कजगाव (ता. भडगाव) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

कजगाव (ता. भडगाव) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरीकजगाव (ता. भडगाव) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

भडगाव ता.प्रतिनिधी : आमीन पिंजारी,

कजगाव (ता. भडगाव) येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त सकाळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यानंतर सकाळी १० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. दिवसभर विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी तसेच युवकांनी विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमांना रंगत आणली. गावातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

संध्याकाळी सर्व समाज बांधवांच्या सहभागातून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. घोषणाबाजी आणि उत्साही वातावरणामुळे संपूर्ण गावात जल्लोषाचे चित्र पाहायला मिळाले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील सर्व समाज बांधवांनी सक्रिय सहभाग नोंदविला. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी भडगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एकशिंगे साहेब, पीएसआय करकार मॅडम, पोलीस हवालदार किशोर सोनवणे, निलेश ब्रह्मानकार, सुनील राजपूत तसेच होमगार्ड कर्मचारी यांनी उपस्थित राहून चोख बंदोबस्त ठेवला.

किशन–क्लासेनचा धडाका, हिंगेचा विश्वविक्रमी पदार्पण; हैदराबादची राजस्थानवर ५७ धावांनी दणदणीत मात

किशन–क्लासेनचा धडाका, हिंगेचा विश्वविक्रमी पदार्पण; हैदराबादची राजस्थानवर ५७ धावांनी दणदणीत मात

किशन–क्लासेनचा धडाका, हिंगेचा विश्वविक्रमी पदार्पण; हैदराबादची राजस्थानवर ५७ धावांनी दणदणीत मातकिशन–क्लासेनचा धडाका, हिंगेचा विश्वविक्रमी पदार्पण; हैदराबादची राजस्थानवर ५७ धावांनी दणदणीत मात

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील २१व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर ५७ धावांनी दणदणीत विजय मिळवत स्पर्धेत दमदार पुनरागमन केले. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद येथे झालेल्या या उच्च धावसंख्येच्या सामन्यात हैदराबादने २० षटकांत २१६/६ धावांचा भक्कम डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात राजस्थानचा डाव १९ षटकांत १५९ धावांवर आटोपला. इशान किशनच्या झंझावाती फलंदाजीने आणि प्रफुल हिंगेच्या विश्वविक्रमी पदार्पणाने सामन्याचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकला.

हैदराबादची सुरुवात धक्कादायक झाली. अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मात्र त्यानंतर ट्रॅव्हिस हेडने १८ धावा करत डाव सावरला आणि इशान किशनने अवघ्या ४४ चेंडूत ९१ धावांची स्फोटक खेळी साकारत राजस्थानच्या गोलंदाजांवर सातत्याने दबाव ठेवला. दुसऱ्या टोकाला हेन्रिख क्लासेनने २६ चेंडूत ४० धावांची प्रभावी साथ दिली. किशन–क्लासेन यांची निर्णायक भागीदारी हा डावाचा खरा कणा ठरली. याच भागीदारीमुळे हैदराबादने २१० चा टप्पा सहज ओलांडला. शेवटच्या षटकांत सलिल अरोराने १३ चेंडूत २४ नाबाद धावा करत डावाला वेगवान फिनिश दिला.

राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने ४ षटकांत ३७ धावांत २ बळी घेत सुरुवातीला प्रभाव टाकला. संदीप शर्मानेही महत्त्वाचा बळी घेत काहीसा ब्रेक लावला. मात्र सामन्याचा पहिला टर्निंग पॉइंट १७व्या षटकात दिसला. त्या षटकात किशनने सलग मोठे फटके खेचत धावगती अचानक वाढवली. शेवटच्या चार षटकांत उभारलेल्या अतिरिक्त ५० पेक्षा अधिक धावा अखेरीस निर्णायक ठरल्या.

२१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात पूर्णपणे कोलमडली. प्रफुल हिंगेने पदार्पणाच्या पहिल्याच षटकात ३ बळी घेत राजस्थानच्या वरच्या फळीला जबर धक्का दिला. हा सामन्याचा खरा टर्निंग पॉइंट ठरला. डोनोव्हन फरेराने ४४ चेंडूत ६९ धावांची झुंजार खेळी करत लढा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या टोकाला रविंद्र जाडेजाने ३२ चेंडूत ४५ धावा करत साथ दिली. फरेरा–जाडेजा यांची भागीदारी काही काळ आशादायक वाटत होती, पण आवश्यक धावगती सातत्याने वाढत गेल्याने दबाव राजस्थानवरच राहिला.

सामन्याचा दुसरा निर्णायक टप्पा १४व्या षटकात दिसला. त्या षटकात साकीब हुसेनने सलग दोन विकेट्स घेत राजस्थानचा कणा मोडला. त्या दोन विकेट्सनंतर राजस्थानची उरलेली आशाही जवळपास संपुष्टात आली. त्याच्या ४ षटकांत २४ धावांत ४ बळी या भेदक स्पेलने विजयावर शिक्कामोर्तब केले. हिंगेनेही ४/३४ अशी विक्रमी कामगिरी नोंदवत पदार्पण संस्मरणीय केले.

या सामन्यात अनेक महत्त्वाचे विक्रम नोंदले गेले. प्रफुल हिंगे आयपीएल इतिहासात पदार्पणाच्या पहिल्याच षटकात ३ बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला. इशान किशनची ४४ चेंडूत ९१ धावांची खेळी या मोसमातील सर्वात प्रभावी डावांपैकी एक मानली जात आहे. हैदराबादचा ५७ धावांचा हा विजय नेट रनरेटच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा ठरला. राजस्थानचा सलग विजयाचा आलेख या सामन्याने खंडित केला.

या विजयाने सनरायझर्स हैदराबादचा आत्मविश्वास निश्चितच उंचावला आहे. पुढील २२व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ही लढत एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेपॉक, चेन्नई येथे रंगणार आहे. त्या सामन्यात फिरकीला साथ देणारी खेळपट्टी, मधल्या षटकांतील संयम आणि मोठ्या भागीदाऱ्या किती निर्णायक ठरतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. चेपॉकवरील फिरकीचा कस आणि कोलकाताच्या आक्रमक मधल्या फळीची परीक्षा यामुळे पुढील सामना अधिकच रंगतदार होणार आहे.

आदर्श कन्या विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य वक्तृत्व स्पर्धा संपन्न

आदर्श कन्या विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य वक्तृत्व स्पर्धा संपन्न

आदर्श कन्या विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य वक्तृत्व स्पर्धा संपन्न

भडगाव (जावेद शेख) –

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुष्प द्वितीय दिन, रविवार दि. १२ एप्रिल २०२६ रोजी आदर्श कन्या विद्या मंदिर येथे भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेचा विषय महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित होता. विद्यार्थ्यांनी दोन्ही महापुरुषांच्या विचारांवर प्रभावी मांडणी करत उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमाचे उद्घाटन युवराज आबा सुर्यवंशी (उपाध्यक्ष, माऊली फाउंडेशन) यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी धम्मपाल सुरवाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून भडगाव तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील उपस्थित होते.

या स्पर्धेत सुमनताई गिरीधर पाटील विद्यालय, काकासाहेब पूर्णपत्रे विद्यालय चाळीसगाव, लाडकुबाई माध्यमिक विद्यालय, एम.एम. कॉलेज पाचोरा, शिंदे इंटरनॅशनल पाचोरा, जामनेर विद्यालय तसेच आदर्श कन्या विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

स्पर्धेचे परीक्षण सौ.उज्वला देवकर व महेंद्रकुमार सावकारे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख अशोक खेडकर, रवींद्र जाधव, जुलाल सोनवणे, राहुल जाधव, दीपक केदार, समाजसेवक जाकीर कुरेशी, सोनार मामा, प्रवीण पाटील, दयाराम वाघ, विद्यार्थी-पालक तसेच माजी नगरसेविका योजना ताई पाटील यांचे सहकार्य लाभले.

तसेच भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी दिनकर वाल्हे, रेखा वाल्हे, प्रभाकर पवार व प्रा. बी. एस. भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले.

एकूणच, आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित या वक्तृत्व स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, विचारशक्ती व वक्तृत्व कौशल्य विकसित होण्यास मोठी चालना मिळाली.

महात्मा फुले द्विशताब्दी गौरव पुरस्कार’ जाहीर

भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडीतर्फे ‘महात्मा फुले द्विशताब्दी गौरव पुरस्कार’ जाहीर

भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडीतर्फे ‘महात्मा फुले द्विशताब्दी गौरव पुरस्कार’ जाहीरमहात्मा फुले द्विशताब्दी गौरव पुरस्कार’ जाहीर

पुणे (गुरुदत्त वाकदेकर): भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नागरिक आघाडीच्या सांस्कृतिक विभागातर्फे सामाजिक क्षेत्रातील मौलिक योगदानाबद्दल तुळसीदास उणेचा, मदन डांगी, भारती महाडिक, सारिका सासवडे आणि प्रिया प्रमोद दामले यांना ‘महात्मा फुले द्विशताब्दी गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा ज्येष्ठ नागरिक आघाडीच्या सांस्कृतिक विभागाचे शहर अध्यक्ष डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी केली. सामाजिक बांधिलकी, जनजागृती आणि समाजोपयोगी उपक्रमांत सातत्याने योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुरस्कार वितरण सोहळा लवकरच पुणे येथे ज्येष्ठ नागरिक आघाडीचे अध्यक्ष पोपटराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याची माहितीही डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी दिली.

महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला नवी प्रेरणा देण्याचा हा उपक्रम असल्याने सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात या घोषणेचे स्वागत होत आहे.

कासोदा येथे पूर्वीच्या आर्थिक वादातून दोन गटांमध्ये मारहाण; गुन्हे दाखल

कासोदा येथे पूर्वीच्या आर्थिक वादातून दोन गटांमध्ये मारहाण; गुन्हे दाखलकासोदा येथे पूर्वीच्या आर्थिक वादातून दोन गटांमध्ये मारहाण; गुन्हे दाखल

कासोदा प्रतिनिधी :–

येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्वीच्या आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून दोन गटांमध्ये मारहाणीच्या घटना घडल्या असून, दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी रात्री टी.टी.एस. चौक व गरीब नवाज चौक परिसरात या घटना घडल्या. पहिल्या घटनेत फिर्यादी शौएब मुस्तफाखान (वय २६, व्यवसाय – केटरिंग) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पूर्वीच्या आर्थिक व्यवहारावरून वाद सुरू होता. याच वादातून आरोपींनी त्यांना फोन करून बोलावले. रात्री सुमारे ९.३० वाजता टी.टी.एस. चौकात जात असताना काही जणांनी एकत्र येऊन त्यांना अडवून शिवीगाळ करत लोखंडी रॉड व काठ्यांनी मारहाण केली. या घटनेत फिर्यादीच्या हात व डोक्याला दुखापत झाली.

तसेच, याच रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या घटनेत फिर्यादीचा भाऊ शाकीब मुन्नाफखान यालाही आरोपींनी अडवून काठ्यांनी व धारदार हत्याराने मारहाण केली, ज्यात त्याच्या पाय व चेहऱ्यावर दुखापत झाली.

दरम्यान, दुसऱ्या बाजूने फिर्यादी हसीन खान जमशेर खान (वय ३३, व्यवसाय – चादर विक्री) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रात्री ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान काही आरोपींनी त्यांच्या दुकानात घुसून पूर्वीच्या पैशांच्या वादातून मारहाण केली. आरोपींनी लोखंडी फाट्याने तोंड, ओठ व डोक्यावर प्रहार करून दुखापत केली तसेच गळ्यातील चांदीची चैन जबरदस्तीने तोडून नुकसान केले व जीवे मारण्याची धमकी दिली.

दोन्ही घटनांमध्ये संबंधित आरोपींविरुद्ध कासोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

आरसीबीचा मुंबईवर १८ धावांनी दमदार विजय; फिल सॉल्ट–पाटीदारचा झंझावात

आरसीबीचा मुंबईवर १८ धावांनी दमदार विजय; फिल सॉल्ट–पाटीदारचा झंझावात

आरसीबीचा मुंबईवर १८ धावांनी दमदार विजय; फिल सॉल्ट–पाटीदारचा झंझावात

आरसीबीचा मुंबईवर १८ धावांनी दमदार विजय; फिल सॉल्ट–पाटीदारचा झंझावात

आरसीबीचा मुंबईवर १८ धावांनी दमदार विजय

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील २०व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सवर १८ धावांनी प्रभावी विजय मिळवत गुणतालिकेत आपले स्थान अधिक मजबूत केले. वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे झालेल्या या धावांचा पाऊस पाडणाऱ्या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत २४०/४ धावांचा प्रचंड डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा डाव २० षटकांत २२२/५ धावांवर थांबला. फिल सॉल्टच्या तडाखेबाज सुरुवातीने आणि रजत पाटीदारच्या वेगवान अर्धशतकाने सामन्याचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकला.

आरसीबीची सुरुवात अत्यंत आक्रमक झाली. फिल सॉल्टने अवघ्या ३६ चेंडूत ७८ धावांची स्फोटक खेळी साकारत मुंबईच्या वेगवान गोलंदाजांवर पहिल्यापासून दबाव आणला. चौकार-षटकारांचा पाऊस पाडत त्याने पॉवरप्लेमध्येच सामन्याचा सूर आरसीबीच्या बाजूने झुकवला. दुसऱ्या टोकाला कर्णधार रजत पाटीदारने २० चेंडूत ५३ धावांची झंझावाती खेळी करत वेग कायम ठेवला. सॉल्ट–पाटीदार यांची शतकी वेगवान भागीदारी हा डावाचा खरा पाया ठरली. याच भागीदारीमुळे आरसीबीने २४०/४ अशी या हंगामातील सर्वात दमदार धावसंख्यांपैकी एक उभारली.

मुंबईकडून हार्दिक पंड्याने ४ षटकांत ३९ धावांत १ बळी घेत काहीसा प्रतिकार केला. मिशेल सॅन्टनरने मधल्या षटकांत नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र सामन्याचा पहिला टर्निंग पॉइंट १५व्या षटकात दिसला. त्या षटकात आरसीबीने सलग मोठे फटके खेचत धावगती अचानक वाढवली. शेवटच्या पाच षटकांत उभारलेल्या अतिरिक्त ६० पेक्षा अधिक धावा अखेरीस निर्णायक ठरल्या.

२४१ धावांच्या प्रचंड आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात अपेक्षेप्रमाणे वेगवान झाली नाही. काही विकेट्स झटपट गमावल्यानंतर शेर्फेन रदरफोर्डने अवघ्या ३१ चेंडूत ७१ धावांची तुफानी खेळी करत सामना पुन्हा रंगतदार केला. दुसऱ्या टोकाला हार्दिक पंड्याने २२ चेंडूत ४० धावा करत साथ दिली. रदरफोर्ड–हार्दिक यांची आक्रमक भागीदारी हा मुंबईच्या पुनरागमनाचा कणा ठरली. दोघांनी डेथ ओव्हर्सपूर्वी समीकरण पुन्हा जिवंत केले.

सामन्याचा खरा टर्निंग पॉइंट १८व्या षटकात दिसला. त्या षटकात सुयश शर्माने अचूक लांबीवर मारा करत मुंबईचा वेग अचानक रोखला. त्याच्या ४ षटकांत ४७ धावांत २ बळी या स्पेलने मुंबईचा पाठलाग निर्णायक क्षणी विस्कळीत केला. १८व्या षटकातील किफायतशीर गोलंदाजीने मुंबईच्या विजयाच्या आशा जवळपास संपवल्या. त्या षटकामुळे सामना पूर्णपणे मुंबईच्या हातातून निसटला. शेवटच्या दोन षटकांत आवश्यक धावगती हाताबाहेर गेली आणि मुंबई २२२/५ पर्यंतच मजल मारू शकली.

या सामन्यात अनेक महत्त्वाचे विक्रम नोंदले गेले. आरसीबीचा हा चार सामन्यांतील तिसरा विजय ठरला. २४०/४ ही धावसंख्या वानखेडेवरील या हंगामातील सर्वोच्च धावसंख्यांपैकी एक ठरली. फिल सॉल्टचे ३६ चेंडूत ७८ धावांचे अर्धशतक या मोसमातील सर्वात वेगवान प्रभावी डावांपैकी एक मानले जात आहे. मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव त्यांच्या मोहिमेसाठी धोक्याची घंटा ठरला.

या विजयाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आत्मविश्वास आणखी उंचावला आहे. पुढील २१व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स ही लढत हैदराबादमध्ये रंगणार आहे. या सामन्यात पॉवरप्लेमधील आक्रमण, मधल्या षटकांतील फिरकीचे नियंत्रण आणि डेथ ओव्हर्समधील अचूक अंमलबजावणी किती निर्णायक ठरते, याची प्रभावी पार्श्वभूमी या मुंबई–आरसीबी लढतीने तयार करून दिली आहे. हैदराबादच्या फलंदाजीचा वेग आणि राजस्थानच्या संतुलित गोलंदाजीची कसोटी पाहायला मिळणार असल्याने पुढील सामना अधिकच रंगतदार होणार आहे.

गिल–बटलरची अर्धशतकी भागीदारी,

गिल–बटलरची अर्धशतकी भागीदारी, प्रसिद्धचा भेदक मारा; गुजरातची लखनौवर ७ गडी राखून दणदणीत मात

गिल–बटलरची अर्धशतकी भागीदारी, प्रसिद्धचा भेदक मारा; गुजरातची लखनौवर ७ गडी राखून दणदणीत मात

गिल–बटलरची अर्धशतकी भागीदारी,

गिल–बटलरची अर्धशतकी भागीदारी,

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील १९व्या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सवर ७ गडी राखून प्रभावी विजय मिळवत गुणतालिकेत दमदार झेप घेतली. भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम, लखनौ येथे झालेल्या या सामन्यात लखनौने २० षटकांत १६४/८ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात गुजरातने १८.४ षटकांत १६५/३ धावा करत ८ चेंडू राखून लक्ष्य गाठले. शुबमन गिल आणि जोस बटलर यांच्या अर्धशतकी खेळींसह प्रसिद्ध कृष्णाच्या भेदक गोलंदाजीने सामन्याचा चेहरामोहरा बदलून टाकला.

लखनौची सुरुवात सावध झाली. एडन मार्करमने २१ चेंडूत ३० धावा करत डावाला गती देण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या टोकाला विकेट्स नियमित पडत राहिल्याने मोठी भागीदारी उभी राहू शकली नाही. निकोलस पूरनला अपेक्षित मोठी खेळी करता आली नाही. मधल्या षटकांत प्रसिद्ध कृष्णाने अचूक टप्प्यावर मारा करत लखनौच्या फलंदाजीचा कणा मोडला. मार्करमसह मधल्या फळीतील महत्त्वाच्या विकेट्स घेत त्याने धावगतीवर प्रभावी नियंत्रण ठेवले. परिणामी लखनौ १६४/८ पर्यंतच मजल मारू शकला.

गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णाने ४ षटकांत २८ धावांत ४ बळी घेत सामन्याचा पहिला टर्निंग पॉइंट घडवला. त्याच्या या स्पेलमुळे लखनौ १८० च्या दिशेने जाण्यापासून रोखला गेला. अशोक शर्माने २ बळी घेत दुसऱ्या टोकाने प्रभावी साथ दिली. पॉवरप्लेनंतर लखनौला मोठे फटके खेळता न आल्याने शेवटच्या षटकांत दबाव वाढत गेला.

१६५ धावांच्या पाठलागात गुजरातची सुरुवात आत्मविश्वासपूर्ण झाली. कर्णधार शुबमन गिलने ४० चेंडूत ५६ धावांची संयमी पण प्रभावी खेळी साकारली. दुसऱ्या टोकाला जोस बटलरने ३७ चेंडूत ६० धावांची झंझावाती खेळी करत लखनौच्या गोलंदाजांवर सातत्याने दबाव ठेवला. गिल–बटलर यांची अर्धशतकी भागीदारी हा विजयाचा खरा पाया ठरली. दोघांनी पॉवरप्लेनंतर फिरकीवर अचूक हल्ला चढवत आवश्यक धावगती पूर्णपणे गुजरातच्या नियंत्रणात ठेवली.

सामन्याचा खरा टर्निंग पॉइंट १४व्या षटकात दिसला. त्या षटकात बटलरने सलग दोन चौकार आणि एक षटकार खेचत लखनौच्या हातातील नियंत्रण पूर्णपणे हिसकावून घेतले. त्या एका षटकानंतर विजयाचे पारडे स्पष्टपणे गुजरातच्या बाजूला झुकले. शेवटी वॉशिंग्टन सुंदरने १३ चेंडूत २१ नाबाद धावा करत डावाला शांत फिनिश दिला. गुजरातने १८.४ षटकांत १६५/३ धावा करत ७ गडी राखून सामना जिंकला.

लखनौकडून प्रिन्स यादव आणि दिग्वेश राठी यांनी प्रत्येकी १ बळी घेत प्रतिकार केला. मात्र गिल–बटलरसमोर त्यांचा प्रभाव मर्यादित राहिला. डेथ ओव्हर्सपूर्वीच सामना संपल्याने लखनौच्या गोलंदाजीतील अंमलबजावणीतील उणिवा पुन्हा समोर आल्या.

या सामन्यात अनेक महत्त्वाचे विक्रम नोंदले गेले. गुजरात टायटन्सने सलग दुसरा विजय मिळवत गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली. प्रसिद्ध कृष्णाचे ४/२८ हे या हंगामातील गुजरातकडून सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शनांपैकी एक ठरले. जोस बटलरचे ३७ चेंडूत ६० धावांचे अर्धशतक दबावाखाली खेळलेल्या सर्वोत्तम डावांपैकी एक मानले जात आहे. लखनौचा मधल्या षटकांतील संथ वेग त्यांच्या पराभवाचे मुख्य कारण ठरला.

या विजयाने गुजरात टायटन्सचा आत्मविश्वास आणखी उंचावला आहे, तर लखनौसमोर आता मधल्या फळीतील सातत्य, शेवटच्या षटकांतील गती आणि मोठी भागीदारी उभारणे ही तीन मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. स्पर्धेतील पुढील सामन्यांसाठी हा निकाल रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची पार्श्वभूमी ठरणार आहे.

खेडमध्ये फुले विचारांचा काव्यजागर; विलास बाबर यांना ‘काव्यकस्तुरी’ पुरस्कार

खेडमध्ये फुले विचारांचा काव्यजागर; विलास बाबर यांना ‘काव्यकस्तुरी’ पुरस्कार

खेडमध्ये फुले विचारांचा काव्यजागर; विलास बाबर यांना ‘काव्यकस्तुरी’ पुरस्कार

खेडमध्ये फुले विचारांचा काव्यजागर; विलास बाबर यांना ‘काव्यकस्तुरी’ पुरस्कार

खेडमध्ये फुले विचारांचा काव्यजागर; विलास बाबर यांना ‘काव्यकस्तुरी’ पुरस्कार

राजगुरुनगर (गुरुदत्त वाकदेकर): येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा आणि महात्मा फुले समाज विकास प्रतिष्ठान, खेड यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी जयंती वर्षानिमित्त फुले विचारांचा जागर करणारे भव्य कविसंमेलन ११ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सावित्रीबाई फुले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी आणि केंद्रीय गृह मंत्रालयातील भाषा अनुवादक अधिकारी डॉ. संजय बोरुडे उपस्थित होते.

कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी श्रीकांत ढेरंगे होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शांताराम (बापू) घुमटकर होते. यावेळी आदर्श शिक्षक जी. रं. शिंदे, विद्या पं. समिती सदस्य शंकरराव कावडे आणि साहित्य परिषदेचे अध्यक्ष कवी संतोष गाढवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि महात्मा फुले–सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. डॉ. संजय बोरुडे, श्रीकांत ढेरंगे आणि शांताराम (बापू) घुमटकर यांनी फुले विचारांचे सामाजिक आणि साहित्यिक महत्त्व अधोरेखित करणारी मनोगते व्यक्त केली.

मुंबई, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच आसपासच्या परिसरातून आलेल्या सुमारे ४० कवींनी प्रबोधनपर कविता सादर करून सभागृहात विचारांचा जागर घडवून आणला. सर्व सहभागी कवींना आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

याच प्रसंगी शैलेश गायकवाड, विलास बाबर, अलका भवारी, कमल कळमकर आणि डी. के. वडगांवकर यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष सन्मानाने गौरविण्यात आले. पुणे येथील विलास बाबर यांना त्यांच्या सातत्यपूर्ण साहित्यसेवेबद्दल ‘क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले काव्यकस्तुरी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ‘काव्य वर्षाविलास’, ‘वर्षाधारा’ हे काव्यसंग्रह आणि ‘विलासचे वैचारिक वैभव’ हा ग्रंथ प्रकाशित असून विविध वर्तमानपत्रांतून ते सातत्याने लेखन करत असल्याचा विशेष उल्लेख यावेळी करण्यात आला.

कवी दत्ता सुकाळे, जी. रं. शिंदे आणि प्रा. स्वाती भोसले यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. कवी गजानन ऊफाडे आणि रुपाली मेदगे यांनी सूत्रसंचालन केले, तर मधुकर गिलबिले यांनी आभार मानले. या कार्यक्रमाने फुले विचारांना काव्यरूपातून अभिवादन करत सामाजिक प्रबोधनाचा प्रभावी संदेश दिला.

बात्सर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे बॅनर फाडल्या प्रकरणी भडगाव पोलिसात एका जणा विरोधात गुन्हा दाखल 

बात्सर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे बॅनर फाडल्या प्रकरणी भडगाव पोलिसात एका जणा विरोधात गुन्हा दाखल 

बात्सर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे बॅनर फाडल्या प्रकरणी भडगाव पोलिसात एका जणा विरोधात गुन्हा दाखल बात्सर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे बॅनर फाडल्या प्रकरणी भडगाव पोलिसात एका जणा विरोधात गुन्हा दाखल 

भडगाव प्रतिनिधी :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेला बॅनर फाडल्याची घटना बात्सर ता.भडगाव परिसरात घडली असून या प्रकरणी संबंधिता विरुद्ध भडगांव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी- रामेश्वर विरभान वाघ रा. बात्सर यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, दि.१२ एप्रिल रात्री १२ ते दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास बात्सर बसस्टँड चौकतील बॅनर संशंयित आरोपी वाल्मिक राजेंद्र गायकवाड रा.पिचर्डे ता. भडगांव याने हेतुपुरस्सरपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावलेला बॅनर फाडून नुकसान केले. या कृत्यामुळे फिर्यादीच्या सामाजिक तसेच भावनिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या तक्रारीनुसार भडगाव पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरुद्ध भा.दं न्याय संहिता २०२३ चे कलम २९९ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा प्रकार खोडसाळपणातून घडल्याचे फिर्यादीत स्पष्ट करण्यात आले आहे.

गुन्हा नोंद झाल्यानंतर प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून, तपासाची जबाबदारी पोलीस ठाण्याचे सपोनि प्रताप एकशिंगे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार मुकुंद परदेशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. पुढील तपासानंतर अधिक माहिती स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

जळगावच्या CRPF जवान जावेद अहमद यांना 60 लाखांची मदत | Sopore हल्ल्यात दाखवले शौर्य

जळगावच्या सुपुत्र CRPF जवान जावेद अहमद यांना ६० लाखांची मदत; Sopore हल्ल्यातील शौर्याचा गौरव

जळगाव, प्रतिनिधी :-

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील सुपुत्र आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) चे जवान जावेद अहमद यांच्या अद्वितीय शौर्याचा गौरव करत महाराष्ट्र शासनाने त्यांना ६० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून ही मदत नुकतीच वितरित करण्यात आली आहे. त्यांच्या धाडसी कामगिरीमुळे संपूर्ण जिल्ह्यात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.

Sopore हल्ल्यात दाखवले अप्रतिम धैर्य

१८ एप्रिल २०२० रोजी जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे दहशतवाद्यांनी CRPF जवानांच्या ताफ्यावर अचानक हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात गोळीबार सुरू असताना जवान जावेद अहमद गंभीर जखमी झाले होते.

तथापि, स्वतः जखमी असूनही त्यांनी अपार धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा दाखवत वाहनावरील नियंत्रण गमावले नाही. त्यांनी अत्यंत प्रसंगावधान राखत वाहन सुरक्षित स्थळी नेले, ज्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांचे प्राण वाचले. त्यांच्या या शौर्यपूर्ण कृतीमुळे मोठी जीवितहानी टळली.

गंभीर जखम आणि ७४% अपंगत्व

या हल्ल्यात त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. उपचारांनंतर त्यांना ७४ टक्के कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. एवढ्या मोठ्या शारीरिक अडचणींनंतरही त्यांनी खचून न जाता देशसेवेचा मार्ग सोडला नाही, हे विशेष उल्लेखनीय आहे.

त्यांची जिद्द, देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठा ही आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

महाराष्ट्र शासनाकडून ६० लाखांची मदत

जवान जावेद अहमद यांच्या या शौर्यपूर्ण कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजना’ अंतर्गत त्यांना ६० लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली.

१० एप्रिल २०२६ रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ही मदत त्यांना प्रदान करण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांना धनादेश सुपूर्द करण्यात आला.

प्रशासन आणि मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, प्रशासनातील मान्यवर तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. सर्वांनी जवान जावेद अहमद यांच्या शौर्याचे कौतुक करत त्यांना सलाम केला.

जळगावचा अभिमान – प्रेरणादायी शौर्यगाथा

जावेद अहमद यांची ही शौर्यगाथा केवळ जळगाव जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी अभिमानाची बाब ठरत आहे. जीव धोक्यात घालून सहकाऱ्यांचे प्राण वाचवणाऱ्या या जवानाने खऱ्या अर्थाने देशसेवेचे उदाहरण घालून दिले आहे.

त्यांच्या कार्यामुळे समाजात देशभक्तीची भावना अधिक दृढ होत असून अनेक युवकांना सैन्यात सामील होण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.

Don`t copy text!