हिंदू बहीण उषा ताई मोरे जळाली असता मुस्लिम बंधू फारूक शेख यांनी दाखवली माणुसकी.!!!

अनिल सोनवणे यांनी एस. एम.या व्हॉट्सअप ग्रुप द्वारे आर्थिक मदतीचे आवाहन केले होते.

0 101

हिंदू बहीण उषा ताई मोरे जळाली असता मुस्लिम बंधू फारूक शेख यांनी दाखवली माणुसकी.!!!

 

अनिल सोनवणे यांनी एस. एम.या व्हॉट्सअप ग्रुप द्वारे आर्थिक मदतीचे आवाहन केले होते.

जळगांव प्रतिनिधी :-

अलिकडेच एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे, ज्यामध्ये जळगाव मुस्लिम मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी आमची एक हिंदू बहीण उषा ताई मोरे, जी रामेश्वर कॉलनीतील रेणुका नगरमध्ये राहते. त्यांना हॉस्पिटल मध्ये जाऊन आर्थिक मदत केल्या बद्द्ल शेख यांनी मानवतेचे एक अद्वितीय उदाहरण सादर केले आहे.

हिंदू भगिनी उषा मोरे तिच्याच घरात आगीत भाजली आणि तिला रुग्णालयात नेण्यात आले, तेव्हा तिच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा आम्ही

एस. एम.या व्हॉट्सअप ग्रुप द्वारे आर्थिक मदतीचे आवाहन केले होते.

हे आवाहन पाहून फारुख शेख हे स्वतः त्यांच्या साथीदारांसह रुग्णालयात गेले आणि आमच्या हिंदू बहिणीच्या तब्येतीची विचारपूस केली आणि तिची मुलगी आरतीला धीर दिला आणि तिला ५ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

रुग्णालय चे संचालक आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मिनाज पटेल यांच्याशीही ते बोलले आणि रुग्णाला तातडीने वैद्यकीय मदत दिल्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानले.

 

या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की धर्म आणि जातीच्या वर उठून मानवतेची भावना सर्वात महत्वाची आहे. ही घटना आपल्याला शिकवते की कठीण काळात एकमेकांना मदत करणे आणि माणुसकी दाखवणे हे आपले कर्तव्य आहे.

सामाजिक एकतेचा संदेश

अशा घटना समाजात एकता आणि सौहार्दाचा संदेश देतात. हे आपल्याला आठवण करून देते की आपण सर्व एकाच मानवी कुटुंबाचा भाग आहोत आणि आपल्याला एकमेकांबद्दल सहानुभूती आणि सहकार्य असले पाहिजे.

कृतज्ञता आणि कौतुक

मुस्लिम मनियार बिरादरी आणि फारुख भाई यांच्या मानवतेचे तसेच या कठीण काळात त्यांच्या हिंदू बहिणीला मदत करणाऱ्या डॉ. मिनाज पटेल साहेबांच्या सेवेचे आम्ही कौतुक करतो.

त्यांच्या या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला आहे आणि आम्हाला आजूबाजूच्या लोकांना मदत करण्यासाठी पुढे येण्याची प्रेरणा मिळाली आहे.

जखमी उषा ताई मोरे यांच्या जवळ उभी त्यांची मुलगी सौ आरतीला धनादेश देताना फारुक शेख, सोबत डॉ मीनाझ पटेल, इकबाल शेख सर आदी दिसत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!