IMG 20260630 WA1124

कजगावजवळ मध्यरात्री भीषण अपघात; ट्रकची ट्रॅक्टरला जोरदार धडक, एक भाविक ठार, दोन गंभीर, १३ जखमी

60 / 100 SEO Score

कजगावजवळ मध्यरात्री भीषण अपघात; ट्रकची ट्रॅक्टरला जोरदार धडक, एक भाविक ठार, दोन गंभीर, १३ जखमी

भडगाव ता.प्रतिनिधी : अमीन पिंजारी

भडगाव तालुक्यातील कजगावजवळ सोमवारी २९ रोजी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. महिंदळे गावातून निघालेल्या पायी दिंडीसोबत असलेल्या भाविकांच्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर आणि १३ भाविक किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इतर जखमींवर प्राथमिक उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महिंदळे गावातून धार्मिक दिंडी पायी मार्गस्थ झाली होती. दिंडीसोबत काही भाविक ट्रॅक्टरमधून प्रवास करत होते. काजगावजवळ महामार्गावर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या इंडियन गॅसचे सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टरचा मागील भाग अक्षरशः चुराडा झाला. या भीषण अपघातात एका भाविकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. भाविकांच्या आरडाओरडीनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून त्वरित रुग्णवाहिकांच्या सहाय्याने चाळीसगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. गंभीर जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातग्रस्त ट्रॅक्टर व ट्रक रस्त्याच्या कडेला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. ट्रकचालकाची चौकशी सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे महिंदळे गावासह भडगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. दिंडीतील भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मृत भाविकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील नागरिकांनी जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना व्यक्त केली आहे.

पोलिसांकडून मृत व्यक्तीची ओळख तसेच जखमींची संपूर्ण यादी अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नाही. अधिकृत माहिती उपलब्ध होताच अपघाताबाबतचा सविस्तर तपशील स्पष्ट होणार आहे.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top