श्रीराम नवमी निमित्त आरोग्य तपासणी शिबिरात १५० रूग्णांनी घेतला लाभ.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
श्रीराम नवमी निमित्त रवींद्र वाडेकर व प्रदीप पाटील क्रीडा मंडळ व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर चे आयोजन दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता शिव कॉलनी बाळद रोड भडगाव शिव उद्यान येथे करण्यात आले होते.
शिबिरात १५० हुन अधिक रुग्णांची तपासणी व उपचार मार्गदर्शन व ईसीजी, टू डी इको मोफत करण्यात आले. तपासणी शिबिरात हृदयरोग, अंजॉग्रफी , एन्जोप्लास्टी, शस्त्रक्रिया, विभाग नाक कान घसा , नेत्र तपासणी , स्त्रीरोग, जनरल मेडिसिन, अस्थिरोग, त्वचारोग, मानसोपचार आदी रोगांवर उपचार, निदान व मार्गदर्शन गोदावरी फाउंडेशन चे डॉक्टरांनी केले. यावेळी पाचोरा भडगाव भाजपचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अमोल शिंदे,
भडगाव तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील, उबाठा गटाचे नेते मनोहर चौधरी, भाजपचे शहर अध्यक्ष मुन्ना परदेशी, नरेंद्र पाटील, देविदास पाटील, सचिन चोरडिया, किरण शिंपी, योगेश शेलार,विशाल चौधरी, राहुल देशमुख, निखिल कासार, भूषण वाडेकर, हेमंत वाडेकर,
साहेबराव शिंदे, भोसले सर आदी उपस्थित होते. शिबिराचे आयोजक रवींद्र वाडेकर यांनी प्रास्ताविक तर युवनेते प्रदीप पाटील मनोगत व आभार मानले.