जळगाव येथे राष्टीृय चर्मकार महासंघाची जिल्हा बैठक उत्साहात संपन्न.!!!

0 33

जळगाव येथे राष्टीृय चर्मकार महासंघाची जिल्हा बैठक उत्साहात संपन्न.!!!

जळगाव प्रतिनिधी :-

संत रविदास जयंती राष्ट्रीय उत्सव म्हणून देशभर साजरा करण्यात यावा. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या बैठकीत ठराव करण्यात आला.

दि.२५ रोजी शनिवारी दुपारी राष्ट्रीय चर्मकार महासंघाची जिल्हा बैठक शानबाग सभागृह जळगाव येथे घेण्यात आली . या बैठकीत राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे,

 

समाजभुषण, पांडुरंग बाविस्कर, जिल्हाध्यक्ष ईश्वरलाल अहिरे, उपाध्यक्ष मुरलीधर विसावे, राज्य सदस्य धनराज पवार या महासभेत उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली .फेब्रुवारी महिन्यामध्ये १२ तारखेला जयंती जिल्हाभर मोठ्या उत्साहात साजरी करावी. असे समाज बांधवांना आवाहन करण्यात आले .तसेच शासनाने संत रविदास महाराज जयंती निमित्त शासकीय, निम शासकीय व सर्व आस्थापनांना आपल्या कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी जयंती साजरी करावी. त्यासाठी वेळोवेळी शासन परिपत्रक ,अध्यादेश काढलेल्या असताना सुद्धा कोणत्याही कार्यालयामध्ये जयंती साजरी केली जात नाही. याबद्दल बैठकीत जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन देऊन सर्व आस्थापनांना आदेश देण्यात यावा. अशी विनंती करण्यात यावी . त्यासाठी निवेदन देण्यात यावे असे बहुमताने ठरविण्यात आले.

 

त्याचप्रमाणे गाळण बु॥ ता. पाचोरा येथील मागासवर्गीय गरीब कुटुंबावर शेतीच्या वादातून जो हल्ला करण्यात आला .त्यात जीवघेणा हल्ला झाला त्यामध्ये कुटुंबातील सदस्यांना गंभीर दुखापत झाली .प्रशासनाकडे निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही. त्याबद्दल प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला व प्रशासनाने या गंभीर प्रकाराची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. व त्या कुटुंबास पोलीस संरक्षण देण्यात यावे. पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेतल्यास मोठ्या प्रमाणावर जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल.

 

असा इशारा प्रशासनाला देण्यात यावा असे सर्वानुमते ठरले. याप्रसंगी राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे हे अध्यक्षस्थानी होते . समाजभूषण पांडुरंग बाविस्कर, महिला राज्य उपाध्यक्ष जयश्री विसावे ,ग सं संचालक विजय पवार , नुतन जिल्हाध्यक्ष ईश्वरलाल अहिरे ,शहर जिल्हाध्यक्ष भगवान बाविस्कर हे व्यासपीठावर उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत समाज बांधवांची तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी बहुसंख्येने बैठकीस उपस्थित होते.

 

त्यात ईश्वरलाल अहिरे यांना जिल्हाध्यक्ष म्हणुन मान्यता देण्यात आली. व कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष भगवान बाविस्कर , महिला कार्याध्यक्ष ज्योती सोनवणे , वैशाली उशीर, सविता बाविस्कर, जयश्री बाविस्कर, प्रमिला मोरे, तालुका अध्यक्ष प्रदीप वाघ ,तालुका सचिव योगेश अहिरे ,राज्य सदस्य धनराज पवार ,जिल्हा सचिव देविदास बोरसे ,पाचोरा तालुका अध्यक्ष गोवर्धन जाधव ,रमेश पवार ,पारोळा अध्यक्ष मंगेश मोरे ,चोपडा अध्यक्ष छोटू भाऊ विसावे, दीपक सुरळकर,

 

उदय कावीरे, प्रभू अहिरे ,राज अहिरे, विकी विसावे, नारायण बाविस्कर, सुकलाल साळुंखे ,ज्ञानेश्वर बाविस्कर ,एस.बी. विसावे, ईश्वर बाविस्कर ,मुरलीधर उशीर ,विजय पवार , सुनंदा बाविस्कर, प्रदीप बाविस्कर, दिलीप वाघ, संतोष लिंगायत, ज्ञानेश्वर उशीर ,अरुण नेरकर, मिलिंद मोरे ,राजेंद्र विसावे, इत्यादी पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष ईश्वरलाल अहिरे अहिरे यांनी प्रास्ताविक केले. व प्रदीप वाघ यांनी सुत्रसंचालन केले. व भगवान बाविस्कर यांनी आभार मानले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा