देशमुख महाविद्यालयाच्या जकातदार स्मृतिकरंडक वक्तृत्व स्पर्धेचे विजेतेपद पाचोरा महाविद्यालयाला.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्व. आबासाहेब मधुकर सदाशिव जकातदार (वकील) व स्व. वत्सलाबाई मधुकर जकातदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेचे विजेतेपद पाचोरा येथील श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. गायत्री श्रीकृष्ण क्षीरसागर व कु. चेतना रणदीप हिरे यांनी पटकावले. प्रथम पारितोषिक यश रवींद्र पाटील (महात्मा फुले महाविद्यालय, मुंबई), द्वितीय परितोषिक घनश्याम मच्छिंद्र पाटील (सिस्टेल आयएमआर महाविद्यालय, धुळे) तर तृतीय पारितोषिक विवेक पितांबर पाटील (कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) यांनी पटकावले. तर उत्तेजनार्थ पारितोषिके अनुक्रमे अनिकेत रामा वनारे (संताजी महाविद्यालय, नागपूर) व साईराज मोहन घाटपांडे (नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय, पुणे) व विशेष उत्तेजनार्थ पारितोषिके गोविंद तुकाराम भांड (बीजेएस महाविद्यालय, पुणे) व प्रथमेश मच्छिंद्र धायगुडे (केएमसी महाविद्यालय, खोपोली, रायगड) यांना प्राप्त झाले.
या आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन डॉ. मुकुंद करंबेळकर (अध्यक्ष, रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव) यांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी, ज्येष्ठ संचालक विनय जकातदार, ज्येष्ठ संचालक खलील देशमुख यांची विशेष उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. जकातदार परिवाराने ही स्पर्धा प्रायोजित केली असून स्पर्धेचे हे सहावे वर्ष आहे.
समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार दिलीप वाघ होते. याप्रसंगी प्रा. प्रकाश जकातदार (सेवानिवृत्त प्राध्यापक, सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई), ज्येष्ठ संचालक विजय देशपांडे, प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. खलील देशमुख, सुनील पाटील व सुनंदा जकातदार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. परीक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. बी. एस. भालेराव यांनी स्पर्धेचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. सूत्रसंचालन प्रा. शिवाजी पाटील यांनी केले तर उपप्राचार्य डॉ. दीपक मराठे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला विलास जकातदार, रेखा जकातदार, वासंती देशपांडे, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.