भडगाव प्रतिनिधी :-
कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था, भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील, विद्यालय, कोळगाव ता-भडगाव येथील इयत्ता बारावीचा विद्यार्थी व किसान स्पोर्ट्स अकॕडमीचा राष्ट्रीय खेळाडू पैलवान स्वराज प्रल्हाद चौधरी ह्याची लहान बहिण कु.साध्वी मिनाक्षी प्रल्हाद चौधरी हिने राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टींग क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.
स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियातर्फे खेलो इंडिया इनडोअर स्टेडियम,इटानगर, अरुणाचल प्रदेश येथे 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या 69 व्या राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत 17 वर्षाआतील 63 किलो वजनी गटात कु.साध्वी हिने क्लीन अँड जर्क यात 89 आणि स्नॅच मध्ये 74 किलो असे एकूण 163 किलो वजन उचलत प्रथम स्थान मिळवत करीत सुवर्णपदक प्राप्त केले आहे,बालक मंदिर संस्था सेकंडरी स्कूल, कल्याण येथे शिकणारी साध्वी रिक्रीएशन व्यायाम शाळा,कल्याण येथे सराव करते.
विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षी देखील इंफाळ,मणिपूर येथे पार पडलेल्या 68 वी राष्ट्रीय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत कु.साध्वी हिने 17 वर्षाआतील स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.
कु.साध्वी हिला प्रवीण व्यवहारे, सुनिल दळवी,मनिषा मॅडम,पैलवान प्रल्हाद चौधरी,सरपंच संजय कराळे, संतोष कराळे,सयाजी मदने,आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,प्रा.रघुनाथ पाटील,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
साध्वीच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा बँक संचालक प्रतापराव पाटील,जळगाव दुध फेडरेशन संचालिका डॉ.पुनमताई पाटील,मंत्रालयीन उपसचिव प्रशांतराव पाटील,माजी नगराध्यक्ष शामकांत भोसले,माध्यमिक शिक्षक पतपेढी संचालक जगदीश पाटील, कोळगाव महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल पवार,पर्यवेक्षिका सिमा शिसोदे यांनी किसान स्पोर्ट्स अकॕडमीचे शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनी यांनी आनंद व्यक्त करीत तिचं अभिनंदन करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
