Monday, January 19, 2026
Google search engine
Home Blog Page 107

कासोदा येथे भाजपा सदस्यता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद.!!!

0

कासोदा येथे भाजपा सदस्यता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद.!!!

कासोदा प्रतिनिधि :-

संपूर्ण देशभरात भाजपा सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली असुन राष्ट्रिय अध्यक्ष ते बूथ कार्यकर्ता या अभियानात सहभागी होत आहे.

येथे दि.५ जानेवारी रोजी भाजप सदस्यता अभियान हा कार्यक्रम राबविण्यात आला.मोठया प्रमाणावर सदस्य नोंदणी करण्यात आली.

त्या प्रसंगी डॉ. राधेशाम चौधरी , नरेंद्र पाटील , ऋषिकेश पाटील , नरेश ठाकरे , सागर शेलार , शैलेश पांडे , ज्ञानेश्वर शिंदे , शैलेश मंत्री , ज्ञानेश्वर खैरणार , भूषन खैरनार , शुभम समदानी , जयेश सुतार , वैभव पाटील , सुरेश पाटील , आबाजी पाटील तथा भाजपा पदाधिकारी , कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

भाजपाचे हे सदस्यता नोंदणी अभियान १५ जानेवारी पर्यंत सुरु राहणार असुन ८८००००२०२४ या नंबर वर मिस कॉल द्वारे भाजपा सदस्य नोंदणी करता येणार आहे.

 

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाला जनतेची पसंती कायम असुन देश सुरक्षित राहण्याची भावना या अभियानाच्या माध्यमातून अनेक लोकांनी व्यक्त केली.

बॅंडने वाजत गाजत गुरुजनांची गाडीवर मिरवणुक. विदयार्थ्यांनी केला नाचुन आनंद व्यक्त.

0

बॅंडने वाजत गाजत गुरुजनांची गाडीवर मिरवणुक. विदयार्थ्यांनी केला नाचुन आनंद व्यक्त.

वाडे येथे दहावीचे माजी विदयार्थी स्नेह मेळाव्याला ३८ वर्षांनी आले एकञ. अनोखे स्नेह संमेलन.

भडगाव प्रतिनिधी :-

चाळीसगाव येथील रा.स. शि. प्र. मंडळ संचलीत वाडे येथील माध्यमिक विदयालयातील सन १९८५, १९८६ या वर्षांच्या दहावीच्या बॅचच्या विदयार्थ्यांनी दहावीचे शिक्षण घेऊन शाळेतुन बाहेर पडलेल्या माजी विदयार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजीत करण्यात आला होता. आपण बालपणी शिक्षण घेतलेल्या वाडे येथील माध्यमिक विदयालयात हा कार्यक्रम उत्कृष्ट मांडणी केलेल्या मंडपात गुरुजनांचा सन्मान केला. व माजी विदयार्थी, विदयार्थींनींनी आपला परीचय देत बालपणीच्या शाळेतील गमती, जमती, केलेला खोडसाळपणा, शिक्षकांनी शिक्षणाचे पाजलेले ज्ञानरुपी अमृत, शिक्षकांनी केलेली शिक्षा यासह शालेय जीवनातील आलेले प्रसंग मांडुन बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. या स्नेह मेळाव्यानिमित्त तब्बल ३८ वर्षानंतर गुरुजनांच्या उपस्थितीत पुन्हा एकञ येत शाळा भरल्याचा आनंद दिसुन आला. विशेष म्हणजे सकाळी ९ वाजता गुरुजनांना फेटे बांधुन सजविलेल्या गाडीवरुन चाळीसगाव येथील आनंद बॅंडच्या सुमधुर गितांच्या ताला सुरात गावातुन गुरुजनांसह माजी विदयार्थी, विदयार्थीनींची वाजत गाजत भव्य मिरवणुक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीत या माजी विदयार्थी अन विदयार्थ्यांनी आनंद बॅंडच्या सुमधुर धुमधडाक्यात नाचुन मनमुराद आनंद घेतला. असा हा गुरुजन अन दहावीच्या माजी विदयार्थ्यांचे अनोखे स्नेह संमेलन गावात खास आकर्षण ठरल्याचे दिसुन आले.

वाडे विदयालयात आकर्षक अन उत्कृष्ट मांडणी केलेल्या मंडपरुपी वर्गातच हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक एस. एस. पाटील हे होते. सुरुवातीस सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन गुरुजनांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थित गुरुजन व गावातील मान्यवरांचा सत्कार माजी विदयार्थी, विदयार्थींनींच्या हस्ते करण्यात आला. गुरुजनांना सन्मानपञ फ्रेम, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर रा. स. शि. प्र. मंडळाचे माजी संचालक डाॅ. कर्तारसिंग परदेशी, एस. एस. पाटील, एल. टी. चव्हाण, एस. के. निकम, एस. बी. मोरे, एस. आर. माळी, बी. बी. जाधव, एस. जी. अहिरे, परमेश्वर टीळकर, पी. के. मोरे, ओंकारदास बैरागी, शिवाजी पाटील आदि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुञसंचलन गसचे माजी संचालक सुनिल निंबा पाटील व सुनिल भाऊराव माळी यांनी केले. प्रास्तविक कैलास माळी यांनी केले. यावेळी मुकुंदा माळी, सुरेखा पाटील, विदया पाटील, भटाबाई माळी, सरलाबाई परदेशी, अशोक परदेशी,चंद्रकांत मोरे, शरद महाजन, सुनिल पाटील, शामकांत बोरसे, चंद्रकांत अमृतकार, रविंद्र पाटील, नाना मरसाळे, राजु परदेशी, हरीचंद्र माळी, राजु माळी, अर्चना पाटील, महम्मद खाटीक यांचेसह विदयार्थी, विदयार्थीनींनी आपल्या शाळेतील बालपणीच्या आठवणी मनोगतातुन मांडुन गुरुजनांचे आभार मानले. तसेच यावेळी एल. टी. चव्हाण, एस. के. निकम, एस. जी. अहिरे, एस. आर. माळी, बी. बी. जाधव आदि शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षीय मनोगतातुन शिक्षक एस. एस. पाटील यांनी विनोदी शैलीतुन अन अलंकारीक रुपाने शब्दांची गुंफन करीत बालपणीच्या विदयार्थी, विदयार्थींनी अन गुरुजनांच्या नात्याची मांडणी केली. आपले जीवन सुखी व आरोग्यदायी जावो अशा शुभेच्छा दिल्या. विदयार्थ्यांनी व्यसनांपासुन दुर राहावे. असेही एस, एस. पाटील यांनी सांगीतले. यावेळी एकच हास्याचे फवारे उडाल्याचे चिञ पहावयास मिळाले.

याप्रसंगी वाडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच गुलाब पाटील, माजी उपसरपंच प्रदिप भिल्ल, सदस्य रविंद्र सोनवणे, विकासोचे चेअरमन विजय परदेशी, प्रथम महिला उपसरपंच ऊषाबाई परदेशी, मी वाडेकर गृपचे जगतसिंग राजपुत यांचेसह नागरीकांचीही उपस्थिती होती. आभार सुनिल भाऊराव पाटील यांनी मानले. तसेच कार्यक्रमानंतर गावापासुन जवळच असलेल्या राजेंद्र हरी पाटील यांच्या शेतात निसर्गरम्य वातावरणात स्नेह भोजनाचा आनंद गुरुजनांसोबतच माजी विदयार्थी, विदयार्थीनी, नागरीकांनी घेतला.कार्यक्रम यशस्विततेसाठी सर्व वर्ग मिञ, मैञिणींनी अनमोल परीश्रम घेतले.

 

पत्रकारांसाठी नवी गृहनिर्माण सोसायटी काढण्यासाठी मदत करणार – ना. गुलाबराव पाटील

0

पत्रकारांसाठी नवी गृहनिर्माण सोसायटी काढण्यासाठी मदत करणार – ना. गुलाबराव पाटील

 

देशदूतचे मुख्य उपसंपादक चेतन साखरे दर्पण पुरस्काराने सन्मानित

 

जळगाव प्रतिनिधी :-

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्यामुळे त्यांच्या लिखाणातून आम्हालाही योग्य तो बोध मिळतो म्हणजे अप्रत्यक्षपणे पत्रकार हे आमचे मार्गदर्शक असल्याचे सांगून जळगाव मधील पत्रकारांसाठी नवी गृह निर्माण सोसायटी काढण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जिल्हा नियोजन भवन येथे ६जानेवारी सोमवारी रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या दर्पणदिनानिमित्त आयोजित दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी आमदार राजूमामा भोळे, नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जैन इरिगेशनचे जनसंपर्क अधिकारी अनिल जोशी, जिल्हा दूध संघाचे सदस्य अरविंद देशमुख, ज्येष्ठ

