अँग्लो उर्दू हायस्कूल, येथे महाराष्ट्र दिन (कामगार दिन) मोठ्या उत्साहात साजरा.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
राही मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संचालकांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
श्री. जमाल कासार यांनी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणि वाचनालयाची व्यवस्था करण्याची घोषणा केली आहे या मुळे निश्चितच विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी मदत मिळेल. रंग उत्सव सेलिब्रेशन संस्थेने घेतलेल्या सहभागामुळे कार्यक्रमात आणखी रंगत आली आणि स्पर्धा परीक्षांमधील सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा उत्साह वाढवण्यात आला.
अँग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. नाजीम बेग मिर्झा यांनी शाळेचा निकाल १००% लागेल, असा विश्वास व्यक्त करणे हे त्यांच्या कठोर मेहनत आणि विद्यार्थ्यांवरील त्यांच्या विश्वासाचे प्रतीक आहे.
एकंदरीत, अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला, या वेळी मा.नगरसेवक शरीफ शेठ,
राही मल्टीपर्पज फाउंडेशन चे संचालक दानिश आलम शेख,मुजम्मील युसुफ मणियार,जमाल कासार, अबरार मिर्झा,सामाजिक कार्यकर्ते इकबाल मणियार, व पालक असंख्य संख्येने उपस्थित होते,
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अजीमुद्दीन शेख सर, अश्फाक कुरेशी सर, रहीम बागवान, अजहर शेख अब्दुल कादिर खान, रिजवान खान सर, अश्फाक पिंजारी,शगुफ्ता खान मॅडम, शगुफ्ता शेख मॅडम,इसाक मलिक, मुक्तार मिर्झा नदीम शेख, आदींनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन अश्फाक कुरेशी यांनी केले कार्यक्रमाचे आभार अजहर शेख, यांनी मानले