कासोदा येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न.!!!
एरंडोल प्रतिनिधी :-
आज दि.16/05/2025 शुक्रवार महेश मंदिर/स्वामी समर्थ केंद्र येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
आयोजकांच्या तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांनी मेहनत घेऊन 104 बॅग रक्तदान कासोदा ग्रामस्थांनी केले.निलेश अग्रवाल,शैलेश पांडे,प्रमोद पाटील,राहुल सोनवणे(पोलीस), राहुल ई.मराठे,भास्कर भाऊ चौधरी,अक्षय पवार,कृष्णा पुरोहित,वनकोठे ग्रा प सदस्य राहुल चौधरी,समाधान चौधरी सर्व आयोजकांनी आज सकाळ पासून मेहनत घेऊन रेड क्रॉस रक्त पेढीला शंभरी पार करून तब्बल 104 बॅग रक्तदान करून घेतलं.
रेड क्रॉस रक्त पिढी कडून डॉ.शंकरलाल सोनवणे, मंत्रालयातील रिटायर्ड सचिव व रेड क्रॉसच्या डायरेक्टर अडव्होकेट मंगला ठोंबरे व त्यांचे सहकारी संजय साळुंखे,उज्ज्वला वर्मा,सिमा शिंदे,मंगेश पाठक, राजेंद्र कोळी यांनी देखील दिवसभर मेहनत घेतली.