श्री बालाजी विद्यालयात गुणगौरव सोहळा
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – येथील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित प्राथमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजीत केला होता.या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष यु एच करोडपती होते तर प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव डॉ.सचिन बडगुजर,संचालिका मंगला करोडपती,संचालक डॉ. चेतन करोडपती,प्राचार्य विजय बडगुजर,स्वाती बलखंडे, मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील,दत्तात्रय पाटील,राजेंद्र चौधरी सह पालक वर्ग उपस्थित होते.
गत वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी वर्गात प्रथम क्रमांक मिळवला अशा यशस्वी विद्यार्थ्यांना पालकांसह मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.तसेच आषाढी एकादशी,गुरुपौर्णिमा,निबंध,चित्रकला,हस्तकला आदी विविध स्पर्धेतील एकुण ३५८ विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. श्वेता पाटील,साक्षी चौधरी,खुशी चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच पालकांमधून दत्तात्रय पाटील यांनी शाळेची गुणवत्ता व प्रगती यावर मनोगत व्यक्त केले.अध्यक्ष स्थानावरून यू एच करोडपती यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यास शाळा नेहमी तत्पर आहे.त्यांचा ज्ञान वृद्धिंगत व कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्नशील आहे.तर पालकांनी ही पाल्याच्या अभ्यासावर लक्ष ठेवणे तेवढेच गरजेचे आहे असे आवाहन केले. संचालक मंडळाने यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.सूत्रसंचालन नितीन जाधव, प्रास्ताविक हेमंतकुमार पाटील, अनुमोदन सुजित कंसारा यांनी केले तर आभार परेश जैन यांनी मानले.