भडगाव पाणी पुरवठा योजनेची जिल्हाधिकार्यांनी भेट देऊन केली पहाणी.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
शहरासाठी १३३ कोटी २७ लाखांची पाणी पुरवठा योजना मंजुर झाली आहे. आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्न व निधीतुन या योजनेचे कामे सुरु आहेत.
या योजनेच्या कामांची पाहणी दि. १७ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पाचोरा भडगाव आमदार किशोर पाटील यांनी भेट दिली. गिरणा नदीपाञातील पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली.
यावेळी
भडगाव नगर परीषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रविंद्र लांडे, नगर परीषदेचे शहर अभियंता गणेश लाड, भैय्यासाहेब पाटील, आरोग्य निरीक्षक निशा लोट आदि कर्मचारी उपस्थित होते.