सावधान! शक्ती चक्रीवादळ घोंगावतंय, कोकणाला झोडपणार;’या’ जिल्ह्यांना रेडअलर्ट.!!!

0 595

सावधान! शक्ती चक्रीवादळ घोंगावतंय, कोकणाला झोडपणार;’या’ जिल्ह्यांना रेडअलर्ट.!!!

मुंबई :-

राज्यात सर्वदूर मान्सूनपूर्व,पावसाने धुमाकूळ  घातला आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या पट्ट्याचे येत्या 36 तासांत चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे.

या चक्रीवादळाला शक्ती असे  नाव देण्यात आले आहे. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असून त्याचा फटका कोकणाला बसणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने  रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.

कोकण किनारपट्टीवर ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील तसेच अतिवृष्टीचाही धोका आहे. त्यामुळे हवामान विभागाने कोकणातील दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच मुंबईसह उर्वरित कोकणाला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसं पाहिलं तर राज्यात मागील पंधरा दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. 20 मे पासून या पावसाचा जोर वाढला आहे. तळकोकणात मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. आताही 27 मेपर्यंत राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आजही मुसळधार पाऊस पुणे, नाशिक, अहिल्यानगरसह 20 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

पुढील तीन दिवसांत पावसााच जोर कायम राहणार असून 15 ठिकाणी जोरदार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सध्या राज्यात सर्वत्र पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने घरांचे नुकसान झाले आहे. जनावरेही दगावली आहेत.

पुणे, नाशिकसह 20 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

हवामान विभागाने आज मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट दिले आहे. या भागात पुढील 48 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील कमी क्षेत्राच्या तीव्रतेमुळे राज्यात पूर्वमाोसमी वारे वाहत असल्याने राज्यातील अनेक भागात सध्या मुसळधार ते अतिमुसधार पाऊस होत आहे.

तर दुसरीकडे आज पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. तर नांदेड, यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्यात आज वादळी पावसाचा अंदाज असल्याने या जिल्ह्यांसाठी देखील हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!