24 तासांत मध्य महाराष्ट्र , मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता, विदर्भात गारपीटीचा अंदाज.!!!
येत्या चोवीस तासांत राज्यातील मध्य महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता आहे, यामध्ये विदर्भात गारपीटीचा अंदाज आहे.
राज्यात भर उन्हाळ्यात पावसाळा सुरु असल्याची परिस्थिती गेल्या दोन दिवसांपासून दिसत आहे.
अशा स्थितीत काल राज्यात बहुताश ठिकाणी ढगाळ वातावरण होते तर आजही ढगाळ वातावरण असून हवेत गारवा आहे.
कुठे होणार पाऊस आणि गारपीट
येत्या 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाच्या तुरळक सरींच्या शक्यतेसह ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात गारपिट होईल असा अंदाज हवामान विभागाचा आहे.
मराठवाड्यातही जालन्यामध्येही पुढच्या 24 तासांमध्ये अवकाळीचा तडाखा बसणार आहे.
रत्नागिरीत अवकाळी, काजू बागांना फटका?
आज (3 एप्रिल) पहाटे तीन वाजल्यानंतर रत्नागिरीत अनेक ठिकाणी जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांचा मोठा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह हा पाऊस सुमारे तासभराहून अधिक काळ पडत होता. या पावसामुळे उकाड्यातून दिलासा मिळाला असला, तरी आंबा-काजूसारख्या पिकांसाठी तो नुकसानकारक ठरणार आहे. पावसामुळे काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला होता. गेले दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण होतं; मात्र पाऊस पडला नव्हता.
महाराष्ट्र हवामान ठळक घडामोडी (सकाळी ०८३० वाजता)
गेल्या २४ तासांतील पर्जन्यमानः विदर्भात काही ठिकाणी: कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
विदर्भात बऱ्याच ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे.
राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.
गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
मुंबई (कुलाबा) ३३.५.. सांताक्रूझ ३७.७. अलिबाग ३२.४. रत्नागिरी ३२.७. पणजी (गोवा) ३४.२. डहाणू ३२.१. पुणे ३५.४, लोहगाव ३७.०. अहिल्यानगर ३७.०. जळगाय ३७.०. कोल्हापूर ३६.७, महाबळेश्वर २८.४. मालेगाव ३५.२. नाशिक ३३.४, सांगली ३६.४. सातारा ३७.६. सोलापूर ४०.१, धाराशिव ३८.०. छत्रपती संभाजीनगर ३५.८. परभणी – नांदेड बीड ३९.८. अकोला ३६.४, अमरावती ३३.६. बुलढाणा ३४.२. ब्रह्मपुरी ४०.२. चंद्रपूर ४०.०, गोंदिया ३४.९, नागपूर ३४.४. वाशिम ३६.४. वर्धा ३६.१, यवतमाळ ३९०