अवैध वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर पलटी: ३५ वर्षीय चालकाचा मृत्यू.!!!

0 1,423

अवैध वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर पलटी: ३५ वर्षीय चालकाचा मृत्यू.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव तालुक्यातील वाक गावाजवळील गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करत असताना ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १७ मेच्या मध्यरात्री घडली.

मृत चालकाचे नाव रामदास सुभाष सोनवणे (वय ३५, रा. पेठ, भडगाव) असे असून, ट्रॅक्टरचे टायर अचानक फुटल्याने त्याने उडी मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रॅक्टर त्याच्या अंगावर पलटी झाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ भडगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेची नोंद भडगाव पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील करीत आहेत.

गिरणा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर प्रशासनाकडून ठोस कारवाई होणे आवश्यक असल्याचे या घटनेवरून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!