भडगाव शहरात माजी नगरसेविकेच्या घरात भर दिवसा घरफोडी.!!!
कपाटाच्या तिजोरीतून ७० हजाराची रोकड लंपास, भडगांव पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल
भडगाव शहरात माजी नगरसेविकेच्या घरात भर दिवसा घरफोडी.!!!
कपाटाच्या तिजोरीतून ७० हजाराची रोकड लंपास, भडगांव पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल
भडगांव प्रतिनिधी :-
नगरपालिकेच्या माजी नगरसेविका योजना पाटील यांच्या जय हिंद कॉलनीतील राहत्या घरी दुपारी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले ७०हजार रुपये रोख अज्ञात चोरट्यांनी लंपास केले असुन या बाबत माजी नगरसेविकेचे पती दत्तात्रय पाटील यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,दत्तात्रय दौलत पाटील (वय ६०) हे जयहिंद कॉलनी भडगाव येथे राहतात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार- दि. ११/२/ २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजेचे सुमारास मी व माझी पत्नी योजना पाटील असे आम्ही भडगाव गावातच अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. व अंतविधी झाल्यानंतर मी मनोहर शंकर चौधरी यांच्यासह भातखंडे गावी द्वार दर्शनासाठी निघुन गेलो. माझी पत्नी योजना पाटील ही घरी निघुन गेली. त्यानंतर सुमारे ११:३० वाजेचे सुमारास माझा मुलगा व भाचा हे आमडदे येथे निघुन गेले व मुलगी ही सकाळी पाचोरा येथे क्लाससाठी निघुन गेली होती. पत्नी योजना पाटील हिने घराला कुलूप लावुन साडी घेण्यासाठी गेली होती. त्यानंतर सुमारे १२:३० वाजेचे सुमारास पत्नी योजना पाटील ही घरी आली व तिने मला फोन करुन सांगितले की, आपले घराचे मुख्य दरवाज्याचे कुलुप तुटलेले असुन घरातील कपाटाचे व लॉकरचे कुलूप तोडलेले आहे व कपाटातील सामान खाली पडलेले असुन कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले ७० हजार रुपये हे दिसत नाही.
या घटनेची माहिती मिळताच मनोहर शंकर चौधरी यांच्यासह लागलीच घरी परत आलो. त्यानंतर मी व माझी पत्नीने गल्लीतील राहणारे इतर आजुबाजुच्या लोकांना विचारपुस केली असता माझ्या घराशेजारी राहणारे यांनी सांगितले की, एका मोटार सायकलवर दोन जण आले होते. त्याच्यावर पाठीवर बॅग होती आणि एकाने तोंडाला रुमाल बांधलेला होता. ते तुमच्या घराच्या बाहेर उभे राहिले होते. दरम्यान आम्ही व शेजा-यांनी आजुबाजुला शोध घेतला. सदर अज्ञात इसम मिळुन आले नाही.
याबाबत माजी नगरसेविकेचे पती दत्तात्रय पाटील यांच्या फियार्दी नुसार भडगाव पो.स्टे गु.र.न.५२/२०२५ भारतीय न्याय संहिता२०२३, ३३१(३),३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास पो.हे.कॉ.विजय जाधव हे