विधानसभेत सगळे खोके भाईच भरले आहेत’,राज ठाकरेंचं खळबळजनक विधान.!!!
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून भाजप पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या भाईची चर्चा आहे. शिरुरमधील ढाकणे कुटुंबाला मारहाण केल्यानंतर फरार झालेल्या सतीश भोसलेला अखेर अटक करण्यात आली.
त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते ज्यामध्ये तो पैसा, आलिशान आयुष्य, दादागिरी याचं जाहीर प्रदर्शन करत होता. सध्या सतीश भोसले तुरुंगात असून 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान सतीश भोसलेवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टोला लगावला आहे.
एक खोक्याभाई काय घेऊन बसलात, सगळी विधानसभाच भरली आहे अशा शब्दांत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे. “विधानसभेत सगळे खोके भाईच भरले आहेत,” असा टोलाही लगावला आहे. मुंबईत पार पडलेल्या मनसेच्या पदाधिकारी बैठकीत म्हणाले आहेत.
दरम्यान या बैठकीत मनसे नेते संदीप देशपांडे यांची मुंबई शहर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. केंद्रीय समिती आम्ही नेमली आहे. केंद्रिय समिती प्रत्येक घटकांकडे लक्ष देतील अशी माहिती राज ठाकरेंनी दिली आहे. “केंद्रीय समिती आम्ही नेमली आहे. केंद्रिय समिती प्रत्येक घटकांकडे लक्ष देतील.मुंबई शहर अध्यक्ष आम्ही निवडला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही रचना लावण्यात येणार आहे. केंद्रिय समितीला नियुकीचे अधिकारी आहेत का?मला सांगून ते निवड करतील. फक्त मला विचारतील. एखाद्याला पदावरून का काढले? आणि का नियुक्ती केली याबाबत मला माहिती देतील”, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
या रचनेमुळे मतांमध्ये परिवर्तन होणार का? राजकारणाचा अभ्यास कमी असल्यामुळे तुम्हाला असे प्रश्न पडतात. गुढीपाडव्याच्या दिवशी मला जे बोलायचे ते मी बोलेन असंही त्यांनी सांगितलं.
संदीप देशपांडे यांनी नव्या जबाबदारीवर भाष्य करताना सांगितलं की, “मोठी जबाबदारी, मोठा विश्वास राज साहेबांनी दाखवला आहे. मनसे मिशन मुंबई महानगर पालिका सुरू झालx आहे. पालिका जोमात लढवली जाईल. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आमचे आता प्रयत्न असतील. या रचनेचा निश्चित सकारात्मक परिणाम दिसेल”.