भडगाव ते वाडे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करावे.अन्यथा दि. १७ रोजी भडगाव येथे ग्रामस्थांसह उपोषण. पञकार श्री. अशोकबापु परदेशी यांचे पोलीस प्रशासनाला निवेदन.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव ते वाडे रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाच्या मागणीबाबत दि. ३ रोजी अभियंता सो, सार्वजनिक बांधकाम विभागास उपोषण करण्याबाबत निवेदन दिलेले आहे. माञ सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतलेली नाही. त्यानुसार भडगाव ते वाडे रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी मागणीसाठी दि. १७ रोजी सोमवारी सकाळी ११ वाजता भडगाव तहसिल कार्यालयासमोर उपोषणास बसण्यासाठी परवानगी मिळणेबाबत पञकार श्री. अशोकबापु परदेशी यांनी दि. १४ रोजी शुक्रवारी भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. महेश शर्मा साहेब यांना भेटुन निवेदन देण्यात आले आहे.
भडगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, भडगाव ते वाडे या रस्त्यावर ठिकठिकाणी छोटया मोठया खड्डयांचे मोठया प्रमाणात जाळे पसरलेले आहे. भडगाव ते वाडे दरम्यान भडगाव ते कोठली, कोठली ते कनाशी, गोंडगाव ते वाडे या दरम्यान रस्त्यावर पाऊसाच्या पाण्यामुळे मोठया प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांना वाहने चालवितांना मोठया ञासाचे ठरतांना दिसत आहे. वाहने पंक्चर होणे. वाहनांचे छोटे अपघात होतांना दिसत आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष झाले आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने भडगाव ते वाडे या रस्त्याच्या खड्डयांची डागडुजीचे काम करावे. अन्यथा भडगाव तहसिल कार्यालयासमोर ग्रामस्थांसह उपोषणास बसु. या आशयाचे निवेदन दि. ३/११/२०२५ रोजी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग भडगाव यांना दिलेले होते. माञ बांधकाम प्रशासनाने या निवेदनाची दखल न घेतल्याने भडगाव ते वाडे या रस्त्याच्या डागडुजी दुरुस्तीचे काम तात्काळ सुरु करण्यात यावे. अन्यथा आम्ही ग्रामस्थांसह भडगाव तहसिल कार्यालयासमोर दि. १७ रोजी सोमवारी सकाळी ११ वाजता उपोषणास बसणार आहोत. याची प्रशासनाने दखल घ्यावी. ही विनंती. असेही शेवटी निवेदनात नमुद केलेले आहे. या निवेदनावर पञकार श्री. अशोकबापु परदेशी यांची सही आहे.
भडगाव पोलीस स्टेशनला निवेदन दिल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री. महेश शर्मा साहेबांशी चर्चा झाली. श्री. महेश शर्मा साहेबांनी तात्काळ याबाबत आपण सार्वजनिक बांधकाम विभागास लेखी पञ पाठवित आहोत असे सांगीतले. तसेच श्री. महेश शर्मा साहेबांनी तात्काळ भडगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. गणेश पाटील यांचेशी या बाबत मोबाईलवरुन चर्चा केली. अभियंता श्री. गणेश पाटील साहेबांनीही आम्ही तात्काळ भडगाव ते वाडे या संपुर्ण रस्त्याचे खड्डे बुजुन डागडुजीचे कामाला सुरुवात करु असे आश्वासन दिलेले आहे. बांधकाम प्रशासनाचे व पोलीस प्रशासनाचे मनापासुन आभार.
परंतु रस्त्याच्या कामाला लगेच सुरुवात करा अशी माझी भडगाव,नवे वढधे, जुने वढधे, कोठली, देव्हारी, कनाशी, बोदर्डे, निंभोरा, लोण पिराचे, बोरनार, गोंडगाव, दलवाडे, घुसर्डी, सावदे, बांबरुड प्र. ब, नावरे, वाडे, टेकवाडे बुद्रुक आदि गावातील ग्रामस्थ, प्रवाशी, विदयार्थी वर्गातुन आहे.
