भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव कजगाव येथे उत्सवात साजरा.!!!
भडगाव ता.प्रतिनिधी :- आमीन पिंजारी
कजगाव ता.भडगाव येथे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उस्तवात साजरा करण्यात आला प्रसंगी संपुर्ण समाज बांधव यात सहभागी झाले होते प्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यात अनेकांनी रक्तदान केले येथे दरवर्षीप्रमाणे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव मोठया उस्तवात साजरा करण्यात आला येथील महावीर नगर जैन स्थानका पासुन
सजविलेल्या ट्रकटर मधुन भगवान महावीराच्या प्रतिमेच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली महावीर नगर, कजगाव भडगाव मार्ग,नागद मार्गा वरून मराठी शाळा भागातील जैन स्थानकात हि मिरवणुक पोहचल्या नंतर या ठीकाणी नवकार महामंत्र चा जाप केल्या नंतर कल्याणमल धाडीवाल यांनी मांगलिक दिल्या नंतर या ठिकाणी
उद्योजक प्रकाशचंद,महेंद्रकुमार हिरण यांच्या तर्फे लिंबु शरबत वाटप करण्यात आले पुढे मार्गस्थ झालेल्या मिरवणुकीत विरेंद्रकुमार,दिनेशकुमार हिरण यांचे तर्फे दुध कोल्ड्रिक वाटप करण्यात आले या नंतर मिरवणुक पुन्हा नागद मार्ग,
कजगाव बस स्थानक चौक,स्टेशन रोड वरून महावीर नगर जैन स्थानकात पोहचल्या नंतर विविध धार्मिक कार्यक्रम, लहान मुलाच्या नाटिका व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या साऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन धाडीवाल यांनी केले प्रसंगी समाज बांधव, महिला,युवक, युवती हे मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रम चा समारोप कमलाबाई हिरण यांच्या मांगलिक ने झाला मिरवणुक मार्गावर छोटुलाल इंदरचंदजी खिवंसरा यांचे तर्फे थंड पेयांची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रम नंतर समाजाच्या व जिवन सुरभी ब्लड बँक चाळीसगाव च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते
दिप प्रजवंलन करून करण्यात आले यात अनेकांनी रक्तदान केले या नंतर येथील समाजाचे सदस्य उद्योजक नितीनकुमार धाडीवाल यांचे तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .