अचानक लागलेली आग विझवताना बत्तीस वर्षीय युवकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू.!!!
एरंडोल प्रतिनिधी:-
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या मंडपास अचानक लागलेली आग विझवताना बत्तीस वर्षीय युवकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू
झाल्याची घटना आज मध्यरात्रीच्या सुमारास महात्मा फुले पुतळ्याजवळ
घडली.विजेचा शॉक लागून युवक सहका-याचा मृत्यू झाल्याने आज महात्मा फुले
यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.
याबाबत माहिती अशी,की शहरातील महात्मा फुले पुतळ्याजवळ महात्मा फुले.यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.महात्मा फुले युवा क्रांती मंचच्या पदाधिका-यांसह विविध संघटनांचे
पदाधिकारी व आयोजन समितीचे सदस्य कार्यक्रमाची पूर्वतयारी व नियोजन करीत
होते.कार्यक्रमानिमित्त पुतळा परिसरात मंडप उभारण्यात आला होता. मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास मंडपास अचानक आग लागल्यामुळे घटनास्थळी.उपस्थित असलेल्या युवकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.मंडपाला लागलेली
आग विझवत असतांना पंकज गोरख महाजन (वय-३२) याचा विजेच्या खांबास स्पर्श.झाल्याने तो खाली पडला.पंकज महाजन याचा चुलत महाजन विजय महाजन यांचेसह कुणाल महाजन,राहुल महाजन,सचिन महाजन,भरत महाजन यांनी पंकज यास ग्रामीण
रुग्णालयात नेले असता तो मयत झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.याबाबत विजय महाजन यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्थानकात
अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार विलास पाटील तपास करीत आहेत.दरम्यान जयंती
उत्सव कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेणा-या युवा सहका-याचा अचानक मृत्यू.झाल्याने महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम.रद्द करण्यात आले.जय बाबाजी परिवाराच्या माध्यमातून पंकजने अनेक युवकांना
व्यसनमुक्त केले आहे.मयत पंकज महाजन याचे पच्छात आई,वडील,पत्नी व तीन.अल्पवयीन मुली असा परिवार आहे.त्याचेवर सकाळी शोकाकुल वातावरणात.अंत्यसंस्कार करण्यात आले.