शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
१५ मे, रोजी सायं. ७.३०
भडगाव शहरातील यशवंत नगर भागात एक हृदयद्रावक घटना घडली. रोजंदारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या.तौफिक अफजल मन्यार यांच्या झोपडीवजा घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले.
आगीत घरातील टीव्ही, फ्रिज, कुलर, कपाट, शोकेस यांसारखे गृहोपयोगी साहित्य तसेच मुलीच्या लग्नाकरिता जमवलेले सर्व साहित्य राखरांगोळी झाले. घटनेच्या वेळी अफजल मन्यार आणि त्यांचा मुलगा तौफिक हे कामावर होते, तर हमीदा बी व त्यांची मुलगी घराबाहेर असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अग्निशमन दलाच्या पाचारणानंतर आग आटोक्यात आली, पण तोपर्यंत संपूर्ण घर खाक झाले होते. प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा केला असून कुटुंबाला तातडीची मदत मिळावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.या संकटात समाजाने आणि प्रशासनाने पुढाकार घेऊन या कुटुंबाला आधार द्यावा, ही काळाची गरज आहे.