वाडे येथील शन्नेश्वर मंदिराचा वर्धापन दिन साजरा. महाप्रसादाचे दातृत्व दहावीच्या बॅचच्या माजी विदयार्थ्यांनी केले.
वाडे येथील शन्नेश्वर मंदिराचा वर्धापन दिन साजरा. महाप्रसादाचे दातृत्व दहावीच्या बॅचच्या माजी विदयार्थ्यांनी केले.
भडगाव प्रतिनिधी :—
तालुक्यातील वाडे येथील श्री. शन्नेश्वर मंदिराचा आठवा वर्धापन दिनाचा कार्यक्रम दि. ३१ रोजी शुक्रवारी आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आलेले होते . यात या दिवशी राञी ८ वाजता हभप. रविकिरण महाराज दोंडाईचा यांचा जाहीर किर्तनाचा कार्यक्रम माध्यमिक विदयालयाच्या आवारात झाला. मोठया संख्येने भाविकांनी किर्तन श्रवणाचा लाभ घेतला.
तसेच दि. १ रोजी शनिवारी सकाळी ८ वाजता गावातुन पालखी मिरवणुक वाजत गाजत काढण्यात आली. त्यानंतर सकाळी ११ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. यावर्षी महाप्रसादाचे दातृत्व वाडे माध्यमिक विदयालयाच्या सन १९९३, १९९४ च्या बॅचमार्फत स्वखर्चातुन करण्यात आले.
यावेळी माजी विदयार्थी, विदयार्थीनी व नागरीकांचे परीश्रम लाभले. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री. शन्नेश्वर मंडळाचे कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दर्शनासह, किर्तन, महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला. वाडे गावातील भाविक पुर्वी दरवर्षी शनिशिंगणापुर येथे पायी दर्शनाला जायचे. २००७ पासुन वाडे ते श्री. शनिशिंगणापुर येथे भाविकांची पायी दिंडी काढण्यात यायची. माञ ८ वर्षापुर्वी भाविकांनी लोकसहभागातुन गावातच लोकवर्गणीतुन गिरणा नदीच्या काठावर निसर्गरम्य वातावरणात श्री. शनिमहाराजांचे भव्य मंदिर उभारलेले आहे. मंदिरावर नित्याने सकाळी व राञी पुजा, अर्चा होते. मंदिरावर पुजारी म्हणुन प्रेम जगदिश पांडे हे काम पहातात. मंदिरावर दर्शनासाठी भाविकांची दररोज गर्दी असते. शनिअमावस्येलाही मंदिरावर वाडे, नावरे, बांबरुड प्र. ब, गोंडगाव, मळगाव, टेकवाडे बुद्रुक, टेकवाडे खुर्द, बहाळ यासह इतर गावातील भाविक दर्शनासाठी येतात. याकार्यक्रमांसाठी श्री. शन्नेश्वर मंडळाचे कार्यकर्ते व नागरीकांचे सहकार्य लाभले.