वाडे येथे दहावीच्या माजी विदयार्थ्यांचे रंगले स्नेह संमेलन. २८ वर्षानंतर भरली बाल मिञांची शाळा. आठवणींना मिळाला उजाळा.!!!
वाडे येथे दहावीच्या माजी विदयार्थ्यांचे रंगले स्नेह संमेलन. २८ वर्षानंतर भरली बाल मिञांची शाळा. आठवणींना मिळाला उजाळा.!!!
भडगाव प्रतिनिधी : —
तालुक्यातील वाडे येथील सन १९९६, १९९७ या वर्षाच्या इयत्ता दहावीच्या वर्गाच्या बॅचचे स्नेह संमेलनाचा कार्यक्रम नुकताच वाडे येथुन जवळच असलेल्या तिर्थश्रेञ ऋषीपांथा देवस्थानावर निसर्गाच्या रम्य परीसरात आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य एस एस पाटील हे होते. यावेळी माजी विदयार्थ्यांनी गुरुजनांचा सत्कार केला. याकार्यक्रमात विदयार्थी मिञ, मैञिणींचा परीचय होत शाळेतील बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. आणि तब्बल २८ वर्षानंतर बालमिञ व मैञिणी एकञ आल्याचा आनंद काही औरच दिसुन आला. या कार्यक्रमात जवळपास ५५ विदयार्थी, विदयार्थीनींचा सहभाग होता. या कार्यक्रमानिमित्त शिक्षकांच्या उपस्थितीत ही बालमिञांची जणु शाळाच भरल्याचे आनंददायी चिञ दिसुन आले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक भरत चौधरी यांनी केले. यावेळी व्यासपिठावर माजी प्राचार्य एस एस पाटील, पी. आर. माळी. रमेश महाले, जिजाबाई महाले, एन सी माळी, अनंतराव अहिरराव, शिवाजी पाटील, पञकार अशोक परदेशी, वाडे माध्यमिक विदयालयाचे मुख्याध्यापक एन एस बोरसे, गसचे संचालक सुनिल पाटील, पञकार तथा ईशान ट्रेडसे संचालक सुनिल पाटील आदि गुरुजन वर्गाची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमाचे सुञसंचलन गसचे माजी संचालक सुनिल पाटील यांनी केले. सुरुवातीस सरस्वती मातेचे पुजन व माल्यार्पण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. तसेच विदयार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा सत्कारही केला.
यानंतर उपस्थित सर्व बाल मिञ व मैञिणींनी आपला परीचय करुन दिला. परीचय करुन देतांना बालपणाच्या
आठवणी विदयार्थ्यांनी मांडल्या. आणि एकच हास्याचे फवारे उडाल्याचे दिसुन आले.
तसेच रविंद्र तुकाराम महाजन याचेसह इतर विदयार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर पी. आर. माळी, एस. एस. पाटील यांनी मनोगतातुन सांगीतले कि, तुम्ही बालपणी अभ्यासाचे जे धडे घेतले त्यामुळेच आज आपण विविध क्षेञात यश मिळवुन प्रगती केलेली आहे.
असे सांगत विदयार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्याही गुरुजनांनी दिल्या. या कार्यक्रमाचे सुञसंचलन गसचे माजी संचालक सुनिल निंबा पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजन दहावीचे माजी विदयार्थी गुलाब पाटील, भिमसिंग परदेशी, भरत चौधरी यांचेसह मिञ परीवारांनी केले होते. उपस्थितांचे आभार पञकार सुनिल भाऊराव पाटील यांनी मानले. कार्यक्रमास दहावीच्या माजी विदयार्थ्यांसह परीवारातील सदस्यही मोठया संख्येने हजर होते. कार्यक्रम यशस्विततेसाठी दहावीच्या सर्व विदयार्थी, विदयार्थीनींनी अनमोल परीश्रम घेतले.