मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कलेच्या विविध क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंतांना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली. नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन कला, कलादान, प्रयोगात्मक कलाक्षेत्र, लोकनृत्य, लावणी/संगीतबारी, भारुड/विधीनाट्य, वाद्यनिर्मिती, झाडीपट्टी, खडीगंमत, दशावतार, नमनखेळ, वहीगायन, मौखिक परंपरा, संग्रहालय/संस्था, ध्वनीतंत्रज्ञ, संगीत संयोजन, व्हॉइस ओव्हर अशा विविध क्षेत्रांतील कलावंतांचा या पुरस्कारांत समावेश आहे.
या पुरस्कारांचे स्वरूप ज्येष्ठ कलावंतांसाठी तीन लाख रुपये, तर युवा कलावंतांसाठी एक लाख रुपये, तसेच मानचिन्ह, सन्मानपत्र आणि शाल असे आहे. सर्व पुरस्कार मुंबई येथे लवकरच आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष सोहळ्यात सन्मानपूर्वक प्रदान केले जाणार आहेत. या पुरस्कारांसाठी निवडलेल्या सर्व मान्यवरांची यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.
ज्येष्ठ पुरस्कार विजेते
अरुण कदम (२०२५),
कंठसंगीत – धनंजय जोशी (२०२५),
वाद्यसंगीत – विजय चव्हाण (२०२५),
मराठी चित्रपट – शिवाजी लोटन पाटील (२०२५),
उपशास्त्रीय संगीत – उदय भवाळकर (२०२५),
किर्तन/समाजप्रबोधन – गहिनीनाथ ज्ञानेश्वर औसेकर महाराज (२०२५),
तमाशा – कोंडीराम आवळे (२०२५),
शाहिरी – शाहिर मधुकर मोरे (२०२५),
नृत्य – श्रीमती रंजना फडके (२०२५),
लोककला – हरिभाऊ वेरुळकर (२०२५),
आदिवासी गिरीजन – रायसिंग हिरा पाडवी (२०२५),
कलादान – चंद्रकांत घरोटे (२०२५),
प्रयोगात्मक कला अभ्यासक/पत्रकार – प्रा. आनंद गिरी (२०२४), संजीव भागवत (२०२५),
लोकनृत्य – सुभाष नकाशे (२०२४), अरविंद राजपूत (२०२५),
लावणी/संगीतबारी – श्रीमती शकुंतला नगरकर (२०२४), श्रीमती कल्पना जावळीकर (२०२५),
भारुड/विधीनाट्य/गौळण – श्रीमती पदमजा कुलकर्णी (२०२४), श्रीमती गोदावरी मुंडे (२०२५),
वाद्यनिर्मिती – युसुफ घडूलाल मुल्ला (२०२४), भालेराव नागोराव दडांजे (२०२५),
झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत – रामदास चौधरी (२०२४), बुधा भलावी (२०२५),
दशावतार/नमनखेळ/वहीगायन – ओमप्रकाश यशवंत चव्हाण (२०२४), भानुदास शंभा सावंत (२०२५),
दुर्मिळ प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जतन करणारे – धर्मा कांबळे (२०२४), श्रीमती साखराबाई टेकाळे (२०२५),
संग्रहालय/संस्था – विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट (२०२५), तांबवेश्वर शाहिरी कलापथक, बीड (तुकाराम ठोंबरे) (२०२४),
ध्वनीतंत्रज्ञ – अविनाश ओक (२०२४), महेश अंबेरकर (२०२५),
संगीत संयोजन – अमर हळदीपूर (२०२४), कमलेश भडकमकर (२०२५),
व्हॉइस ओव्हर – अंबरीश मिश्र (२०२४), उदय सबनीस (२०२५).
युवा पुरस्कार विजेते
नाटक – तेजश्री प्रधान (२०२४), भूषण कडू (२०२५),
कंठसंगीत – धनंजय म्हसकर (२०२४), मयूर सुकाळे (२०२५),
वाद्यसंगीत – ऋषिकेश जगताप (२०२४), वरद कठापूरकर (२०२५),
मराठी चित्रपट – मधुरा वेलणकर (२०२४), शंतनु रोडे (२०२५),
उपशास्त्रीय संगीत – राहुल देशपांडे (२०२४), भाग्येश मराठे (२०२५),
किर्तन/समाजप्रबोधन – जयवंत बोधले (२०२४), ज्ञानेश्वर माऊली कदम (२०२५),
तमाशा – नितीन बनसोडे (२०२४), अमृता थोरात (२०२५),
शाहिरी – शाहिर आझाद नाईकवडी (२०२४), शाहिरा अनिता खरात (२०२५),
नृत्य – वृषाली दाबके (२०२४), संतोष भांगरे (२०२५),
लोककला – संदीप पाल महाराज (२०२४), चेतन बेले (२०२५),
आदिवासी गिरीजन – साबूलाल बाबूलाल दहिकर (२०२४), गंगुबाई चांगो भगत (२०२५),
कलादान – श्रीमती कस्तुरी देशपांडे (२०२४), सिद्धेश कलिंगण (२०२५),
प्रयोगात्मक कला अभ्यासक/पत्रकार – खंडुराज गायकवाड (२०२४), तेजस्विनी आचरेकर (२०२५),
लोकनृत्य – दीपक बीडकर (२०२४), गणेश कांबळे (२०२५),
लावणी/संगीतबारी – प्रमिला लोदगेकर (२०२४), वैशाली वाफळेकर (२०२५),
भारुड/विधीनाट्य/गौळण – हमीद सय्यद (२०२४), रामानंद उगले (२०२५),
वाद्यनिर्मिती – उमाशंकर दाते (२०२४), सर्वजीत विष्णू पोळ (२०२५),
झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत – मुकेश देशमुख (२०२४), दुधराम परसराम कावळे (२०२५),
दशावतार/नमनखेळ/वहीगायन – लक्ष्मीकांत नाईक (२०२४), रामकृष्ण कैलास घुळे (२०२५),
दुर्मिळ प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जतन करणारे – रेणुका शेंडगे जेजूरीकर (२०२४), प्रसाद गरुड (२०२५),
संग्रहालय/संस्था – सव्यसाची गुरुकुलम (लखन जाधव) (२०२४), इतिहासाचे अबोल साक्षिदार बहुउद्देशीय ट्रस्ट (निलेश सकट) (२०२५),
ध्वनीतंत्रज्ञ – प्रणाम पानसरे (२०२४), विराज भोसले (२०२५),
संगीत संयोजन – अनुराग गोडबोले (२०२४), अमित पाध्ये (२०२५),
व्हॉइस ओव्हर – मेघना एरंडे (२०२४), समिरा गुजर (२०२५).
सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे. राज्यातील कलावंतांच्या सातत्यपूर्ण सर्जनशीलतेला आणि सांस्कृतिक परंपरेला मिळणारा हा सन्मान कलाक्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे.
