पहेलगाम येथे निष्पाप नागरिकांवर अतिरेक्यांचा गोळीबार* पाचोरा तालुका शिवसेनेने पुतळा जाळून केला निषेध.!!!
पहेलगाम येथे निष्पाप नागरिकांवर अतिरेक्यांचा गोळीबार* पाचोरा तालुका शिवसेनेने पुतळा जाळून केला निषेध.!!!
पाचोरा प्रतिनिधी :-
देशाचा अविभाज्य अंग असलेल्या काश्मीर येथे गेल्या काही दशकांपासून सुरू असलेल्या दहशतवादाचा केंद्र सरकारने बीमोड करून या राज्यात शांतता प्रस्थापित केली होती. काश्मीर ची शांतता आणि प्रगती शत्रूराष्ट्र पाकिस्तानला सहन होत नसल्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या काश्मीर खोऱ्यात दहशत आणि जनतेत भीती निर्माण करण्याचे काम पाकिस्तान दहशतवादी संघटनांना घेऊन करीत आहे. दि.२२ रोजी काश्मीरला फिरायला आलेल्या देशाच्या विविध राज्यातील पर्यटकांवर टीआरएफ या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी निष्पाप भारतीय नागरिकांवर पहेलगाम येथे केलेल्या अमानुष गोळीबारात ६ महाराष्ट्रातील, अन्य राज्यातील आणि स्थानिक दोन काश्मिरी नागरिक मिळून २७ जणांना ठार क्रूरतेने ठार केले, तर अनेक जण जखमी झाले. अतिरेक्यांच्या या कृत्या मागे पाकिस्तानी लष्कर आणि राज्यकर्त्यांचा हात असल्याचे निष्पन्न झाले असून देशात आणि विदेशात देखील या घटनेचा आक्रोश आणि संतापाची लाट उसळली आहे . केंद्र सरकारने दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला कायमचा धडा शिकवावा आणि निष्पाप नागरिकांच्या हत्येचा बदला घ्यावा अश्या संतप्त जनभावना असून देशात सर्वत्र पाकिस्तानचा विविध स्तरावर निषेध केला जात आहे. पहेलगाम घटनेचा पाचोरा शहर व तालुका शिवसेने तर्फे दि.२४ गुरुवार रोजी सकाळी साडे अकरा वाजे सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात पहेलगाम येथे क्रूर अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात ठार आलेल्या भारतीय हिंदू नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देत पाकिस्तानचा प्रतीकात्मक पुतळा जाळला आणि तहसीलदार कार्यालयात निषेधाचे निवेदन दिले.
या प्रसंगी हिंदू, मुस्लिम, सर्व समाजाचे शिवसेना कार्यकर्ते सह उपजिल्हा प्रमुख किशोर बारवकर माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, बंडू चौधरी, सुनील रंगराव पाटील, युवासेना शहर प्रमुखप्रमुख अनिल (टिल्लू) पाटील, उपप्रमुख शाकीर बागवान, तुळशीदास मोरे, संदीप राजे, जितेंद्र पेंढारकर, किशोर पाटील, गोविंद देवरे चेतन पाटील ,ध्यानेश्वर सोनार, छोटू चौधरी, अल्ताफ शेख, मोहित राजपूत, ॲड दीपक बोरसे, अमोल पाटील, मयुर महाजन , प्रदीप वाघ, विशाल राजपूत, मुन्ना चौधरी, कोमल पाटील , महिला शहर प्रमुख सौ.मंदाकिनी पारोचे,सौ. जया पवार, सईद शाबिर शेख, गणेश चौधरी, नरेश पाटील, सतीश चौधरी, अशोक निंबाळकर, विजय भोई , अल्ताफ जाकीर पठाण आदीं पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते