भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपचा प्रचार जोरात सुरू असून मतदारांकडून उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. प्रभागात भारतीय जनता पक्षाने उभे केलेले उमेदवार बिबा बी. अमानुल्ला खान आणि शेरखान मजीद खान यांच्या प्रचाराने वेग घेतला असून पदयात्रा, घरोघरी भेटी, तसेच संवाद कार्यक्रमांमधून या दोन्ही उमेदवारांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या प्रचार मोहिमेत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. विकासकामांवर आधारित जनसंपर्क, प्रभागातील मुलभूत सुविधांवरील चर्चा, तसेच आगामी योजना मतदारांसमोर मांडण्याचे नियोजन भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांमध्येही या दोन्ही उमेदवारांविषयी चांगली सकारात्मक चर्चा असून प्रभाग क्रमांक 3 च्या राजकारणात भाजपने जोरदार पकड घेतल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
निवडणुकीची तारीख जवळ येत असताना प्रचार अधिक आक्रमक व गतिमान करण्याची रणनीती भाजपकडून आखली जात असल्याचे समजते.
