अंतुर्ली बुद्रुक ग्रामपंचायतीसह शेतकर्यांचे अतिवृष्टी अनुदानाबाबत भडगाव तहसिलदारांना निवेदन.!!!
भडगाव प्रतिनिधी:-
आक्टोबर २०२४ या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीचे अनुदाना बाबतच्या तक्रारींचे निवेदन भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुद्रुक येथील ग्रामपंचायतीसह शेतकर्यांच्या सहयांचे निवेदन भडगाव तहसिलदार शितल सोलाट यांना दि. ७ रोजी दिलेले आहे. याबाबत अंतुर्ली बुद्रुक येथील संतप्त शेतकर्यांचे शिष्टमंडळ तहसिलदार शितल सोलाट यांना भेटुन अतिवृष्टीच्या यादीत आमच्या गावाच्या बहुतांश लोकांचे यादीतील नावे चुकीचे असल्याने आम्हाला अनुदान मिळण्यास अडचणी आहेत. तरी या अतिवृष्टीच्या अनुदानाच्या यादीत दुरुस्ती करुन अनुदान मिळण्याची मागणी मांडली आहे. यावेळी या शेतकर्यांसोबत चुडामण जयवंतराव पाटील हे ही उपस्थित होते.
भडगाव तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात नमुद केलेले आहे कि, अंतुर्ली बुद्रुक येथील आक्टोबर २०२४ या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले होते. पिक नुकसानीचे पंचनामेही प्रशासनाने केलेले होते. अनुदानाची पहिल्या टप्याची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. माञ या यादीमध्ये शेतकर्यांचे आधारकार्ड नंबर व मोबाईल नंबर तसेच खाते नंबर , आय एफ सी संपुर्ण यादीमध्ये ९० ते ९५ टक्के शेतकर्यांची माहिती चुकीची आहे. त्यामुळे शेतकर्यांचे आधार प्रामाणीकरण, केवायसी करण्यास अडचण निर्माण होत आहे.
तरी या अडचणी बाबत तलाठी अंतुर्ली बुद्रुक यांना विचारले असता ते उडवा उडवीचे उत्तरे देतात. तरी या यादीचे निवारण करुन यादी दुरुस्त करण्यात यावी. असेही शेवटी निवेदनात म्हटलेले आहे. आम्हाला या अतिवृष्टीच्या अनुदानाचा लाभ लवकर मिळेल अशी आशा या शेतकर्यांना आहे.
या निवेदनावर अंतुर्ली बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच सखुबाई चंद्रभान बनकर , ग्रामपंचायत सदस्य मनोज प्रकाश पाटील तसेच रविंद्र शामराव पाटील, प्रदिप जयवंतराव पाटील, मनिष शिवाजी पाटील, संतोष भगवान पाटील, सुरेखा संतोष पाटील, मिनाबाई भरत पाटील, विजयाबाई नथ्थु पाटील, ज्योती रामचंद्र पाटील, भास्कर पांडुरंग पाटील, मंगलाबाई सुरेश पाटील, भगवान हेमराज पाटील, धनसिंग हेमराज पाटील, अर्जुन संपत पाटील, आनंदा अशोक पाटील, गोरख भिमराव पाटील, अनिता मनोज पाटील आदि शेतकर्यांच्या सहया आहेत.