वयोवृद्धांच्या साहित्या करिता तपासणी शिबिराचे आयोजन.!!!

0 1,089

वयोवृद्धांच्या साहित्या करिता तपासणी शिबिराचे आयोजन.!!!

जळगांव प्रतिनिधी :-

सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाज सेवक यांना कळवण्यात येते की, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत व माननीय खासदार श्रीमती स्मिता ताई वाघ यांच्या प्रयत्नाने जळगाव मतदार संघातील वयोवृद्ध व्यक्तींना सहाय्यक साहित्य उपलब्ध करुन दिले जाणार आहे. सदर शिबिरात व्हील चेअर, कर्णयंत्रे, कमोड चेअर, कमरेचे पट्टे, वॉकर, चष्मे, कृत्रिम दात असे १५ प्रकाराचे साहित्य मोफत वाटप केले जाणार आहे.

सदर साहित्य वाटप पूर्वी पात्र लाभार्थ्यांची तपासणी व नाव नोंदणी करिता खालील प्रमाणे तपासणी व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

दिनांक ८ मे, जळगाव शहर व ग्रामीण भाग, शिबिराचे ठिकाण: जिल्हा रुग्णालय, जळगाव DEIC केंद्र परिसर

दिनांक ९ मे, ग्रामीण रुग्णालय, एरंडोल

दिनांक १० मे, ग्रामीण रुग्णालय, पारोळा

दिनांक १२ मे, ग्रामीण रुग्णालय अमळनेर

दिनांक १३ मे, ग्रामीण रुग्णालय धरणगाव.

दिनांक १४ मे, ग्रामीण रुग्णालय पाचोरा

दिनांक १५ मे, ग्रामीण रुग्णालय भडगाव.

दिनांक १६ मे, ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव

सर्व तालुक्यातील शिबिराचे वेळ ही सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत असणार आहे

तरी तालुक्याच्या ठिकाणी आयोजित शिबिरास आपल्या परिवारातील, परिसरातील, परिचयातील ६० वर्षा पेक्षा अधिक वयोवृद्ध व्यक्ती ज्यांना साहित्याची गरज आहे अशा व्यक्तींनी शिबिरास उपस्थित राहण्या बाबत कळविण्यात यावे. शिबिरास येताना ओरिजनल आधार कार्ड व रेशन कार्ड आणि त्याच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.

तरी सदर शिबिराचा गरजू व्यक्तींनी लाभ घ्यावा असे आवाहन माननीय खासदार श्रीमती स्मिता ताई वाघ यांच्या वतीने करण्यात येत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!