पत्रकार सचिन जोशी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रवीणजी सपकाळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किशोरजी रायसाकडा, उत्तर महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया अध्यक्ष सचिनजी गोसावी, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अबरार मिर्झा,उपाध्यक्ष भुवनेशजी दुसाने, विभागीय उपाध्यक्ष प्रा विजय गाढे,संपर्क प्रमुख राकेश सुतार,ग्रामीण जि अध्यक्ष, नागराज पाटील, कार्याध्यक्ष गणेश रावळ, महेंद्र सूर्यवंशी,जेष्ठ पत्रकार अनिल आबा येवले,प्रा.सी एन.चौधरी,सागर शेलार,चेतन महाजन,प्रवीण पाटील,पाचोरा शहराध्यक्ष राजेंद्र राजेंद्र, स्वप्निल कुमावत,सुनील कोळी, खैरनार,प्रल्हाद पवार, मुझम्मील शेख,

आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ना.गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारीआयुष प्रसाद, आमदार राजूमामा भोळे, डीआयजी दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, संपादक संजय आवटे यांच्या हस्ते प्रिंट मिडियाचे पत्रकार चंद्रशेखर जोशी, सुनील पाटील, सुधाकर जाधव देशदूतचे चेतन साखरे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार किशोर पाटील, संजय महाजन, विजय वाघमारे, डिजिटल मीडियाचे नरेंद्र पाटील, निलेश पाटील, छायाचित्रकार सचिन पाटील यांना दर्पण पुरस्कार

प्रदान करण्यात आला.

पत्रकारांचे स्थान समाजात खुप मोठे असल्याचे सांगून ते स्थान कायम राहिलं पाहिजे. तुम्ही माध्यमात कामं करणारी बुद्धीजीवी लोकं आहात. त्यामुळे समाजाला योग्य दिशा देण्याचे काम तुमच्या हातून होते. हे सगळे करतांना तुमचे आरोग्यही तेवढेचं महत्वाचे असून त्यासाठी सर्व पत्रकारांनी आरोग्य विमा उतरवावा असा महत्वाचा सल्ला आ. राजूमामा भोळे यांनी यावेळी दिला. पोलिसांचे आणि पत्रकारांचे संबंध रोजचेच असतात. पत्रकार म्हणून तुम्हीच तुमचे कर्तव्य बजावता, पोलीस म्हणून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडतो. पत्रकारिता करतांना चुका दाखविणे

 

हे तुमचे काम आहे ते करत रहा. फक्त कोणी तुमच्या पत्रकारितेमुळे नाउमेद होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी देखील मार्गदर्शन केले.

 

यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे म्हणाले की, पत्रकारांच्या बातमीचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस असावा, त्याच्यासाठी तुमची पत्रकरिता असावी. शासन, प्रशासन जिथे चुकते तिथे त्यांची चुक दाखविण्याचे काम पत्रकारांचे असल्याचे सांगून येथून पुढे एआय हे तंत्र आणि माणूस म्हणून आपण पत्रकार अशी स्पर्धा असणार आहे. त्यामुळे योग्य कंटेट तुमच्याकडे असणं आता गरजेचं असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दर्पण हा वारसा फार मोठा आहे. मात्र तो वारसा विसरता कामा नये त्या दृष्टीने आपण काम करत राहिले पाहिजे. जगात काहीही बंद पडेल पण मुद्रित माध्यम बंद पडणार नाही. आजही लोकांचा मुद्रित माध्यमावर लोकांचा विश्वास असल्याचे प्रतिपादन श्री. आवटे यांनी केले.

भडगाव येथील वरिष्ठ महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियानाचे उद्धाटन संपन्न.!!!

0

भडगाव येथील वरिष्ठ महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियानाचे उद्धाटन संपन्न.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग आणि सौ. र.ना.देशमुख कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज भडगाव येथे महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियानाचा उद्धाटन कार्यक्रम कबचौउमविचे व्यवस्थापन परिषद सदस्य ॲड. अमोल पाटील यांचे हस्ते संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.एन.एन. गायकवाड सर, उपप्राचार्य प्रा.डॉ.दिपक मराठे सर,विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.डॉ. संजय भैसे सर,विद्यार्थी कल्याण सहअधिकारी प्रा.डॉ. चित्रा पाटील मॅडम,विद्यार्थी कल्याण सहअधिकारी प्रा.डॉ. देवेंद्र मस्की सर, सायबर साक्षरता विषयातील वक्त्या भडगाव पो.स्टे. च्या महिला पोलीस काँस्टेबल श्रीमती सोनी सपकाळे मॅडम, श्रीमती शमिका पठाण मॅडम हे उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना ॲड. अमोल पाटील यांनी भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी युवतींनी आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. स्पर्धायुगात आवश्यकतेनुसार विविध कौशल्य आणि ज्ञान आत्मसात करून इतरांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणे आवश्यक आहे.

