हिवरखेडे येथे विहिरीचा पाण्यात बुडून तरुणाच्या मृत्यू.!!!
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – धुलीवंदन सण साजरा
करण्यासाठी गावी आलेल्या बावीस वर्षीय तरुणाच्या विहिरीत पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना
शुक्रवारी घडली.निलेश विठ्ठल पवार (वय २२,रा हिवरखेडा तांडा ता.पारोळा ह.मु.सुरत) असे मृत तरुणाचे नाव आहे.
तालुक्यातील हिवरखेडे तांडा येथे होळी धुलिवंदनानिमित्त
समाजाचा सांस्कृतिक धुंड कार्यक्रम साजरा होत असतो. निलेश हा गावी सण साजरा करण्यासाठी आला होता. धुलिवंदन साजरा करून सकाळी साडेदहाच्या सुमारास निलेश व त्याचे मित्र हे गावातील विहिरीवर अंघोळ करण्यासाठी गेले असता तेथे आंघोळ करतांना त्याचा पाय घसरुन विहिरीत तोल गेल्याने तो पाण्यात बुडाला.विहिरीत शोध घेऊन त्यास बाहेर काढून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याबाबत विजू सरीचंद पवार यांनी पारोळा पोलिस ठाण्यात खबर दिली.त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.