भडगाव प्रतिनिधी :-
१६वी थाई बॉक्सिंग फेडरेशन तर्फे
पंजाब (अमृतसर) येथे होणारी ऑल इंडिया थाई बॉक्सिंग स्पर्धा घेण्यात आली ऑल इंडिया थाई बॉक्सिंग स्पर्धेचे दिनांक ७.८.९. नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजन करण्यात आले होते येथे भारतातून तब्बल १६ राज्यातून स्पर्धकांनी भाग घेतला होता यात महाराष्ट्र, ओडिसा आसाम गुजरात पंजाब जम्मू काश्मीर मध्य प्रदेश राजस्थान, चंदिगड केरळ, अशा विविध राज्यातून स्पर्धकांनी भाग घेतला होता, यात चाळीसगाव व भडगांव तालुक्यातील 10 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यात चाळीसगाव . इझान जुबैर रंगरेज (सुवर्ण पदक) खिझर हबीब शेख (सुवर्ण पदक) मुजाक्किर मुशरीफ खान (सुवर्ण पदक)ओम गौतम गोयर (सुवर्ण पदक)हामज़ा सिराज शेख(सुवर्ण पदक), भडगाव चे अबूजर मोबिन मिर्झा (सुवर्ण पदक) जुनेद खान शाकीर खान (सुवर्ण पदक), चेतन भैय्यासाहेब भोई(सुवर्ण पदक ) प्रतीक सतिश दाभाडे (सुवर्ण पदक), आर्यन निलेश ब्राह्मणकर( सुवर्ण पदक),या सर्वांनी उत्कृष्ट कामगिरी करत .त्यांच्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन व चाळीसगाव थाई बॉक्सिंग असोसिएशन चे सचिव आयान अतिक खान. काम पाहिले. व शाहरुख नजीर मण्यार यांनी कोच काम पाहिला.
खेळाडूना जळगाव जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशन भडगांव जिल्हा अध्यक्ष श्री.हाजी जकिर कुरेशी . उपाध्यक्ष शाम पाटील व इतर संस्था पद अधिकारी डॉ. वसीम मिर्झा ,सौरभ पाटील ,संतोष पाटील ,सौरभ देशमुख , अजगर खान , हाजी खलील शेख , व खेळाडू मुख्य प्रशिक्षक अबरार खान थाई बॉक्सिंग महाराष्ट्र चे सहसचिव यांचे मार्गदर्शन लाभले . आर्यन ब्राम्हणकार हा भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी श्री. निलेश ब्राम्हणकार यांचा चिंरजीव आहे. त्याचे भडगाव पोलीस स्टेशन मार्फत व साईनगर भागातुन व बहाळ गावातुन अभिनंदन होत आहे.