सायबर सुरक्षा या विषयावर श्रीमती सोनी सपकाळे मॅडम आणि श्रीमती शमिका पठाण मॅडम यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले.

६ जाने. ते ११ जाने.पर्यंत चालणाऱ्या या अभियानात सायबर सुरक्षा, बँक व्यवहार साक्षरता, स्वयंरोजगाराच्या शासकीय योजना, सॉफ्ट स्किल या विषयांवर विविध वक्त्यांची मार्गदर्शन प्राप्त होणार आहे.

अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ.एन.एन. गायकवाड सर, प्रास्ताविक प्रा.डॉ. संजय भैसे सर, सूत्रसंचलन प्रा.डॉ. चित्रा पाटील मॅडम, आभारप्रदर्शन प्रा.टेमकर मॅडम यांनी केले.

शिव उद्योग संघटनेचा महिला सक्षमीकरण धोरणा अंतर्गत यशस्वी मेळावा

0

शिव उद्योग संघटनेचा महिला सक्षमीकरण धोरणा अंतर्गत यशस्वी मेळावा

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : २०२५ सालामध्ये शिव उद्योग संघटनेच्या माध्यमातून हजारो रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, त्याच पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली दामू नगर, कांदिवली पूर्व येथे हेमलता नायडू महिला शाखाप्रमुख मागाठाणे शाखा क्रमांक २६ यांनी स्थानिक शाखाप्रमुख सचिन केळकर यांच्या सहकार्याने महिला मुक्तीदिन व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला मेळावा आयोजित केला.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. महिला मेळाव्याचा उद्देश शाखाप्रमुख सचिन केळकर यांनी विषद करत मेळाव्याची सुरवात केली. महिला शाखाप्रमुख हेमलता नायडू यांनी महिला सक्षमीकरण करण्यासाठी शिव उद्योग संघटना कटिबध्द असल्याचे सांगितले. सहकार सेना मागाठाणे प्रमुख रुचिता भोसले यांनी महिलांनी उद्योग व रोजगार क्षेत्रात कार्यरत शिव उद्योग संघटनेच्या विविध उपक्रमांचा लाभ महिलांनी घेण्यासंबंधी आवाहन केले.

सदर मेळाव्यात शिव उद्योग संघटनेचे सरचिटणीस प्रकाश ओहळे यांनी शिव उद्योग संघटनेच्या कार्याची व भावी वाटचालीची तसेच शिव उद्योग संघटनेच्या माझा महाराष्ट्र या

ई-कॉमर्स वेबसाईट आणि महिला सेवा गटा संदर्भात माहिती दिली.

तद्नंतर इंडी श्रेष्ठ शास्त्रम् आयुर्वेदिक हेयर ऑइल कंपनीचे व्यवस्थापक योगेंद्र नाविक यांनी कंपनीच्या उत्पादनाच्या विक्रीतून महिलांना होणारा फायदा याबद्दल मार्गदर्शन केले. नंतर स्टे फाईन मल्टीव्हेंचरचे संचालक सूरज कुंभार व मोहिनी पुजारी यांनी महिला आरोग्य व नारी प्रोटेक्ट हे कंपनीचे उत्पादन याबद्दल प्रात्यक्षिकासह माहिती दिली व विभागातील महिला कंपनीला जोडल्या गेल्यास त्यांना होणारा आर्थिक फायदा याबद्दल माहिती दिली. सदर मेळाव्याला अंदाजे अडीचशे होऊन जास्त महिला उपस्थित होत्या. अनेक महिलांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदविले.

सदर मेळाव्याला स्थानिक पदाधिकारी बापूराव चव्हाण, समन्वयक माधुरी समेळ, समन्वयक अर्चना वर्पे , कार्यालय प्रमुख सोनाली चतुर्वेदी , सर्व उपशाखा प्रमुख, गटप्रमुख व महिला बचत गट यांची विशेष उपस्थिती होती.

भडगाव येथे भारतीय जनता पार्टीचे सदस्यता नोंदणी शिबीर उत्साहात संपन्न.!!!

0

भडगाव येथे भारतीय जनता पार्टीचे सदस्यता नोंदणी शिबीर उत्साहात संपन्न.!!!

जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वरजी जळकेकर महाराज यांची सदिच्छा भेट

भडगाव प्रतिनिधी :-

भारतीय जनता पार्टी भडगाव मंडलाच्या सदस्य नोंदणी अभियानाला आज भडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुरूवात करण्यात आली.

यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम जिल्हयाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वरजी जळकेकर महाराज यांनी नोंदणी शिबीराला भेट देऊन समाधान व्यक्त केले आणि उपस्थित कार्यकर्त्यांचा परिचय करून मार्गदर्शन केले.समाजातील शेवटच्या घटकापर्यंत संपर्क करून सदस्य नोंदणीच्या माध्यमातून भाजपाशी जोडण्याची सूचना यावेळी केली.

आज दिवसभरात भडगाव मंडलातील जास्तीत जास्त पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून,घरोघरी संपर्क करुन नोंदणीसाठी प्रयत्न केलेत.१५० पेक्षा जास्त कार्यकर्ते आज दिवसभरात सक्रिय होते. १३००हून जास्त प्राथमिक सदस्यांची आज विविध कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नोंदणी करण्यात आली. प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान १५ जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहेत.

 

याप्रसंगी भाजपा प्रदेश कार्य. सदस्य तथा विधानसभा संयोजक अमोल नाना पाटील, सदस्य नोंदणी अभियानाचे मंडल संयोजक तथा तालुका सरचिटणीस अनिल मुरलीधर पाटील, अभियानाचे सह संयोजक तथा तालुका उपाध्यक्ष प्रमोद देविदास पाटील, अभियानाचे आय.टी. संयोजक मनोहर तुकाराम चौधरी, शक्तीकेंद्रप्रमुख मनोज सिताराम पाटील माजी शहराध्यक्ष बन्सीलाल परदेशी, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष विजय सुभाष वाणी, वैद्यकिय आघाडीचे तालुकाध्यक्ष डॉ. प्रताप पाटील, वैद्यकिय आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. शेखर पाटील, अनु.जमाती मोर्चाचे सुभाष मोरे,ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान अर्जुन पाटील, बुथप्रमुख हिम्मत बडगुजर, दिपक दादाजी पाटील, जगदिश नारायण सोनवणे,मनोहर रामराव पाटील, अमोल प्रकाश सोनजे,पप्पू विरभान पाटील, राजेंद्र एकनाथ माळी,हेमंत धर्मराज वाडेकर, योगेश कांतीलाल शिंपी, राजू संतोष मोरे, प्रमोद प्रल्हाद पाटील, गोरख रघुनाथ महाजन, निलेश पाटील, यांची उपस्थिती होती.

सदस्यता नोंदणी शिबीर यशस्वितेसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

भडगाव पोलिसांचा सत्कार समारंभ सद्भाव आणि एकतेचे उत्कृष्ट उदाहरण.!!!

0
1-3248x1440-2-0#

भडगाव पोलिसांचा सत्कार समारंभ सद्भाव आणि एकतेचे उत्कृष्ट उदाहरण.!!!

 

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव पोलिसांनी आयोजित केलेला सत्कार समारंभ, शहरातील सद्भाव आणि एकतेचे एक उत्तम उदाहरण ठरला आहे. गणेश मंडळ आणि ईद-ए-मिलाद मिरवणूक शांततेत पार पाडणाऱ्या मंडळाचे सत्कार करून पोलिसांनी सांप्रदायिक सलोखा राखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले जात आहे.

 

भडगाव येथे आज रोजी भडगाव पोलिस स्टेशन यांच्या कढून पोलिस स्थापना दिनानिमित्त भडगाव शहरातील उत्कृष्ठ गणेश मंडळ व ईद ए मिलाद मिरवणूक शांततेत पार पाडली त्यांचा प्रथम द्वितीय आणि तृतीय

तर तृतीय समांचिन्ह देण्यात आले या कार्यकामाचे अध्यक्षस्थानी पाचोरा भडगाव मतदार संघांचे आ. किशोर आप्पा पाटील होते यांचे हस्ते सर्व गणेश मंडळ व ईद ए मिलाद मिरवणूक शांततेत काढणारे सर्वांना समांचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले याच्यात

पहिले क्रमांक

आझाद चौक मित्र मंडळ भडगाव

दुसरा क्रमांक

जागृती गणेश मंडळ भडगाव

तिसरा क्रमांक

जय बजरंग मित्र मंडळ यशवंत नगर भोईवाडा

ईद ए मीलाद जलाली मोहला पंच कमिटी भडगाव देण्यात आले

आभार प्रदर्शन सहायक पोलिस निरीक्षक मस्के साहेब यांनी केलं त्यावेळी खालील पैकी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सोबत भडगाव पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के,पोलिस उप निरीक्षक,सुशील सोनवणे, पोलीस गोपनीय विभागाचे निलेश ब्राह्मणकर महिला दक्षता समिती अध्यक्ष व समितीचे सदस्य तसेच गणेश मंडळ ईद-ए-मिलाद चे पंचमंडळ आणि आणि सर्व समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते

भडगाव शहरातील विविध धर्मांचे लोक एकत्रितपणे राहतात आणि त्यांच्या सन उत्सवांना एकमेकांचा आदर करतात.

पोलिसांनी केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे कामच केले नाही, तर शहरातील सद्भाव वाढवण्यासाठीही प्रयत्न केले आहेत.

विजेते मंडळांनी दाखवलेली जबाबदारी आणि शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न, इतर मंडळाना प्रेरणादायी ठरणार आहे.

कार्यक्रमात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासह पोलिस अधिकारी आणि महिला दक्षता समितीच्या सदस्यांची उपस्थिती, या कार्यक्रमाच्या महत्त्वावर भर दिले.

हा सत्कार समारंभ केवळ एक कार्यक्रम नसून, एक संदेश आहे. तो संदेश आहे, सद्भाव, एकता आणि शांतता हीच खरी प्रगतीची पायाभूत शिला आहे. हा कार्यक्रम भडगावच नव्हे तर संपूर्ण देशासाठी आदर्श ठरू शकतो.

भडगाव अँग्लो उर्दू हायस्कुलचा आनंद मेळावा उत्साहात संपन्न.!!!

0

भडगाव अँग्लो उर्दू हायस्कुलचा आनंद मेळावा उत्साहात संपन्न.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव शहरातील अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये नुकताच झालेला आनंद मेळावा विद्यार्थी आणि शहरातील नागरिकांसाठी एक उत्सवाचा दिवस ठरला. या मेळाव्यात विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग पाहून खूप आनंद झाला.

विविध प्रकारचे खाद्यपदार्थ:

मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेले विविध प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. मुंग भजी, आलू पुरी, शेव पुरी, साबुदाणा खिचडी, शरबत, पाणी पुरी, वडा पाव,पाव वडा,पाव भाजी, इडली सांभार,रबडी हलवा, सेन्डविच असे अनेक चवदार पदार्थ या मेळाव्यात उपलब्ध होते. या सर्व पदार्थांना विद्यार्थ्यांचा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिक्षकांचे मार्गदर्शन:

या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या कल्पनाशक्तीचा वापर करून नवीन पदार्थ तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले.

शालेय जीवनाची उजळणी

हा आनंद मेळावा केवळ एक खाद्यपदार्थांचा मेळावा नव्हता, तर तो शालेय जीवनाची उजळणी करणारा एक उत्सव होता. या मेळाव्यातून विद्यार्थ्यांना एकमेकांशी संवाद साधण्याची, सहकार्य करण्याची आणि आपल्या कौशल्यांची प्रदर्शना करण्याची संधी मिळाली.कार्यक्रमाचे अध्यक्ष इरफान रजा, प्रमुख अतिथी  हाजी जमाल कासार, मुजम्मील शेख,पत्रकार अबरार मिर्झा, इकबाल मन्यार होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अँग्लो उर्दू हायस्कुल चे मुख्यध्यापक मिर्झा नाजीम,अजीम सर, दानिश सर,रहीम सर,रिजवान सर, अब्दुल कादिर,अशफाक सर,इसाहक दादा, अशफाक पिंजारी, नदीम दादा, खान शगुफ्ता मैडम, शेख शगुफ्ता मैडम ,यांनी परिश्रम  घेतले

चीनमध्ये उद्रेक झालेल्या व्हायरसची काय आहेत लक्षणे व कसा करायचा बचाव.?भारत सरकारही अलर्ट.!!!

0

चीनमध्ये उद्रेक झालेल्या व्हायरसची काय आहेत लक्षणे व कसा करायचा बचाव.?भारत सरकारही अलर्ट.!!!

