कजगाव ग्रामपंचायत सदस्य महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण कार्यक्रमास गैरहजर

0 132

कजगाव ग्रामपंचायत सदस्य महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण कार्यक्रमास गैरहजर

 अमीन पिंजारी भडगाव ता. प्रतिनिधी :-

कजगाव तालुका भडगाव एक मे हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून ओळखला जातो, या दिवशी सर्व शासकीय कार्यालय, महाविद्यालय, ग्रामपंचायत, अशा विविध ठिकाणी ध्वजारोहण करून विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात, एक मे हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासाचा अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्याने सर्व शासकीय कर्मचारी अधिकारी हा दिवस आपल्या कार्यालयात साजरा करत असतात, तसेच कजगाव ग्रामपंचायत येथे लोकनियुक्त सरपंच रघुनाथ विठ्ठल महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला, मात्र या कार्यक्रमाला एकही ग्रामपंचायत सदस्य गैरहजर असल्याने चर्चेला उधाण आले आहे तरी या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती चौकशी करावी अशी मागणी कजगाव परिसरातून होत आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा