जळगाव जिल्ह्यातील भडगाव आणि चाळीसगावच्या खेळाडूंचे राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत नेत्रदीपक यश.!!!
जळगाव जिल्ह्यातील भडगाव आणि चाळीसगावच्या खेळाडूंचे राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत नेत्रदीपक यश.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
लातूर येथे २५ आणि २६ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील भडगाव आणि चाळीसगावच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत तालुक्याचं नाव रोशन केलं आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, ज्यात मुंबई, पुणे, लातूर, रायगड यांसारख्या प्रमुख जिल्ह्यांचा समावेश होता.
भडगाव तालुक्यातून सहभागी झालेल्या ७ विद्यार्थ्यांपैकी प्रतिक सतिष दाभाडे याने सुवर्ण पदक पटकावले, तर सचिन नाना पाटील याने प्रो फाईटमध्ये सुवर्ण पदकासह मानाचा टायटल बेल्ट आपल्या नावे केला. हर्ष सिद्धार्थ पाटील आणि अनुष्का नितीन महाजन यांनी रौप्य पदकांची कमाई केली.
चाळीसगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अलिजा मजहर शेख आणि आलिया अतिक खान यांनी रौप्य पदक जिंकले, तर आसीम मोसिन खान याने कास्य पदक मिळवले. विशेष म्हणजे, आलिया अतिक खान हिने प्रो फाईटमध्ये सुवर्ण पदकासह टायटल बेल्ट जिंकून दुहेरी यश संपादन केले.
या यशस्वी खेळाडूंचे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
या स्पर्धेत आयन अतिक खान यांनी पंच म्हणून काम पाहिले, तर शाहरुख नजीर मण्यार यांनी खेळाडूंना कोच म्हणून मार्गदर्शन केले.
या खेळाडूंना जळगाव जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशन भडगाव जिल्हा अध्यक्ष श्री. हाजी जकिर कुरेशी, उपाध्यक्ष शाम पाटील आणि संस्थेचे इतर पदाधिकारी डॉ. वसीम मिर्झा, सौरभ पाटील, संतोष पाटील, सौरभ देशमुख, अजगर खान, हाजी खलील शेख, युनुस अली सैयद आणि प्रशिक्षक अबरार खान यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
आता पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. या पुढील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी या खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा.!