीभावाने १० टक्केच शेतीमाल खरेदी केला जातो. यावर्षी भडगाव तालुक्यात रब्बी हंगामात ज्वारीचा पेरा सर्वाधीक २४६० हेक्टर क्षेञ होता. ज्वारीचे उत्पन्न मुबलक आकारले. तालुक्याला आनलाईन नाव नोंदणी प्रमाणे तरी २५ हजारांपर्यंत क्किंटल अपेक्षीत होते. माञ शासनाने फक्त ७ हजार ५०० क्किंटल खरेदीचे उद्दीष्ट दिलेले आहे. हे उद्दीष्ट कमी आहे. माञ शासनाने ज्वारी मोजणीचे उद्दीष्ट वाढवावे. तसेच ज्वारी खरेदीची मुदतही वाढवावी. खरेदीची मर्यादा वाढवावी. आनलाईन नाव नोंदणी केलेल्या सर्व शेतकर्यांची ज्वारी मोजणी करावी. शेतकर्यांना न्याय दयावा.
अॅड. विश्वासराव राघो भोसले. ज्वारी उत्पादक शेतकरी. पिंपरखेड. ता. भडगाव. जि. जळगाव.