देशमुख महाविद्यालयात ‘शिव विचार परीक्षे’ला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
भडगाव प्रतिनिधी:-
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘शिव विचार परीक्षा’ आयोजित करण्यात आली होती. पुरोगामी विचारवंत व लेखक ॲड. गोविंद पानसरे यांच्या अत्यंत गाजलेल्या व लोकप्रिय झालेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तिकेवर आधारित या परीक्षेचे आयोजन मराठी विभागातर्फे करण्यात आले. या परीक्षेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाबरोबरच त्यांचे राज्य संस्थापक म्हणून कार्य, शेतकऱ्यांविषयीचे धोरण, स्त्रियांविषयीचे धोरण, इतर धर्मांबाबतच्या भावना, रयतेची कणव असलेला राजा ही प्रतिमा याविषयीची चिकित्सा या पुस्तिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड, मराठी विभाग प्रमुख डॉ. अतुल देशमुख, डॉ. इंदिरा लोखंडे, डॉ. गजानन चौधरी, डॉ. जनार्दन देवरे, प्रा. अधिकराव पाटील, प्रा. ज्योती नन्नवरे, प्रा. प्रवीण देसले, प्रा. प्राजक्ता देशमुख यांची व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.