 

चीनमध्ये सुमारे पाच वर्षांपूर्वी कोरोना व्हायरस नावाच्या आजाराने जगभरात हाहाकार माजवला होता. अनेक वर्षे सर्वच देशांना याचा त्रास सहन करावा लागला आणि लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोनाला महामारी घोषित केले होते. या महामारीची सुरुवात चीनमधून झाली आणि आता पुन्हा एकदा चीनमध्ये एक व्हायरस पसरू लागला आहे, ज्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. चीनमध्ये ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) च्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आले असून अनेक ठिकाणी आणीबाणी जाहीर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

काय आहे human metapneumovirus आणि किती प्रकरणे समोर आली?

 

मानवी मेटान्यूमोव्हायरस देखील काही प्रमाणात कोरोना व्हायरससारखा आहे. लहान मुले, वृद्ध तसेच सर्व वयोगटातील वृद्धांना याचे संक्रमण होत आहे. हा श्वसनाचा विषाणू आहे, जो २००१ मध्ये पहिल्यांदा ओळखला गेला. मात्र, आता चीनमध्ये त्याचा झपाट्याने फैलाव होत आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे अशा लोकांना हा विषाणू अधिक प्रभावित करतो. चीनमध्ये आतापर्यंत किती प्रकरणे समोर आली आहेत, याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी जपानमध्येही मोठ्या प्रमाणात प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. जपानमध्ये १५ डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात ९४ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली, तर जपानमध्ये एकूण रुग्णांची संख्या आता ७,१८,००० झाली आहे.

या आजाराची लक्षणे कोणती.?

एचएमपीव्हीची लक्षणे फ्लू आणि श्वसनाच्या इतर आजारांसारखीच असतात. सामान्य लक्षणांमध्ये खोकला, ताप, नाक बंद होणे आणि धाप लागणे यांचा समावेश आहे. त्याच वेळी, जेव्हा स्थिती अधिक गंभीर होते, तेव्हा व्हायरस ब्राँकायटिस किंवा न्यूमोनियामध्ये बदलतो. एकदा विषाणूची लागण झाली की, एखादी व्यक्ती तीन ते सहा दिवस आजारी राहू शकते. शिंकणे आणि खोकल्याने हा विषाणू इतर लोकांमध्येही पसरू शकतो. या विषाणूची लक्षणे प्रामुख्याने ताप आणि कोरोना विषाणू सारखीच आहेत.

व्हायरसबाबत भारत सरकारही अलर्ट –

चीनमध्ये पसरणाऱ्या या व्हायरसबाबत भारत सरकारही सतर्क झाले आहे. चीनमध्ये एचएमपीव्ही चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात असताना भारतातील केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी) देशातील श्वसन आणि हंगामी इन्फ्लूएंझा प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवू, माहितीची पुष्टी करू आणि त्यानुसार अद्ययावत करू, असे सूत्रांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) सहा क्षेत्रांपैकी एक असलेल्या डब्ल्यूपीआरओ (वेस्टर्न पॅसिफिक रिजन) च्या अपडेटनंतर सूत्रांनी सांगितले की, “१६ ते २२ डिसेंबर दरम्यानची आकडेवारी हंगामी इन्फ्लूएंझा, रायनोव्हायरस, रेस्पिरेटरी सिंकिटल व्हायरस (आरएसव्ही) आणि ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) यासह तीव्र श्वसन संक्रमणांमध्ये अलीकडील वाढ दर्शविते, तथापि, या वर्षी चीनमध्ये श्वसन संसर्गजन्य रोगांचे एकूण प्रमाण आणि तीव्रता मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. उत्तर गोलार्धात, विशेषत: हिवाळ्याच्या काळात श्वसन रोगजंतूंमध्ये हंगामी वाढ अपेक्षित आहे.

श्वसनाचे आजार,विशेषत: ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) वाढल्याने चीनमधील रुग्णालये आणि स्मशानभूमी या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी धडपडत असल्याचे अनेक अहवालात म्हटले आहे.

विषाणूचा धोका कोणाला अधिक आहे. ?

सर्व वयोगटातील लोकांना या विषाणूचा धोका असला तरी लहान मुले, वृद्ध आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती फारशी चांगली नाही अशा लोकांना अधिक धोका आहे. अशा लोकांनी या विषाणूंपासून सावध राहण्याची गरज आहे.

व्हायरसपासून बचाव कसा करायचा.?

