म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे जागतिक महिला दिन साजरा.!!!

0 16

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे जागतिक महिला दिन साजरा.!!!

भुसावळ प्रतिनिधी:-

येथील नगर परिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवाजेष्ठ शिक्षिका सरला सावकारे ह्या होत्या प्रमुख पाहुणे शाळेचे मुख्याध्यापक एस. जी. मेढे होते मंचावर शालिनी बनसोडे, ज्योती शिरतुरे ,

 

संध्या धांडे, रेखा सोनवणे, मंदा मोरे हे होते. सदाप्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवाजेष्ठ शिक्षिका सरला सावकारे यांच्या सह सर्व महिला शिक्षिका, व महीला कर्मचारी यांचा एस. जी ‌मेढे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.प्रदीप साखरे, एस. टी. चौधरी, यांनी याप्रसंगी सर्व महिलानां जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन महिला दिन केव्हा पासून व का साजरा केला जातो हे सांगुन विविध महिलांच्या जीवन कार्याबद्दल माहिती दिली व नारी शक्तीची महिमा किती आघात आहे हे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एस. जी. मेढे यांनी आज स्त्रियांचे स्थान प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे, ते स्वावलंबी आहे, व ती घराची उत्कृष्ट व्यवस्थापक आहे, आणि आजची स्त्री आत्मनिर्भर होण्याचे श्रेय भारताचे राष्ट्र गुरु महात्मा ज्योतिबा फुले,

 

आणि सावित्रीबाई फुले यांना जाते, स्त्रियांच्या विकासात सर्वात महत्त्वाचा वाटा जर असेल तर तो म्हणजे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचाआहे, त्यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये अशा प्रकारची काही कलमे घालून दिलेली आहे की त्या ठिकाणी स्त्रियांना घेणे आवश्यकच आहे, मग ते राजकारण असेल अर्थकारण असेल समाजकारण असेल किंवा नोकरी असेल, स्त्रियांना समान दर्जा व समान हक्क देण्याचे कार्य त्यांनी केले, महात्मा ज्योतिबा फुलांनी पाया रचला व त्यावर कळस बांधण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या घटनेतून केले, स्त्रियांना समान हक्क दिलेली आहे आणि म्हणूनच आज महिला पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे.

 

कार्यक्रमाचे अध्यक्षा सरला सावकारे अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या, की आजची स्त्री ही सक्षम आहे आत्मनिर्भर आहे परंतु सुरक्षित नाही, पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आज सुद्धा स्त्रीला कमी लेखले जात आहे त्यासाठी पुरुषांचे मत बदलणे आवश्यक आहे, पुरुषांचा स्त्री कडे पाण्याचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे, ती आर्थिक स्वावलंबी आहे परंतु आज सुद्धा परवलंबी जीवन जगत आहे पुरुषांवर अवलंबून तिला राहावं लागत आहे, अजून सुद्धा ती सुरक्षित नाही, जेव्हा एखादी रात्री अकरा बारा वाजता एकांतात फिरेल व सुरक्षितपणे घरात येईल तेव्हा समजायचे की आजची स्त्री ही सुरक्षित आहे. याप्रसंगी त्यांनी पूर्वीच्या काही चुकीच्या चालीरीती बद्दलची माहिती दिली,

 

पूर्वीची देवदासी प्रथा ही स्त्रीवर किती अन्याय करणारी होती याबद्दल त्यांनी विवेचन केले.व महिलांना सन्मान देऊन सत्कार सत्कार केल्या बद्दल आभार मानले . सांगितले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी , डॉ. प्रदीप साखरे, दीपक भंगाळे, संजीव चौधरी, नाना पाटील , नरेंद्र राठौड़, मनोज किरंगे , अरुण नेटके, प्रवीण चौधरी , निलेश बोराडे,लक्ष्मण पवार, राजू बागुल, मंदा मोरे आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचलन व आभार एन. एच.राठोड यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा