Monday, January 19, 2026
Google search engine
Home Blog Page 109

भडगाव तालुका वकील संघाची नुतन कार्यकारणी जाहीर  अध्यक्षपदी-ॲड बी.आर पाटील,उपाध्यक्षपदी-ॲड बी.टी. अहिरे,सचिवपदी-ॲड भरत ठाकरे यांची बिनविरोध निवड

0

भडगाव तालुका वकील संघाची नुतन कार्यकारणी जाहीर  अध्यक्षपदी-ॲड बी.आर पाटील,उपाध्यक्षपदी-ॲड बी.टी. अहिरे,सचिवपदी-ॲड भरत ठाकरे यांची बिनविरोध निवड

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयातील वकिल संघाची सालाबादा प्रमाणे वार्षिक निवड सन 2025 ची 31 डिंसेबर 2024 रोजी मंगळवारी खळमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली.

 

भडगाव वकील संघाची नुतन कार्यकारणीत नुतन अध्यक्षपदी लोकनियुक्त सरपंच व ॲड बी.आर.पाटील तर उपाध्यक्ष पदी ॲड.बी.टी.अहिरे,तर सचिव पदी ॲड.तथा पत्रकार भरत ठाकरे यांची सर्वानुमते बिन विरोध निवड करण्यात आली.

 

 

सदर मिंटीगच्या वेळी ॲड.तथा जेष्ठ पत्रकार प्रकाश तिवारी,ॲड.के.टी.पाटील,ॲड.ए.डी.बाग,ॲड.आर.के.वाणी.ॲड.के.ए.पवार,ॲड.रणजीत पाटील,ॲड.विनोद महाजन,ॲड.मुकुंद पाटील,ॲड.निलेश तिवारी,ॲड.गणेश वेलसे,ॲड.विजय महाजण,ॲड.वसंत चव्हाण,ॲड.आप्पासाहेब सोनवणे,ॲड.प्रकाश सोनवणे,ॲड.पी.के.जयस्वाल, ॲड.रोहीत मिसर,ॲड.महेंद्र पाटील,ॲड.हेमंत कुलकर्णी ॲड.मोहसिन खान,ॲड.आसिफ खान,सलमान मिर्झा इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित पदाधिकारींची निवड घोषीत करण्यात आली. नुतन पदाधिकारी यांचा सर्वत्र अभिनंदनांचा वर्षाव केला जात आहे.

स्मार्ट रेशनकार्ड बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला हा निर्णय.!!!

0

स्मार्ट रेशनकार्ड बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला हा निर्णय.!!!

मुंबई :-

स्थलांतरित कामगारांवर लक्ष केंद्रीत करून त्यांना स्मार्ट रेशनकार्ड देण्यात यावे. त्याचबरोबर स्मार्ट कार्ड देताना ते कुठल्याही राज्यातील असले तरी त्यांना महाराष्ट्रात कुठल्याही रास्त-भाव दुकानात धान्य मिळेल, असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला.

 

अन्नधान्य वाटपामध्ये लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात धान्य वाटप व्हावे यासाठी सर्व रास्त भाव दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटे बसवावेत, सर्व शिधापत्रिका धारकांना स्मार्ट शिधापत्रिकांचे वितरण करण्यात यावे. लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्याचे वितरण होण्याच्या दृष्टीने ‘एक गाव एक गोदाम’ उभारण्याची कार्यवाही सुरू करावी. वाहनांचे जिओ टॅगीग करावे, अन्नधान्य वाटपामध्ये ‘एक देश एक शिधापत्रिका’ धोरण राज्यात राबवण्यात येत आहे. त्याअनुषंगाने स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य वाटपामध्ये प्राधान्य देण्यात यावे. गरजू लाभार्थ्यांचा सण उत्सव उत्साहात साजरा व्हावा यासाठी राज्यात सणांच्या काळात आनंदाचा शिधा वाटप करण्यात येतो. या वाटपाची एक दिनदर्शिका तयार करण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

 

आगामी वर्षात २५ लक्ष नवीन लाभार्थ्यांचे सार्वजनिक वितरण यंत्रणेसाठी समावेशन करून त्याचे ई-केवायसी करून प्रमाणीकरण करण्याच्या सूचना देत मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, मागील 6 महिन्यात एकदाही अन्नधान्याची उचल न केलेल्या शिधापत्रिकांची तपासणी करावी, शिधापत्रिकामधून मयत व्यक्ती वगळाव्या, १०० पेक्षा जास्त वय असणाऱ्या लाभार्थ्यांची फेरतपासणी करावी. तसेच संगणकीकृत न झालेल्या १४ लक्ष लाभार्थ्याचे नाव शिधापत्रिकेत समाविष्ट करण्याकरिता विशेष मोहीम राबविण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

 

या बैठकीस अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव संजय सेठी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, सचिव विरेंद्र सिंह, सचिव रविंद्र सिंह, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पेपर विक्रेता ते संपादक.पत्रकारांच्या सुख दुःखात धावणारा पत्रकार.

0

पेपर विक्रेता ते संपादक.पत्रकारांच्या सुख दुःखात धावणारा पत्रकार.

 महाराष्ट्रातील पत्रकारांचे नेतृत्व डॉ. विश्वासराव आरोटे

 

एक वृत्तपत्र विक्रेता ते वार्ताहर अन एक वार्ताहर ते स्व दैनिकाचा संपादक, ग्रामीण भागातील तालुका पातळीवरील पत्रकार संघटना ते देश पातळी वरील पत्रकार संघटनेचे सरचिटणीस, शिक्षणासाठी झालेली परवड ते अमेरिकन विद्यापीठाची डॉक्टरेट असा चित्रपट कथानकातील प्रवास ज्यांचा वाटतो ते म्हणजे पत्रकारांचं चालत बोलत व्यासपीठ डॉ. विश्वासराव आरोटे होय…

  पत्रकारिता करताना निस्वार्थी पणाची भावना अंगीकारून पत्रकारांच्या समस्यांचे निराकरण करून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा अमृतवेल वाढविण्याचे काम व ग्रामीण पत्रकारांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम करून देणारे नेतृत्व म्हणजे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे हे होय.

         विश्वासराव आरोटे हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असणाऱ्या कळसूबाई च्या शिखर रांगा मधील अहिल्यानगर जिल्ह्यातील चितळवेढे ता. अकोले या छोट्याशा डोंगर कुशीतील आणि प्रवरामाईच्या तिरावर असलेल्या गावी त्यांचा जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थिती अतिशय गरिबीची होती. प्राथमिक शिक्षण जन्मगावी तर माध्यमिक शिक्षण मा. मधुकरराव पिचड माध्यमिक विद्यालय राजुर येथे पूर्ण केले तर महाविद्यालयीन शिक्षण अकोले महाविद्यालयात पूर्ण केले.    

       परिस्थिती सामान्य असल्यामुळे शिक्षण घेत असताना सकाळी चितळवेढे येथून दूध टाकण्याचे व वर्तमानपत्र वाटण्याचे काम करित असे. वर्तमानपत्र वाटत असताना वाचनाची आवड निर्माण झाली. वर्तमानपत्र वाचता वाचता आपण पण पत्रकार व्हावे असे मनात इच्छा निर्माण झाली. पत्रकारीतेची झालेली ओळख आज त्यांना उच्च पदावर घेऊन गेली. ग्रामीण भागात वृत्तपत्र पोचवून ग्रामीण भागातील खप वाढवायचा असेल तर त्या भागातील समस्या समजून घेऊन वृत्तपत्रात त्याची मांडणी होणे आवश्यक आहे याची जाणीव विश्वासरावांना झाल्यानंतर त्यांनी ग्रामीण भागातूनच आपल्या पत्रकारीतेचा श्रीगणेशा केला आणि ग्रामीण भागातील समस्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. ध्येयवेडी स्वप्ने उराशी बाळगून कर्तव्य करत राहिले यावेळी ग्रामीण भागातील वास्तव मांडताना अनेक अडीअडचणी आल्या. परंतु मुळातच अकोले तालुक्याला विचारांचा वारसा लाभलेला असल्यामुळे पत्रकारीता क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांशी त्यांची विचारसरणी जुळली. मार्गदर्शनाची दिशा मिळत गेली. कर्तृत्व आणि नेतृत्व याचा सुरेख संगम अस्तित्वात आला. बातमीदारी त्यांना मोठ्या पदावर घेऊन गेली. वार्ताहर म्हणून अनेक वृत्तपत्रांमध्ये काम केल्या नंतर तालुका प्रतिनिधी आणि नंतर विभागीय कार्यालयाचे उपसंपादक म्हणून त्यांनी ‘दैनिक गांवकरी’ या उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिकाची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलली. गांवकरीच्या माध्यमातून ग्रामीण भागाची, या भागातील ग्रामस्थांची विश्‍वासार्हता जपली. लेखणीला चालना देता देता ग्रामीण भागातील वास्तव मांडतांना व वृत्तपत्रात काम करत असताना ग्रामीण भागातील पत्रकारांशी त्यांची नाळ जोडली गेली त्यातूनच ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्यांची उकल झाली. समस्या सोडवण्यासाठी काही तरी केले पाहिजे या उद्देशाने संघटन बांधणी सुरू केली. त्यांचे प्रश्‍न आपल्या लेखनीच्या माध्यमातून सातत्याने मांडले. पत्रकारीता करत असतानाच ग्रामीण भागातील पत्रकारांशी देखीलत्यांची नाळ जोडली गेली. या पत्रकारांच्या समस्या त्यांना आपल्या समस्या वाटू लागल्या. या समस्या सोडविण्यासाठी काही तरी केले पाहिजे, असे सारखे वाटत होते. त्यांनी ग्रामीण भागात काम करणार्‍या पत्रकारांची मोट बांधली. सर्वांना बरोबर घेऊन अकोले तालुका ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना केली. या पत्रकार संघाच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांसाठी खर्‍या अर्थाने कार्य सुरु केले. हे काम करत असतानाच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजयजी भोकरे यांचा संपर्क आला. दोघांचेही ध्येय एकच..पत्रकारांच्या समस्या सातत्याने मांडून त्यासाठी राज्यस्तरावर नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करणे. ध्येय्य एकच असल्याने या जोडगोळीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकारसंघाच्या माध्यमातून एकत्रित काम सुरु केले.

          पत्रकारांसाठी चालविल्या जात असलेल्या या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राज्यस्तरीय अधिवेशने घेतली. जिल्ह्यात, तालुक्यात विविध मेळावे घेतले. राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील पत्रकारांना या पत्रकार संघामध्ये सामावून घेतले. प्रत्येकाला संघाचे ओळखपत्र देऊन नवी ओळख दिली. सर्वच जिल्ह्यातील पत्रकारांचा विमाकाढून खर्‍या अर्थाने पत्रकार संघ या पत्रकारांसाठी काम करत असल्याचा विश्‍वास निर्माण केला. संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अहमदनगर जिल्हाध्यक्ष आणि नंतर राज्य सरचिटणीस या पदावरकाम करण्याची संधी दिली. राज्य कार्यकारिणीवर काम करतानाच त्यांचे काम अतिशय जोमाने सुरु झाले. 

        स्पर्धा परीक्षांबरोबरच क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या गुणवंतांचा राज्यस्तरावर गौरव पत्रकार संघाच्या माध्यमातून केला जात आहे. पंडीत श्रीश्री रविशंकरजी यांनाही पत्रकार संघाने गौरविले आले. हलाखीची परिस्थिती असणार्‍या पत्रकारांना औषधोपचारासाठी व इतर गरजा भागविण्यासाठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्नही विश्‍वासराव आरोटे यांनी केला आहे. अशा राज्यभरातून अनेक पत्रकारांना संघटनेने आर्थिक मदत केली आहे.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, बाळासाहेब विखे, सुशिलकुमार शिंदे, समाजसेवक अण्णा हजारे, राज्यपाल के. विद्यासागरराव, विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील, दिवंगत गोपीनाथ मुंडे, उपमुख्यमंत्री आ. अजित पवार आदींकडे त्यांनी सातत्याने पत्रकारांच्या विविध समस्या मांडल्या. 

पत्रकारांना संरक्षण मिळावे यासाठी संरक्षण कायदा व्हावा यासाठी ते नेहमीच आग्रही राहीले. पत्रकारांवर होणार्‍या हल्ल्यांचा निषेध करत आरोपींना अटक होईपर्यंत पाठपुरावा केला. ग्रामीण भागातील पत्रकारांनाही श्रमिक पत्रकारांप्रमाणेच अ‍ॅक्रीडीशनकार्ड मिळावे, एस. टी. बस तसेच रेल्वेसारख्या विविध सवलती मिळाव्यात, शासनाने त्यांचा आरोग्य विमा काढावा, पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती द्याव्यात, पत्रकारांना निवासासी व्यवस्था उपलब्ध करावी या व अशा अनेक मागण्यांसाठी पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न विश्‍वासराव आरोटे करत आहेत. कोणताही पत्रकार असो त्यांना माऊली म्हणुन संबोधतात त्यामुळे ते अधिक जिव्हाळ्याचे सबंध प्रस्थापीत करतात.

        पत्रकार संघाने मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर केलेल्या आंदोलनाची दखल राज्यपाल विद्यासागरराव यांनीही घेतली होती.

    महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने वसंतराव मुंडे व डॉ. विश्वासराव आरोटे यांनी दिक्षा भूमी नागपूर ते मंत्रालय मुंबई अशी पत्रकार संवाद यात्रा काढली. २२ मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना दिले. पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांचे महामंडळ स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय या सरकारने घेतला. 

    त्यांच्या कार्यकाळात अनेक पुरस्कार त्यांना मिळाले असुन त्यांनी केलेल्या कार्याचा तो सन्मान आहे. पत्रकारांना विमा, हेल्मेट वाटप, आर्थिक मदत, कोरोना काळात अन्नधान्य व कपडे वाटप, गुणवंताचा सन्मान असे अनेक सामाजिक कार्याची दखल घेऊन अमेरिकन विद्यापीठाने डॉक्टरेट प्रदान केली.   

       “जे का रंजले गांजले त्यासी जो म्हणे आपले ” याप्रमाणे गरिबांना मदतीचा वसा ते अविरत पणे चालवत आहे. 

      आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने परमेश्वराकडे एकच मागेन की त्यांना भरपुर आयुष्य, चांगले आरोग्य मिळो. वाढदिवसाच्या निमित्ताने खुप खुप शुभेच्छा….!

 

संकलन:-

श्री. भाऊसाहेब वाकचौरे पाटील 

जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, नगर जिल्हा.

पुरंदर येथे ग्राहक प्रबोधन कार्यशाळा संपन्न.!!!

0

पुरंदर येथे ग्राहक प्रबोधन कार्यशाळा संपन्न.!!!

 

पुणे दि.३० तहसील कार्यालय पुरंदर आणि ग्राहक कल्याण फाउंडेशन पुरंदर तालुका कार्यकारिणी यांच्या संयुक्त विद्यमाने २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित ग्राहक जागृती सप्ताह समारोपाचा कार्यक्रम दि. ३० डिसेंबर रोजी पुरंदर येथे ग्राहक प्रबोधन कार्यशाळेच्या आयोजनाने झाला.

सासवड ता. पुरंदर येथील नवीन तहसील कार्यालयाच्या मुख्य सभागृहात पार पडलेल्या या ग्राहक प्रबोधन कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी दौंड -पुरंदर उप विभागीय अधिकारी मा. वर्षा लांडगे मॅडम होत्या.

तर कार्यशाळेत मा. इंद्रजित देशमुख (मा. आयुक्त महाराष्ट्र शासन ) यांनी “ग्राहक संरक्षण कायदा गरज व अंमलबजावणी ” या विषयावर तर ह. भ. प. तुकाराम महाराज निंबाळकर (अध्यक्ष ग्राहक कल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ) यांनी “ग्राहकांचे हक्क आणि कर्तव्य “तसेच संघटनेचे राज्य कार्यकारिणी समन्वय समिती अध्यक्ष सतीश साकोरे यांनी ” ग्राहक तक्रार निराकरण करणे ही एक कला “यावर उदबोधन केले.

विकास महाजन (पारोळा जि. जळगांव) मा. अशासकीय सदस्य राज्य ग्राहक संरक्षण परिषद, मंत्रालय मुंबई यांनी ग्राहक संरक्षण कायदयाचा इतिहास सांगीतला.

यावेळी व्यासपीठावर उप विभागीय अधिकारी वर्षा लांडगे मॅडम, पुरंदर तालुका तहसीलदार विक्रम राजपूत, गट विकास अधिकारी पुरंदर, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱी उत्तम झेंडे, संतोष बापू मगर, संतोष आबा काकडे,ग्राहक कल्याण फाउंडेशन पुणे जिल्हा अध्यक्ष सुभाष कामठे, पुरंदर तालुका अध्यक्ष रामदास मेमाणे, महिला अध्यक्षा पत्रकार छाया नानागुडे,आदि उपस्थित होते.

कार्यशाळेत प्रगतीशील शेतकरी सुभाष काळे,शिवाजी सुळके, बबन काळे,बाळासो मगर, रामदास रांजणे,तानाजी कामथे, एम. के. नाना गायकवाड,राजाभाऊ क्षीरसागर,अंकुश कामथे,सुरेश कुंभारकर, सौ. प्रतिभा उत्तम झेंडे, सौ. सुनीता रामदास मेमाणे,सौ. विजयालक्ष्मी संतोष काकडे,परवीन पानसरे,योगेश खुटवड,तुळशीराम काळे,सुखदेव पवार,यांच्यासह पांचक्रोशीतील अनेक कार्यकर्ते व शेतकरी ग्राहकांनी भाग घेतला.

सूत्रसंचालन संतोष आबा काकडे यांनी केले तर आभार संतोष बापू मगर यांनी मानले.

खोलीत झोपले होते पती-पत्नी; मध्यरात्री आवाज झाला, दार उघडताच थरकाप उडाला.!!!

0

खोलीत झोपले होते पती-पत्नी; मध्यरात्री आवाज झाला, दार उघडताच थरकाप उडाला.!!!

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री जेवण करून दोघे निवांत झोपण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले. आपण मरणार आहोत याची त्यांना जाणीवही नव्हती.

प्रत्यक्षात रात्री 3 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराबाहेर कसल्यातरी हालचाली झाल्या. बायकोला जाग आली, आणि तिने पतीलाही उठवलं, त्यानंतर पतीने दार उघडलं तेव्हा त्याला घराला आग लागल्याचे दिसले. लगेच गेट उघडून बाहेर पडण्याचा दोघांनीही प्रयत्न केला. मात्र, घराचे गेट बाहेरून बंद होते. कोणीतरी जाणूनबुजून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कसा तरी जीव वाचवण्यासाठी त्यांनी घरातून पळ काढला.

महाराष्ट्रातील भिवंडीतील निजामपुरा पोलीस स्टेशन परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. आसिफ कुरेशी आणि फरीन कुरेशी असे पीडित दाम्पत्याचे नाव आहे. मारेकऱ्यांनी दाम्पत्याला ठार मारण्याचा सपाटा लावला होता. मध्यरात्री घराला आग लावून दाम्पत्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. घराचा बाहेरचा दरवाजाही बंद होता. घराला आग लागल्याचे लक्षात येताच जोडप्याने आरडाओरडा सुरू केल्याने दोघांचा जीव वाचला.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचून तपास केला. पोलिसांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, हे जोडपे पोलिस स्टेशन हद्दीतील एका झोपडपट्टीत राहत होते. शुक्रवार ते शनिवार दरम्यान रात्री कुरेशी पत्नीसह खोलीत झोपला होता. रात्री अडीच-तीनच्या सुमारास काही लोकांनी त्याच्या घराला बाहेरून कुलूप लावून पेट्रोल टाकून घराला आग लावली. रात्री पत्नीला जाग आली तेव्हा घराला आग लागल्याचे लक्षात आले. फरीनने पतीला झोपेतून उठवले. दोघांनीही लगेच घराबाहेर पळण्याचा प्रयत्न केला.

 

कुरेशी दाम्पत्याने या सापळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही. दरम्यान, त्यांनी मदतीसाठी जोरजोरात आरडाओरडा सुरू केला, त्यानंतर आजूबाजूला राहणारे लोक त्यांना वाचवायला आले. या क्रमात फरीनचा हात भाजला. आसिफ किरकोळ जखमी झाला. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या वादातून हा हल्ला झाल्याचा आरोप आसिफ कुरेशी यांनी केला आहे. या दाम्पत्याने पोलिसांना सांगितले की, तीन महिन्यांपूर्वी त्यांचे मेहुणे तौकीरसोबत भांडण झाले होते. आसिफच्या पत्नीच्या वडिलांना मेव्हण्याने मारहाण केली होती. यानंतर त्यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आरोपी मेव्हणा केस मागे घेण्याची धमकी देत ​​होता. दोन दिवसांपूर्वी आरोपीने पीडितेच्या कुटुंबीयांना धमकावले होते. केस परत घ्या, नाहीतर आम्ही तुला जाळून टाकू, अशी धमकी त्याने दिली होती.

राष्ट्रवादीत राजकीय हालचालींना वेग, दादांचा आमदार शरद पवारांना का भेटला.?

0

राष्ट्रवादीत राजकीय हालचालींना वेग, दादांचा आमदार शरद पवारांना का भेटला.?

पुणे :-

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील अशा चर्चा सुरू आहेत. 12 डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस होता. यादिवशी दिल्लीत अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अशा महत्त्वाच्या नेत्यांनी पवारांची घरी जाऊन भेट घेतली होती.

ही भेट वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी त्यावेळी दिलं होतं. मात्र या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. याबाबतचं सूचक वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलं होतं. त्यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी देखील अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र यावं असं भाष्य केलं होतं.

या सगळ्या घडामोडीनंतर आज सोमवारी सकाळी अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली आहे. तुपे हे अजित पवारांच्या जवळचे नेते मानले जातात. अशा स्थितीत तुपे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. दोन्ही गट एकत्र येऊ शकतात, अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या. मात्र य सगळ्यावर आमदार चेतन तुपे यांना स्वत: प्रतिक्रिया दिली आहे.

दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा त्यांनी धुडकावून लावल्या आहेत. शिवाय आपण राजकीय कारणांसाठी शरद पवारांची भेट घेतली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आपण रयत शिक्षण संस्थेच्या कामानिमित्त भेट घेतली. यावर आमच्यात चर्चा झाली. बैठकीचा राजकीय हेतू नव्हता, असं स्पष्टीकरण तुपे यांनी दिलं आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चेतन तुपे म्हणाले, रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात ज्या काही गोष्टी होत्या, त्याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक होती. पश्चिम विभागातील ज्या शाखा आहेत, त्याबद्दल चर्चा झाली. नवीन वर्ष सुरू होत आहे, त्यामुळे रयतने काही गोष्टी राबवायचं ठरवलं आहे. शाळांच्या काही सुधारणा करायच्या आहेत. त्याबाबत सूचना शरद पवारांनी केल्या आहेत. माझे आणि शरद पवार यांचे कौटुंबीक संबंध आहेत, प्रत्येक गोष्ट राजकारणाशी जोडू नये. राजकारणाच्या पलीकडे जाऊन संबंध ठेवले पाहिजे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. रयत संस्थेचे इतर काही लोकही शरद पवारांना आज भेटले आहेत.

नववर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारने महिलांना दिली भेट, लाडकी बहिन योजनेचा सहावा हप्ता जाहीर

0

नववर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारने महिलांना दिली भेट, लाडकी बहिन योजनेचा सहावा हप्ता जाहीर

महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजने बाबत योजनेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील 2.46 कोटी महिलांना डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता दिला आहे.

यासाठी सरकारला 3,689 कोटी रुपये खर्च करावे लागले.

तसीच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुती सरकारच्या पहिल्या कार्यकाळात आणलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेंतर्गत सरकारने जुलै 2024 ते नोव्हेंबर 2024 या पाच महिन्यांसाठी महिलांना पैसे दिले आहे. पण विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर योजनेच्या सहाव्या हप्त्याबाबत विविध दावे-प्रतिदावे केले जात होते. तसेच, फडणवीस सरकारने या योजनेचा सहावा हप्ता डिसेंबरअखेर जारी करून भगिनींना नववर्षाची भेट दिली आहे.

2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांनी योजनेची रक्कम 1500 वरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सहाव्या हप्त्याच्या रकमेबाबतही लोकांमध्ये उत्सुकता होती. सरकार सध्या भगिनींना दरमहा केवळ 1500 रुपये मानधन देत असले तरी, मार्च 2025 मध्ये सादर होणाऱ्या नवीन अर्थसंकल्पात या योजनेची रक्कम वाढवण्याचा विचार सरकार करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंगळवारी सांगितले होते

मोठी बातमी! जमीन नोंदणीसंदर्भात 4 नवीन नियम तयार; 1जानेवारी पासून होणार लागू

0

मोठी बातमी! जमीन नोंदणीसंदर्भात 4 नवीन नियम तयार; 1 जानेवारीपासून होणार लागू

मुंबई :-

2025 पासून भारतात जमीन नोंदणी आणि मालमत्तेशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता वाढवणे, करचोरी रोखणे आणि संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि सुरक्षित करणे हा या नवीन नियमांचा मुख्य उद्देश आहे.

हे बदल केवळ जमीनदार आणि खरेदीदारांसाठीच महत्त्वाचे नाहीत, तर भाडेकरू आणि रिअल इस्टेट डेव्हलपर्ससाठीही हे बदल महत्त्वाचे आहेत.

या नवीन नियमांमुळे एकीकडे नोंदणी प्रक्रिया सुलभ आणि जलद होणार आहे, तर दुसरीकडे बनावट नोंदी आणि जमिनीचे वादही थांबणार आहेत. मग आता या नवीन नियमांचा सामान्य लोकांवर आणि रिअल इस्टेट क्षेत्रावर कसा परिणाम होईल हे समजून घेऊ.

आधार कार्ड अनिवार्य

2025 पासून जमिनीच्या नोंदणीसाठी आधार कार्ड दाखवणे बंधनकारक होणार आहे. बनावट नोंदणी रोखण्यासाठी हा नियम आणण्यात आला आहे. यामुळे मालमत्तेच्या खरेदी-विक्रीमध्ये पारदर्शकता वाढेल आणि फसवणुकीच्या घटना कमी होतील.

आधार लिंकिंगचे फायदे काय होणार.?

बनावट कागदपत्रांवर बंदी येणार

मालमत्तेच्या मालकीची सहज पडताळणी होणार

बेनामी गुणधर्मांवर नियंत्रण मिळणार

कर चोरी कमी होणार

हा नियम जमीन मालक आणि खरेदीदारांची ओळख सुनिश्चित करेल, ज्यामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारचे वाद टाळता येतील.

ऑनलाइन नोंदणी केली जाणार

नवीन नियमांनुसार, संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली जाणार. यासाठी, एक विशेष पोर्टल सुरू केले जाईल, जेथे लोक त्यांचे कागदपत्रे अपलोड करू शकतील आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतील.

ई-स्टॅम्पिंगचा उपयोग होणार

2025 पासून स्टॅम्प पेपरऐवजी इलेक्ट्रॉनिक स्टॅम्पचा वापर केला जाईल. हे प्रक्रिया जलद आणि सुरक्षित करेल. ई-स्टॅम्पिंगमुळे स्टॅम्प पेपरच्या बनावटगिरीला आळा बसण्यास मदत होईल.

डिजिटल स्वाक्षरी वापरली जाणार

नवीन नियमांनुसार रजिस्ट्रार डिजिटल स्वाक्षरी वापरतील. हे केवळ प्रक्रिया जलद करणार नाही, परंतु कागदपत्रांची सत्यता देखील सुनिश्चित करेल.

डिजिटल स्वाक्षरीचे फायदे

उच्च सुरक्षा

जलद प्रक्रिया

दूरस्थ प्रमाणीकरण वैशिष्ट्य

पेपरलेस पद्धत

डिजिटल स्वाक्षरीमुळे, कागदपत्रांमध्ये कोणताही बदल किंवा छेडछाड होण्याची शक्यता नसणार.

 

भाजपची मोठी कारवाई: पक्षाविरोधात काम करणाऱ्या 11 जणांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी

0

भाजपची मोठी कारवाई: पक्षाविरोधात काम करणाऱ्या 11 जणांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भाजपने पक्षाविरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर कठोर पावले उचलली आहेत. अकोला जिल्ह्यात पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम केल्याच्या आरोपावरून जिल्हा परिषद सदस्यासह 11 लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील (Kishore Mangte Patil) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोट मतदारसंघात पक्षाच्या उमेदवाराविरोधात या नेत्यांनी काम केल्याचे निष्पन्न झाले. यामुळे पक्षाची निवडणूक कामगिरी प्रभावित झाली, ज्यावरून ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना कळवण्यात आली असून पुढील निवडणुकांमध्ये पक्षशिस्त पाळण्यासाठी हा इशारा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

निलंबित व्यक्तींची नावे:

 

प्रकाश आतकड (जिल्हा परिषद सदस्य)

राजेश उर्फ विष्णू येऊल (पंचायत समिती सदस्य)

मंगेश चिखले (माजी नगरसेवक)

प्रा. राजेंद्र पुंडकर (किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष)

विशाल गणगणे (ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष)

अरविंद लांडे (माजी तालुकाध्यक्ष)

राजेश पाचडे (माजी तालुका सरचिटणीस)

विष्णू बोडखे (ओबीसी आघाडी प्रदेश सदस्य)

सुनील गिरी (माजी तालुका सरचिटणीस)

नीलेश तिवारी (युवा मोर्चाचे माजी सरचिटणीस)

चंचल पितांबरवाले (माजी युवती प्रमुख, अकोला ग्रामीण)

म्हणून पार्टीच्या निमंत्रण पत्रिकेसोबत Condom आणि ORS वाटले; पुण्यातील पबचा धक्कादायक खुलासा.!!!

0

म्हणून पार्टीच्या निमंत्रण पत्रिकेसोबत Condom आणि ORS वाटले; पुण्यातील पबचा धक्कादायक खुलासा.!!!

पुणे

राज्याची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यात एका पबच्या निमंत्रण पत्रिकेमुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीच्या निमंत्रणासाठी निमंत्रण पत्रिकेसोबत चक्क कंडोम आणि ओआरएसचे पाकीटे देण्यात आले आहे.या प्रकारमुळे खळबळ उडाली आहे. यानंतर पबने याबाबत खुलासा केला आहे.

पुण्यात नव वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पब कडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आले आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पब कडून नववर्षासाठी आयोजित पार्टीच्या निमंत्रितांसाठी या दोन वस्तू देण्यात आल्या आहेत. तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देणार असल्याचा दावा या पब ने केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाब सुद्धा नोंद केले आहेत. या पब व्याव्यस्थापकडून पोलिसांनी याची माहिती घेतली आहे मात्र कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

दुसऱ्या बाजूला, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

“पुण्यातील मुंढवा या रेस्टॉरंट पबने नववर्षानिमित्ताने नियमित ग्राहक असलेल्या तरुणांना निमंत्रणे पाठवताना कंडोमच्या पाकिटांसह इलेक्ट्रा ओआरएस वितरित केले आहे. हे कृत्य पुणे शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला न शोभणारे आहे,” असे या पत्रात लिहले आहे. “अशा कृतींमुळे तरुणांमध्ये चुकीचे संदेश पोहोचण्याची भीती असून, समाजात गैरसमज आणि चुकीच्या सवयी रुजण्याचा धोका आहे,” असं सुद्धा या पत्रात नमूद आहे.

error: Content is protected !!