आतापर्यंत भारतात याची प्रकरणे समोर आलेली नाहीत, परंतु सरकार पूर्णपणे सतर्क आहे आणि बारकाईने लक्ष ठेवून आहे. या विषाणूपासून वाचण्याचा उपाय कोरोनाप्रमाणेच आहे. लोकांनी साबणाने हात धुवावेत. घाणेरड्या हातांनी डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळावे. ज्याला या आजाराने ग्रासले आहे त्याच्यापासून योग्य अंतर ठेवा. जर कोणाला अशी लक्षणे जाणवत असतील तर त्याने स्वत:ला विलगीकरण करावे. त्याचबरोबर या विषाणूने ग्रस्त व्यक्ती शिंकत असेल तर त्याच्यापासून अंतर ठेवा. आजारी असताना घरीच विश्रांती घ्या.

शिव उद्योग संघटनेचा स्थानिक उद्योजकांना सक्षम करण्यासाठी मदतीचा हात.!!!

0

शिव उद्योग संघटनेचा स्थानिक उद्योजकांना सक्षम करण्यासाठी मदतीचा हात.!!!

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्रातील स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी शिव उद्योग संघटना, शिव सहकार चॅरिटेबल ट्रस्ट वेब बिझीनेसच्या सहकार्याने, “माझा महाराष्ट्र” नावाची महत्त्वाकांक्षी ई-कॉमर्स वेबसाइट सुरू केली आहे. या व्यासपीठाचे उद्दिष्ट छोटे उद्योजक, स्वयं-सहायता गट आणि महिला उद्योजकांना त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी आणि विक्री करण्यासाठी जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे आहे, ज्यामुळे त्यांची विक्री आणि महसूल वाढेल.

 

महाराष्ट्रातील स्थानिक उद्योजकांना भेडसावणाऱ्या मर्यादित मार्केटिंग आणि प्रमोशन बजेटच्या दीर्घकालीन समस्येचे निराकरण करणे ही “माझा महाराष्ट्र” ची संकल्पना आहे. उच्च-गुणवत्तेची उत्पादने तयार करूनही, यापैकी बरेच उद्योजक विपणन आणि जाहिरातीसाठी निधीच्या कमतरतेमुळे व्यापक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष करतात. ही तफावत भरून काढण्यासाठी, “माझा महाराष्ट्र” या उद्योजकांना त्यांची उत्पादने नाममात्र दरात सूचीबद्ध करण्यासाठी एक व्यासपीठ अल्प दरात उपलब्ध करून देत आहे, ज्यामुळे त्यांना जागतिक ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल.

 

ई-कॉमर्स वेबसाइट स्थानिक उद्योजकांना अनेक फायदे प्रदान करेल. ज्यात – जागतिक दृश्यमानता, अल्प दरांच्या उत्पादनांची सूची, विक्री आणि महसूल वाढ, विस्तृत ग्राहक संपर्क, व्यवसाय वाढ आणि विस्तारासाठी संधी उपलब्ध होणार आहेत.

 

शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष दीपक काळीद म्हणाले, “आम्ही ‘माझा महाराष्ट्र’ द्वारे स्थानिक उद्योजकांना त्यांची उत्पादने जागतिक ग्राहकांपुढे पोहोचण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी उत्सुक आहोत. छोट्या उद्योजकांना सक्षम करणे आणि व्यवसायात वाढ आणि यश मिळविण्यासाठी मदत करणे हे आमचे ध्येय आहे.”

 

उत्पादनांची नोंदणी करण्यासाठी आणि “माझा महाराष्ट्र” बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रकाश ओहळे यांच्याशी 9702058930 क्रमांकावर संपर्क साधू शकता. जागतिक व्याप्ती आणि प्रचंड लोकप्रियतेसह, “माझा महाराष्ट्र” महाराष्ट्रातील स्थानिक उद्योजकांसाठी एक गेम चेंजर तसेच त्यांच्या व्यवसायांना पुढील स्तरावर नेण्यासाठी तयार आहे.

 

शिव उद्योग संघटनेबद्दल

शिव उद्योग संघटना ही महाराष्ट्रात रोजगार आणि व्यवसाय निर्मितीला चालना देण्यासाठी स्थापन केलेली संघटना आहे. शिव सहकार चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने, संस्थेने स्थानिक उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी “माझा महाराष्ट्र” ई-कॉमर्स वेबसाइट सुरू केली आहे.

error: Content is protected !!