गोंडगाव विदयालयात सांस्कृतिक कार्यक्रम रंगला.!!!

0 128

गोंडगाव विदयालयात सांस्कृतिक कार्यक्रम रंगला.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

चाळीसगाव येथील रा. स. शि. प्र. मंडळ संचलीत गोंडगाव माध्यमिक विदयालयात दि.२९ रोजी मंगळवारी विदयार्थ्यांच्या सुप्त कला, गुणांना वाव मिळावा. या उद्देशाने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडगावचे लोकनियुक्त सरपंच राहुल पाटील हे होते. सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे पुजन करुन माल्यार्पण करण्यात आले. तसेच दिपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत विदयालयामार्फत करण्यात आले. विदयार्थी, विदयार्थ्यांनी मराठी, हिंदी गाणे संगीताच्या तालावर नृत्य करीत आपली कला सादर केली. व गृप डान्स, लावण्या, पारंपारीक नृत्य, तेलगु डान्स, गरबा डान्स , पिरॅमिड डाॅन्स , एकपाञी नाटक विदयार्थ्यांनी सादर केले. यावेळी कार्यक्रमास टाळयांचा जणु पाऊसच पडला. यावेळी व्यासपिठावर लोकनियुक्त सरपंच राहुल पाटील, विदयालयाचे मुख्याध्यापक कल्याणराव वाघ, उपसरपंच रोशन पाटील, सदस्य किशोर पाटील, संदिप मोरे, मच्छिंद्र शार्दुल, ललीत मांडोळे, भगवान जाधव, नाना पाटील, कैलास कोळी, पि. व्हि. जाधव. एस. आर. पाटील, सी. एस. सोन्नीस, एस. वाय. पाटील, व्हि. ए. पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदयालयाचे मुख्याध्यापक कल्याणराव वाघ यांनी केले. सुरुवातीस क्रिडा शिक्षक एस. डी. चौधरी यांनी जय जय महाराष्टृ माझा, जय जय महाराष्टृ माझा हे गित सादर केले. कार्यक्रमाचे सुञसंचलन सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख प्रशांत सोळंके, आर. बी. महाले, एस. आर. महाजन यांनी उत्कृष्ट केले.विदयालयाचा माजी विदयार्थी स्वप्नील मोराणकर यांची अमेरीकेत निवड झाल्याबद्दल त्यांच्या आई वडीलांचा सत्कार विदयालयाचे मुख्याध्यापक कल्याणराव वाघ, सरपंच राहुल पाटील यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

सुरुवातीस देवा श्री. गणेशा, देशभक्तीपर गीत मेरे देश की धर्ती , मराठी रिमिक्स गाणे , लल्लाटी भंडार, गुलाबी शरारा, पैसा वाली ताई यासह अनेक मराठी, हिंदी चिञपटातील गाणे संगिताच्या तालावर विदयार्थ्यांनी नृत्य सादर केले. कार्यक्रम यशस्विततेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे अनमोल सहकार्य लाभले. या कार्यक्रमास नागरीक, महिला, पालकवर्ग, आजी माजी विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. याकामी सदगुरु मंडपाचे संचालक संदिप पाटील, विजय पाटील, दत्ता साउंड कजगावचे आबा महाजन यांचेही सहकार्य लाभले.

यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक कल्याणराव वाघ, पि. व्ही. जाधव, सी. एस. सोन्नीस, एस. डी. चौधरी, व्हि. ए. पाटील, एस. आर पाटील, एस. वाय. पाटील, पि. व्ही. सोळंके, बी. डी. बोरसे,एस. एस. आम्ले, आर. एस. सैंदाणे, एस. आर. महाजन, एन. ए. मोरे, आर. बी. महाले, पी. जे. देशमुख, एस. जी. भोपे, ए. एम. परदेशी, एस. एल. मोरे, व्हि. एम. जाधव आदि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी, विदयार्थीनी उपस्थित होते.आभार एस. डी. चौधरी यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा