मळगाव सरपंच पदि कल्पनाबाई चित्ते.यांचे पञकार अशोक परदेशी यांनी केला सत्कार.
भडगाव ता. प्रतिनिधी :-
तालुक्यातील मळगाव येथील ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचीत सरपंचपदी कल्पना बाई भिमराव चित्ते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
येथील सरपंच शोभाबाई पाटील यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदी निवड करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्याची बैठक घेण्यात आली. यावेळी उपसरपंच ऊषाबाई प्रताप परदेशी, ग्रामपंचायत सदस्य गुलाब जगन्नाथ पाटील, कल्पना बाई भिमराव चित्ते, निलीमा शैलेश मोरे, शोभाबाई रामकृष्ण पाटील, रामकृष्ण शामराव मरसाळे, साहेबराव सोमा भिल आदि सदस्य उपस्थित होते. यावेळी सरपंच पदासाठी कल्पना बाई भिमराव चित्ते यांचा एकमेव अर्ज आल्याने
निवडणूक निर्णय अधिकारी तथा कजगाव मंडळ अधिकारी अनिल निकम यांनी कल्पना बाई भिमराव चित्ते यांची सरपंचपदी बिनविरोध निवड घोषीत केली. यावेळी सहाय्यक निवडणुक अधिकारी म्हणुन तलाठी करण कुलकर्णी यांनी काम पहिले. तर ग्रामसेवक रविराज पाटील, मदतनीस गणेश सोनार यांनी सहकार्य केले .या प्रसंगी विकासो संचालक गोविंद पाटील, संचालक शिवलाल परदेशी, संचालक नाना चित्ते, राजेंद्र परदेशी, चंद्रकांत रांका वाघळी , प्रताप चित्ते, शिवाजी चित्ते, विक्रम चित्ते, शैलेश मोरे, प्रताप परदेशी, शाम चित्ते, गणेश पाटील, भुषण चित्ते, दिपक पाटील, बालु पाटील, नागराज पाटील, सुभाष राजपुत, कैलास पाटील, नाना चित्ते, नाना देवरे, देविदास चित्ते, मोतीलाल चित्ते, हिरालाल चित्ते, धोंडु देवरे यांचेसह नागरीक उपस्थित होते. सरपंच निवड नंतर नवनिर्वाचित सरपंच कल्पना बाई भिमराव चित्ते यांची ढोलताशांच्या गजरात गावातुन वाजतगाजत मिरवणुक काढण्यात आली.
तसेच नवनिर्वाचीत सरपंच कल्पनाबाई चित्ते, भिमराव चित्ते यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा सत्कार पञकार व मळगावचे भुमिपुञ अशोक परदेशी यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य साहेबराव भिल्ल, शैलेश मोरे, प्रताप परदेशी, शाम चित्ते, बारकु सोनवणे आदि उपस्थित होते.