गिरणा नदी पात्रातून अवैध वाळूची चोरी करून वाहतूक करतांना एक पिक अप वाहन जप्त भडगांव महसुल प्रशासनाची कारवाई.!!!
गिरणा नदी पात्रातून अवैध वाळूची चोरी करून वाहतूक करतांना एक पिक अप वाहन जप्त भडगांव महसुल प्रशासनाची कारवाई.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
वडजी येथील गिरणा नदी पात्रातून अवैध वाळु चोरी करून वाहतुक करीत असतांना एक पिक अप वाहन महसुल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी आज संध्याकाळी जप्त केले आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की भडगाव तालुक्यातील वाक व वडजी येथील गिरणा नदी पात्रातून दिवस रात्र बेसुमार अवैध वाळू वाहतूक चालू आहे. यावर आज संध्याकाळी भडगाव महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करून वाळूने भरलेले एक पिक अप वाहन जप्त करून भडगांव तहसिल आवारात लावण्यात आले आहे.
हि कारवाई तहसिलदार शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील ग्राम महसूल अधिकारी संजय सोनवणे गुढे,डि.एस.काळे वाडे, नितिन बाविस्कर महिंदळे, समाधान माळी कोतवाल खेडगांव,वाहन चालक लोकेश वाघ आदींनी कारवाई केली.याबाबत सदर वाहना वर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे असे भडगांव तहसिलदार शितल सोलाट यांनी सांगितले