रंगोत्सव चित्रकला स्पर्धेत एच बी ए इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव शहरातील एच बी ए इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूलमध्ये रंगोत्सव चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना नुकतेच पारितोषिके प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मुख्याध्यापक मुजम्मील शेख होते. शिक्षिका विद्या सोनजे, तहसीन खान, मुस्कान शेख आणि आजीमीन शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेत विविध गटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. मोठ्या गटातील ‘अमृता शेरगिल अवॉर्ड’ शेख नाजनीन लुकमान हिने पटकावले. ‘इस्पेक्टा कुलर’ दुसरे पारितोषिक अलींना अलीम बेग मिर्झा आणि अंशरा कादीर शेख यांना विभागून देण्यात आले. आंतरराष्ट्रीय पारितोषिके कासार आदिल जमालोद्दीन, पठाण अमन खान असलम खान, नजीबुल अरसलान, इमरान आसिफ, झुबिया अलीम बेग मिर्झा, मिर्झा उबेद शोहेब, मरियम अशफाक मन्यार आणि खान अवलिंन फिरुज यांनी मिळवली. अलीनाला तिच्या उत्कृष्ट चित्रासाठी पारितोषिकासह गिटार देऊन विशेष सन्मानित करण्यात आले.
लहान गटात ‘एम एफ हुसेन अवॉर्ड’ जुबेदा शेख इमरान हिने जिंकले. ‘इस्पेक्टा कुलर’ बक्षीस मन्यार मोहम्मद गफ्फार आणि उमुलवरा इम्तियाज खान यांना मिळाले. आंतरराष्ट्रीय पारितोषिके शेख रिफा तोहसिफ, अज्जाम मोहम्मद रजा आणि मन्यार अलविना एजाज यांना प्रदान करण्यात आली.
रंगोत्सव सेलिब्रेशन संस्थेच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले जाते, हे उल्लेखनीय आहे.