पतीने YouTuber पत्नीला प्रियकरासह नको त्या अवस्थेत पाहिलं.नंतर पुढचे 3 दिवस नाल्यात. अख्खंगाव हादरलं.!!!
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रवीना आणि सुरेश जवळपास दीड वर्षांपूर्वी इंस्टाग्रामच्या
माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले होते. यानंतर त्यांनी एकत्र व्हिडीओ बनवण्यासही सुरुवात केली. रवीनाच्या
सोशल मीडियाच्या व्यसनामुळे तिचं आणि पतीचं अनेकदा भांडण होत असे
पतीला रवीनाचे सुरेशसोबत विवाहबाह्य संबंध आहेत असा संशयही आला होता.
25 मार्च रोजी प्रवीण घरी आला आणि आपली भीती अखेर खरी ठरल्याचं पाहून त्याला धक्का बसला. त्याने रवीना आणि सुरेशला नको त्या अवस्थेत पाहिलं. यानंतर त्याचा पारा चढला. दोघांमध्ये मोठा वादही झाला. अखेर रवीनाने तिच्या दुपट्ट्याने प्रवीणचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे.
हत्या केल्यानंतर रवीनाने रात्र होण्याची वाट पाहिली. नंतर दोघांनी प्रवीणचा मृतदेह दुचाकीवर नेला आणि सुमारे 6 किमी अंतरावर असलेल्या नाल्यात फेकला. तीन दिवसांनंतर, प्रवीणचा कुजलेला मृतदेह नाल्यात सापडला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजवरून रवीनाचे सुरेशशी प्रेमसंबंध असल्याचं आणि ही हत्या त्यांनीच केल्याचं उघड झालं.
सोशल मीडियाचं व्यसन
रविनाचे इंस्टाग्रामवर 34 हजारांहून अधिक फॉलोअर्स आणि यूट्यूब चॅनेलवर 5 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. हे व्हिडिओ बहुतेक विनोदी आणि कौटुंबिक मुद्द्यांवर आधारित आहेत. आश्चर्य म्हणजे हेच व्हिडिओ तिला तिच्या खऱ्या कुटुंबापासून दूर नेत होते.
रविनाचं लग्न प्रवीणसोबत (35) झालं होते आणि त्यांना सहा वर्षांचा मुलगा आहे. ती अनेकदा शूटिंगसाठी प्रवास करत असे आणि कंटेंट बनवण्यात व्यस्त असे. प्रवीण आणि कुटुंबातील इतरांनी यावर आक्षेप घेतला होता आणि यावरुन वारंवार वाद होत होते, पण ती ऐकत नव्हती.
धक्कादायक खुलासा
सुरेशने पोलिसांना सांगितलं की, रवीना शूटिंगसाठी बाहेर होती आणि 25 मार्च रोजी भिवानीच्या प्रेमनगर येथील प्रवीणच्या घरी परतली. सुरेश तिला तिथे भेटला आणि दोघेही शारिरीक संबंध ठेवत असताना प्रवीणने त्यांना पाहिलं. त्यानंतर झालेल्या भांडणात त्याचा गळा दाबून मृत्यू खून करण्यात आला. रवीनाने दिवसभर सर्व काही सामान्य असल्याचं भासवले. नातेवाईकांनी प्रवीण कुठे आहे असं विचारले तिने आपल्याला काही माहिती नसल्याचं सांगितलं. ती रात्रीची वाट पाहत होती, सुरेश त्याच्या बाईकवरून आला आणि दोघेही मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी निघून गेले.
सीसीटीव्हीतून खुलासा
26 मार्च रोजी पहाटे 12.30 च्या सुमारास, रविना आणि सुरेश यांनी प्रवीणचा मृतदेह दुचाकीवर सुमारे 6 किमी अंतरावर असलेल्या नाल्यात टाकला. त्यांनी मृतदेह नाल्यात फेकून दिला आणि परत आले. तीन दिवसांनंतर, पोलिसांना नाल्यातून प्रवीणचा कुजलेला मृतदेह सापडला आणि त्यानंतर तपास सुरू झाला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुचाकीवर तीन जण असल्याचे दिसून आले, परंतु जेव्हा दुचाकी परत आली तेव्हा त्यापैकी एक जण बेपत्ता होता. पोलिसांनी दुचाकीस्वारांची ओळख पटवली आणि रविना आणि सुरेश यांची चौकशी केली. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे.