वाडे येथील दुध उत्पादक सोसायटीचे नवनिर्वाचीत चेअरमन दिनकर माळी व व्हाईस चेअरमन भरत परदेशी यांचा सत्कार.

0 228

वाडे येथील दुध उत्पादक सोसायटीचे नवनिर्वाचीत चेअरमन दिनकर माळी व व्हाईस चेअरमन भरत परदेशी यांचा सत्कार.

भडगाव प्रतिनिधी:-

येथील यशवंत सहकारी दुध उत्पादक सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या नवनिर्वाचीत चेअरमन पदी दिनकर मोतीराम माळी तर व्हाईस चेअरमन पदी भरत फुलचंद परदेशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे . संस्थेचे चेअरमन एकनाथ ईच्छाराम माळी व व्हाईस चेअरमन ईश्वर नामदेव परदेशी या दोघांनी ठरल्याप्रमाणे आपले पदाचे राजीनामे दिले होते. म्हणुन चेअरमन व व्हाईस चेअरमन या पदांसाठी हा निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी निवडणुक अधिकारी व्ही .एस . पाटील यांनी कामकाज पाहिले. त्यांना संस्थेचे सचिव भगवान पाटील व इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. यावेळी नवनिर्वाचीत चेअरमन दिनकर माळी व व्हाईस चेअरमन भरत परदेशी यांचा संचालक मंडळ, नागरीकांमार्फत रुमाल, टोपी, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी संचालक एकनाथ ईच्छाराम माळी, ईश्वर नामदेव परदेशी, खंडेराव भगवान पाटील, दिवाकर वेडु पाटील, भानुदास महारु पाटील, शरद सीताराम चौधरी, दादाभाऊ बळीराम माळी, पुरुषोत्तम रामदास पाटील, सतीष धनराज माळी, हरीष सुरेशसिंग परदेशी, नारायण दगा माळी, परेश वसंतराव पाटील, रविंद्र नारायण सोनवणे, शोभाबाई धोंडुसिंग परदेशी, कविता विकास महाजन आदि संचालक व भडगाव शेतकरी सहकारी संघाचे व्हाईस चेअरमन देविदास माळी तसेच गावातील ज्येष्ठ सभासद, नागरिक मोठया संख्येने हजर होते . त्यानंतर नवनिर्वाचीत चेअरमन दिनकर माळी व व्हाईस चेअरमन भरत परदेशी या दोघा पदाधिकार्यांचा सत्कार पञकार तथा वाचनालयाचे संचालक अशोक परदेशी, माजी उपसरपंच रविंद्र माळी यांनी केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा