अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधारित शिक्षणाची नवी संधी उपलब्ध झाली आहे. स्वातंत्र्य सेनानी जोसेफ (काका) बापटिस्टा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंधेरी येथे ऑगस्ट २०२६ प्रवेश सत्रासाठी विविध रोजगाराभिमुख व्यवसायांमध्ये प्रवेशासाठी जागा उपलब्ध असल्याची माहिती संस्थेमार्फत देण्यात आली आहे.

यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत वूड वर्क टेक्निशियन (कारपेंटर), वेल्डर, कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (दिव्यांगांसाठी), इलेक्ट्रिशियन, फिटर, मशिनिस्ट, टर्नर, वायरमन आणि मेकॅनिक मोटर व्हेईकल या विविध तांत्रिक व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे.

काही व्यवसायांसाठी दहावी उत्तीर्ण तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. काही तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी दहावीसह विज्ञान आणि गणित विषयाची अट लागू करण्यात आली आहे.

प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश संकेतस्थळ https://admission.dvet.gov.in येथे ऑनलाईन अर्ज करून आवश्यक कागदपत्रांसह संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी अंतिम अर्जाची प्रत, दहावीचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास) तसेच नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
कौशल्य विकासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेला चालना देणारे हे अभ्यासक्रम तांत्रिक शिक्षणासोबत रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणार आहेत. दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस. बी. गोतपागर यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंधेरी येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा अधिकृत संकेतस्थळ https://admission.dvet.gov.in ला भेट द्यावी, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विविध “दिनकर सन्मान” पुरस्कारांनी गौरव करणारा भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कविसंमेलन, अभिवाचन, गीत प्रकाशन आणि पुरस्कार वितरणाने सजलेल्या या कार्यक्रमाला साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे आयोजक गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी प्रास्ताविकातून “मराठी साहित्य व कला सेवा” संस्थेच्या दशकभराच्या साहित्य-सांस्कृतिक प्रवासाचा आढावा घेतला. मराठी भाषा, साहित्य आणि कलेसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा संस्थेचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, साहित्यिक, कलाकार, सहकार्य संस्था आणि रसिकांचे त्यांनी आभार मानले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून लोकसंगीत क्षेत्रातील गायक नंदेश विठ्ठल उमप, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मंडळाच्या सचिव तसेच साहित्यिक, चित्रकार डॉ. मीनाक्षी पाटील, शिवसाहित्याचे सुप्रसिद्ध लेखक डॉ. हेमंतराजे गायकवाड तसेच दैनिक नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत उपस्थित होते. मान्यवरांचा सन्मानचिन्ह, शाल आणि पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.
नंदेश विठ्ठल उमप म्हणाले, “लोककला आणि साहित्य यांचा वारसा जपणाऱ्या संस्था समाजाला सांस्कृतिक दिशा देतात. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळते.”
डॉ. मीनाक्षी पाटील यांनी सांगितले, “साहित्य हे समाजमन घडवणारे प्रभावी माध्यम आहे. नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही अत्यंत महत्त्वाची सांस्कृतिक सेवा आहे.”
डॉ. हेमंतराजे गायकवाड म्हणाले, “मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी साहित्यिक, कलाकार आणि सामाजिक संस्था यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.”
प्रकाश सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, “पत्रकारिता, साहित्य आणि समाजकार्य यांचा संगम घडवणारे असे कार्यक्रम समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.”
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेल्या भीमगीत प्रकाशन सोहळ्यात संस्थेचे सदस्य विलास सूर्यवंशी लिखित भीमगीताचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. गाण्याच्या ताल, ठेका आणि लयीवर उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत साथ दिली.
पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल दैनिक नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत तसेच गुहागर सत्ताचे संपादक राजेंद्र मांडवकर यांना “दिनकर पत्रकारिता गौरव सन्मान” प्रदान करण्यात आला.
समाजसेवा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल परळ येथील स्वामी संस्थेला “दिनकर रुग्ण सेवा सन्मान”, तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे संस्थेला “दिनकर साहित्य व कला सेवा सन्मान”, मुंबईतील मैत्री संस्था तसेच संजीवनी सेवाभावी सामाजिक संस्था यांना “दिनकर सेवा सन्मान” प्रदान करण्यात आला.
साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. स्मिता निखिल दातार यांना “दिनकर साहित्य सन्मान” (सर्वोत्कृष्ट कादंबरी – “एक होती हिडिंबा”), डॉ. मानसी पाटील यांना “दिनकर साहित्य सन्मान” (सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह – “मनगाभारा”), डॉ. योगेश जोशी यांना “दिनकर साहित्य सन्मान” (सर्वोत्कृष्ट माहितीग्रंथ – “वंद्य वंदे मातरम्”) तसेच वारकरी प्रकाशनचे राहुल मुंढे यांना “दिनकर साहित्य सन्मान” प्रदान करण्यात आला.
प्रायोगिक रंगभूमीवरील वैविध्यपूर्ण प्रयोगांसाठी प्रा. अरविंद निगळे यांना “दिनकर रंगकर्मी सन्मान” प्रदान करण्यात आला. पॅरिस ऑलिम्पिकसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चेसबॉक्सिंग प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करून सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावणाऱ्या स्नेहा वायकर यांना “दिनकर खेलरत्न सन्मान” देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या यशाचे अभिनंदन केले.
साईनाथ रामपूरकर आणि विजय निगडकर यांना “दिनकर सेवा सन्मान”, समीर करंगुटकर यांना “दिनकर कला गौरव सन्मान”, शरद दळवी यांना “दिनकर शिक्षण सन्मान”, अनुज केसरकर यांना “दिनकर साहित्य सन्मान” तसेच पीयूष मनसुख कारिया यांना “दिनकर भाषा गौरव सन्मान” प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमात आयोजित कविसंमेलन आणि अभिवाचन कार्यक्रमाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. ज्योती राखुंडे, विवेक वसंत जोशी, सीमा खान शेख, रूपाली निलेश जाधव, कल्पना दिलीप मापूसकर, धनंजय पांडुरंग पाटील, सरोज सुरेश गाजरे, कल्पना उबाळे, प्रकाश वानखेडे, अपर्णा अनिल पुराणिक, डॉ. मानसी पाटील, कृपा राकेश म्हात्रे आणि मनोहर वाळिंबे यांनी कविता सादर केल्या. अदिती अजित नैराळे, मीनल शेकटकर कांबळे, चंद्रकांत दढेकर आणि नमिता नितीन आफळे यांनी प्रभावी अभिवाचन सादर केले. सहभागी साहित्यिकांचा सन्मानचिन्ह, शाल आणि पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या आयोजनात विशेष सहकार्य करणाऱ्या राकेश तळगावकर आणि कामाक्षी क्रिएटिव्ह टीमचा “दिनकर सेवा सन्मान” प्रदान करून विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी श्रद्धा कानडे, प्रेरणा साळकर, विनय कांबळे आणि छायाचित्रकार समीर चव्हाण उपस्थित होते.
कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी विश्वभान प्रतिष्ठानचे प्रा. जगदीश संसारे, आयआयटी पवईचे मिलिंद मिरजकर, मुंबई महापौर आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त व साहित्यिका जयश्री हेमचंद्र चुरी तसेच कॅटरिंग असोसिएशनचे पदाधिकारी शंकर शेट्टी उपस्थित होते.
नमिता नितीन आफळे यांच्या प्रभावी सूत्रसंचालनाने संपूर्ण कार्यक्रमात उत्साह, नेमकेपणा आणि सांस्कृतिक भारदस्तपणा कायम राखला.
साहित्य, कला, पत्रकारिता आणि समाजसेवा क्षेत्रातील मान्यवरांना एकाच व्यासपीठावर गौरविणाऱ्या या सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली. साहित्य, कला आणि समाजसेवेचा सुंदर संगम घडवणारा हा सोहळा उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : मे महिन्यात ₹३००० की ₹४५००? महिलांमध्ये संभ्रम; सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : मे महिन्यात ₹३००० की ₹४५००? महिलांमध्ये संभ्रम; सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : मे महिन्यात ₹३००० की ₹४५००? महिलांमध्ये संभ्रम; सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख नाहीमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : मे महिन्यात ₹३००० की ₹४५००? महिलांमध्ये संभ्रम; सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख नाही

राज्यातील लाखो महिलांना प्रतीक्षा असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात सध्या मोठी चर्चा सुरू आहे. मे महिन्याचे पहिले १० दिवस उलटून गेले तरी मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे “या महिन्यात ₹३००० मिळणार की थेट ₹४५०० जमा होणार.?” असा प्रश्न महिलांमध्ये निर्माण झाला आहे.

तीन महिन्यांचे पैसे एकत्र येणार.?

या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹१५०० सन्मान निधी दिला जातो. मात्र मार्च महिन्यापासून अनेक लाभार्थींना हप्ता मिळालेला नाही. एप्रिलमध्ये “₹३००० एकत्र जमा होतील” अशी चर्चा होती, परंतु प्रत्यक्षात पैसे आले नाहीत. आता मे महिना सुरू झाल्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांचे मिळून ₹४५०० एकत्र जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काही वृत्तांमध्ये असेही सांगितले जात आहे की ई-केवायसी आणि लाभार्थी पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शासन प्रलंबित हप्ते एकत्र वितरित करू शकते. मात्र याबाबत राज्य शासनाकडून अद्याप कोणताही अधिकृत GR किंवा निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

१० तारखेपर्यंत पैसे अपेक्षित, पण विलंब कायम

शासनाच्या नियमानुसार लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत हप्ता जमा होणे अपेक्षित असते. मात्र अनेक महिलांच्या तक्रारीनुसार आतापर्यंत पैसे नियमित वेळेत जमा झालेले नाहीत. त्यामुळे यावेळीही हप्ता उशिरा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ई-केवायसी आणि पडताळणीमुळे अडथळा.?

अनेक अहवालांनुसार, ई-केवायसी प्रक्रिया आणि लाभार्थी पडताळणीमुळे निधी वितरणात विलंब होत आहे. काही वृत्तांमध्ये सुमारे ५४ लाख महिला अपात्र ठरल्याचा दावा करण्यात आला असून सध्या अंदाजे १.८९ कोटी महिला पात्र असल्याची माहिती समोर येत आहे.

यामुळे शासनाचा आर्थिक भार कमी झाला असून पात्र महिलांचे थकीत हप्ते लवकर वितरित होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अधिकृत घोषणेअभावी ही माहिती निश्चित मानली जात नाही.

महिलांनी काय तपासावे.?

लाभार्थींनी खालील बाबी तपासून ठेवणे आवश्यक आहे:

बँक खाते आधारशी लिंक आहे का

NPCI/DBT सक्रिय आहे का

ई-केवायसी पूर्ण झाली आहे का

अर्ज Approved स्थितीत आहे ka

मोबाईल नंबर बँकेशी जोडलेला आहे का

सध्या सोशल मीडियावर आणि विविध वृत्तांमध्ये मार्च-एप्रिल-मे या तीन महिन्यांचे ₹४५०० एकत्र जमा होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र राज्य शासनाकडून अद्याप अधिकृत घोषणा किंवा निधी वितरणाची अंतिम तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिलांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत अपडेटची प्रतीक्षा करणे महत्त्वाचे आहे.

Main Headline (Bold, मोठा टेक्स्ट): गोंडगावात पीडित कुटुंबाच्या भेटीला मा. आमदार रोहित पवार

न्यायासाठी ३ वर्षांची प्रतीक्षा! रोहित पवार गोंडगावात पीडित कुटुंबाच्या भेटीला.

न्यायासाठी ३ वर्षांची प्रतीक्षा ! रोहित पवार गोंडगावात पीडित कुटुंबाच्या भेटीला.Main Headline (Bold, मोठा टेक्स्ट):
 गोंडगावात पीडित कुटुंबाच्या भेटीला
मा. आमदार रोहित पवार

भडगाव प्रतिनिधी :-

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)चे आमदार Rohit Pawar हे बुधवार, दि. ६ मे २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे भेट देणार आहेत.

तीन वर्षांपूर्वी गोंडगाव येथे घडलेल्या एका चिमुकलीवरील बलात्कार व हत्येच्या गंभीर घटनेनंतर अद्यापही पीडित कुटुंबाला न्याय मिळालेला नाही. सदर प्रकरण सध्या फास्ट ट्रॅक न्यायालयात सुरू असून, न्यायप्रक्रियेला विलंब होत असल्याची भावना स्थानिक नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार हे गोंडगाव येथे जाऊन पीडित कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेणार असून, प्रकरणाची सद्यस्थिती जाणून घेणार आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून न्यायप्रक्रियेला गती देण्याबाबतही ते भूमिका मांडण्याची शक्यता आहे.

या भेटीमुळे पुन्हा एकदा या प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जाणार असून, पीडित कुटुंबाला न्याय मिळण्याच्या अपेक्षा व्यक्त होत आहेत.

गिरणा नदीत अज्ञात इसमाचा मृतदेह; पोलिसांचा तपास सुरू, ओळख पटविण्याचे प्रयत्न वेगात

गिरणा नदीत अज्ञात इसमाचा मृतदेह; पोलिसांचा तपास सुरू, ओळख पटविण्याचे प्रयत्न वेगातगिरणा नदीत अज्ञात इसमाचा मृतदेह; पोलिसांचा तपास सुरू, ओळख पटविण्याचे प्रयत्न वेगात

भडगाव ता.प्रतिनिधी : -आमीन पिंजारी

तालुक्यातील कजगाव परिसरात असलेल्या गिरणा नदी पात्रात मंगळवार (दि. ५ मे) रोजी दुपारी सुमारे ३५ वर्षे वयोगटातील एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती व कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारच्या सुमारास काही नागरिक नदीकाठी गेले असता त्यांना पाण्यात तरंगत असलेला मृतदेह दिसून आला. या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन नागरिकांनी तत्काळ गोंडगाव व कोळगाव येथील पोलीस पाटलांना माहिती दिली. त्यानंतर भडगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला.

माहिती मिळताच भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नरेंद्र विसपुते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या सोबत पोलीस पथकाने घटनास्थळी पाहणी करून प्राथमिक तपास सुरू केला. सावदा परिसरातील गिरणा नदी पुलाखाली पाण्यात बुडालेल्या अवस्थेत सदर मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला व पुढील तपासासाठी आवश्यक फॉरेन्सिक कार्यवाही करण्यात आली. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, त्याच्या अंगावर कोणतेही ओळखपत्र अथवा ठोस पुरावे आढळून आले नाहीत, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

दरम्यान, मृतदेह भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. पाण्यात बुडाल्यामुळे मृत्यू झाला की इतर काही कारण आहे, याबाबत पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (A.D. No. 38/2026) बीएनएसएस 2023 च्या कलम 194 अन्वये करण्यात आली आहे. मृत्यूची अचूक वेळ अद्याप निश्चित झालेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदर घटनेचा तपास पोलीस हवालदार नरेंद्र विसपुते हे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. तसेच, परिसरातील हरवलेल्या व्यक्तींची माहिती, सीसीटीव्ही फुटेज, तसेच स्थानिकांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सदर व्यक्तीबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ भडगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा (मो. ९७६६६२७१४७).

घटनास्थळी पीएसआय सुशील सोनवणे, कोळगाव दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार मुकुंद परदेशी, तसेच गोंडगाव व कोळगाव येथील पोलीस पाटील आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

लग्नसमारंभात गावठी कट्टा! ताडे येथे युवक अटकेत; कासोदा पोलिसांची धडक कारवाई

लग्नसमारंभात गावठी कट्टा! ताडे येथे युवक अटकेत; कासोदा पोलिसांची धडक कारवाई

लग्नसमारंभात गावठी कट्टा! ताडे येथे युवक अटकेत; कासोदा पोलिसांची धडक कारवाईलग्नसमारंभात गावठी कट्टा! ताडे येथे युवक अटकेत; कासोदा पोलिसांची धडक कारवाई

कासोदा प्रतिनिधी :- शैलेश पांडे

लग्नाच्या हळदी कार्यक्रमात कमरेला गावठी पिस्तूल लावून मोकाट फिरणाऱ्या युवकाला अखेर कासोदा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दि. 03 मे 2026 रोजी ताडे येथे सुरू असलेल्या लग्नसमारंभात बाहेरगावाहून आलेला लखन प्रकाश वाघ (रा. परधाडे, ता. पाचोरा) हा युवक हळदी कार्यक्रमादरम्यान बँडवर बेधडक नाचत होता. याचवेळी काही नागरिकांच्या नजरेस त्याच्या कमरेला गावठी कट्टा असल्याचे आले. नागरिकांनी त्याला जाब विचारताच त्याने गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.

घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलिसांनी तात्काळ हालचाल करत शोधमोहीम सुरू केली. दोन दिवसांच्या पाठलागानंतर दि. 05 मे 2026 रोजी गुप्त माहितीच्या आधारे आरोपी पुन्हा ताडे गावात शस्त्रासह फिरत असल्याचे समोर आले. पोलिसांनी तातडीने सापळा रचत त्याला जेरबंद केले.

अंगझडतीत आरोपीकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. संबंधित युवकाविरुद्ध अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून कासोदा पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहातपुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन आणि पुरस्कार वितरण सोहळा १ मे २०२६ रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ, सदाशिव पेठ, पुणे येथे उत्साहात पार पडला.

कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक व व्याख्याते कवी सुभाष सोनवणे, ज्येष्ठ कवी, गीतकार व संगीतकार जयंत भिडे, सोल्यूशन माईंडचे सुजित दातार आणि नाट्य कलाकार निलेश दातार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सन्माननीय उपस्थितीत योगेश सुपेकर, अशोक रास्ते, ज्ञानेश्वर कोटगिरे, तुषाल शिवशरण, ॲड. प्रतिभा पोतदार, प्रशांत डोंगरे आणि डॉ. राजेश्वर हेंद्रे यांचा समावेश होता. तर जयमाला इनामदार, डॉ. मधुसूदन घाणेकर, अंजली पटवर्धन आणि राजश्री आठवले यांची विशेष उपस्थिती लाभली.

संमेलनात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तितिक्षा कानन संवर्धन पुरस्कार दरवर्षी एक कोटी झाडे दान करून त्यांचा पाठपुरावा करणारे ज्ञानेश्वर कोटगिरे यांना प्रदान करण्यात आला. तितिक्षा पर्यावरण संवर्धन पुरस्कार पर्यावरणप्रेमी प्रशांत डोंगरे यांना देण्यात आला. तितिक्षा समाज भूषण पुरस्कार सोल्यूशन माईंडचे सुजित दातार यांना प्रदान करण्यात आला. तितिक्षा काव्य रत्न पुरस्कार ॲड. प्रतिभा पोतदार यांना देण्यात आला. तितिक्षा काव्य कोहिनूर पुरस्कार डॉ. मानसी पाटील यांना प्रदान करण्यात आला. तितिक्षा कला संवर्धन पुरस्कार योगेश सुपेकर यांना देण्यात आला, तर तितिक्षा साहित्यशिरोमणी कोहिनूर पुरस्कार अशोक रास्ते यांना प्रदान करण्यात आला.

तितिक्षा ग्रंथ पुरस्कार २०२६ चा वितरण सोहळाही यावेळी पार पडला. विविध साहित्यप्रकारांतील उत्कृष्ट ग्रंथांचा गौरव करण्यात आला. डॉ. रॅ. र. पु. परांजपे स्मृती अंतर्गत तितिक्षा सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार प्रा. जयंत खेडकर यांच्या ‘चला गणित शिकूया’ या ग्रंथमालेला प्रदान करण्यात आला. आत्मचरित्र विभागात विश्वास देशपांडे यांचे ‘आनंदयात्री रवींद्रनाथ’, भारत सातपुते यांचे ‘जागरण’, प्रा. डॉ. भालचंद्र रघुनाथ सूर्यवंशी यांचे ‘राजहंस’ आणि दत्तात्रय हिर्लेकर यांचे ‘कर्तव्य पूर्ती’ या ग्रंथांचा सन्मान करण्यात आला. चरित्रलेखन विभागात जयंत कुलकर्णी यांचे ‘विवेकानंद घडताना’ आणि शुभांगी खरे यांचे ‘साहिल एक शब्दगारुड’ या ग्रंथांचा गौरव करण्यात आला.

लेखसंग्रह विभागात सुनिता कावसनकर यांचे ‘भारतीय संस्कृती अध्यात्म व इतिहास’, विलास बाबर यांचे ‘विलासचे वैचारिक वैभव’, दया वाकडे यांचे ‘मैत्र जीवांचे’, विनोद पंचभाई यांचे ‘कर्मयोगी गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज’, गजानन परब यांचे ‘जवळून डोंगर साजरे’, अनिल पाटील यांचे ‘काही मनातले, काही जनातले’ आणि विकास भावे यांच्या ‘ओठावरली गाणी‘ या ग्रंथांचा गौरव करण्यात आला.

कादंबरी विभागात सारिका कंदलगांवकर यांचे ‘देवि रक्षति रक्षितः’, मनोज अंबिके यांचे ‘कर्ण पुत्र आणि अस्त्र जन्म रहस्य’ (भाग १ व २), आशा नेगी यांचे ‘लव इज लव’ आणि डॉ. स्मिता निखिल दातार यांचे ‘एक होती हिडिंबा’ या कादंबऱ्यांना पुरस्कार देण्यात आले. कथासंग्रह विभागात दत्तात्रय सैतवडेकर यांचे ‘कालचक्र’, जयदीप वैद्य यांचे ‘प्रेमाचे किस्से’ आणि रामदास खरे यांचे ‘साईड इफेक्ट’ यांचा गौरव करण्यात आला.

बालसाहित्य विभागात गिरीश वसेकर यांना ‘पापा’ या किशोर लेखसंग्रहासाठी, तसेच डॉ. नंदा संतोष हरम यांना विज्ञानकथा आणि क्षिप्रा शरद शहाणे यांना ‘इवलसं आभाळ’ या बालकादंबरीसाठी सन्मानित करण्यात आले. बालकविता विभागात कविता दिलीप झुंजारराव यांच्या ‘आता जाऊ या सूर्यावर’ या संग्रहाचा गौरव करण्यात आला.

कवितासंग्रह विभागात कमलाकर राऊत यांचे ‘कवेत विसावल्या तारका’, प्रदीप बडदे यांचे ‘माणुसकीची अंत्ययात्रा’, प्रतिभा पवार यांचे ‘ती अजून जिवंत आहे’, नीलिमा फाटक यांचे ‘तीन एके तीन’, वर्षा तुपे यांचे ‘शब्द साज’ आणि डॉ. स्मिता मुकणे यांचे ‘ऋतू रंग’ या संग्रहांचा गौरव करण्यात आला. रंजना लसणे, नीला चित्रे, रूपमती पांडुरंग देशमुख, ज्योती हमीने, रंजना देवी भोईटे आणि दीपाराणी गोसावी यांच्या काव्यसंग्रहांनाही उत्कृष्ट ग्रंथ तसेच संजय माने यांच्या ‘काव्यांकुर‘ काव्यसंग्रहाला प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले.

आशयघन, मुक्तछंद, छंदोबद्ध, सामाजिक जाणीव, ग्रामीण, अल्पाक्षरी आणि निसर्ग कविता या विभागांमध्येही विविध कवींचा सन्मान करण्यात आला. डॉ. मानसी पाटील यांचे ‘मन गाभारा’, मारुती काशीनाथ थिटे यांचे ‘भिरुड’, बाळासाहेब तोरसकर यांचे ‘शब्द झेलताना’, अरविंदा भामरे यांचे ‘शापित कोलाहलाच्या नांदी’, प्रा. शरदचंद्र काकडे यांचे ‘फाशी’, सुविद्या करमरकर यांचे ‘माझे आकाश’, सुनिता वैद्य यांचा ‘अक्षरांचा कशिदा‘, डॉ. चंद्रकांत लेनपुरे यांचा ‘सत्य साई रंग‘ आणि रचना वसेकर यांचे ‘निसर्ग गंध’ या संग्रहांचा विशेष गौरव करण्यात आला.

सर्वोत्कृष्ट भावस्पर्शी काव्यसंग्रह सुनिता विजय सुरवाडे, वैचारिक काव्य हेमलता गीते, तर उत्कृष्ट वैचारिक काव्य प्रकाश पाठक यांना प्रदान करण्यात आला.

सर्वोत्कृष्ट प्रतिनिधिक काव्यसंग्रह अजिता मुळीक संपादित ‘युगंधर‘ आणि कांचन मून यांच्या ‘बाबा’ काव्यसंग्रह देण्यात आला.

चारोळी संग्रह विभागात महेश भिकाजी बंडबे यांचे ‘मयावळी’, प्रा. डॉ. जेनेट बोर्जिस यांचे ‘काव्यसुमने’ आणि स्मिता मुकणे यांचे ‘पसरले सुरेख रंग’ यांचा सन्मान करण्यात आला. नाटक विभागात सूर्यकांत तिवडे यांचे ‘स्वराज्याचा साक्षीदार राजगड’ आणि संदीप मणेरीकर यांचे ‘संगीत प्राक्तनयोग’ या नाटकांना पुरस्कार देण्यात आले.

कार्यक्रमात ‘श्रीराम गाथा’ या प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे तसेच ‘डहाळी’ या अनियतकालिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. श्रीराम गाथा, रामभक्त हनुमान, माझी कविता आणि हायकू या विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा सन्मान व्यासपीठावर करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद कुलकर्णी, विजय सातपुते आणि प्रिया प्रमोद दामले यांनी केले. निमंत्रक म्हणून अजिता मुळीक आणि भालचंद्र शिर्के यांनी जबाबदारी सांभाळली. एम. अजया यांनी तितिक्षा भावार्थ परिवाराच्या वतीने मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारत इतिहास संशोधक मंडळ आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी विशेष सहाय्य केले. विविध साहित्यिक आणि कलात्मक सत्रांमुळे संमेलनाला विशेष रंगत प्राप्त झाली. उपस्थित साहित्यप्रेमींनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात सांस्कृतिक सादरीकरणांतून महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा उजळला

श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात सांस्कृतिक सादरीकरणांतून महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा उजळला

श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात सांस्कृतिक सादरीकरणांतून महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा उजळलाश्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात सांस्कृतिक सादरीकरणांतून महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा उजळला

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, मराठी विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि विश्वभान प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त “महाराष्ट्राची संस्कृती” या विषयावर सांस्कृतिक उपक्रम उत्साहात पार पडला.

सकाळी महाविद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाने उपक्रमाची सुरुवात झाली. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करण्यात आले. उपस्थित प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थीनी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी राष्ट्रध्वजाला सलामी देत महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.

सांस्कृतिक सादरीकरणांची सुरुवात प्रा. माधवी पवार यांच्या गणेश वंदनेने झाली. त्यानंतर महाराष्ट्राच्या परंपरा, शौर्य आणि सांस्कृतिक वैभव यांचे प्रभावी दर्शन घडले. मायभूमी गीत, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ तसेच ‘जयोस्तुते जयोस्तुते’ ही गीते स्वर संस्कार संगीत विद्यालयाच्या संचालिका सुरेखा भुजबळ यांनी सादर केली. ‘धरीला पंढरीचा चोर’ हे सादरीकरण माधवी पवार यांनी प्रभावीपणे सादर केले.

वर्षा घोलप आणि सर्वज्ञ घोलप यांनी सादर केलेल्या नाटुकलीने उपक्रमात रंगत आणली. समृद्धी सोळंके हिच्या वासुदेव वेशभूषेतील अभिनयाने प्रेक्षकांची दाद मिळवली. कोळी नृत्य, शेतकरी नृत्य आणि लेझीम या लोककलांनी वातावरण भारावून टाकले. दिक्षा घनावटे हिने सादर केलेल्या ‘गौरव महाराष्ट्राचा’ या सादरीकरणाने उपक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.

उपक्रमाच्या उत्तरार्धात ‘विचार-विस्तार २०२६’ या नावाने विद्यार्थ्यांचे संशोधनपर लेख ‘इन्क्वेस्ट’ या ई-नियतकालिकात प्रकाशित करण्यात आले. मानसशास्त्र विभागाचे ‘बीकन’, मराठी विभागाचे ‘पालवी’, हिंदी विभागाचे ‘सुरभी’ तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील ‘कॅम्पस कॅनव्हास’ या ई-नियतकालिकांचे प्रकाशन अर्चना पत्की, जगदीश संसारे, सुरेखा भुजबळ आणि वर्षा पालकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सहभागी सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

सूत्रसंचालन मनाली मणचेकर हिने प्रभावीपणे केले. शेवटी प्रा. शिल्पा पवार यांनी आभार प्रदर्शन केले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी नेहा भोसले, प्रदीप पाटील आणि माधवी पवार यांनी अथक परिश्रम घेतले. संपूर्ण उपक्रमाने महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे जिवंत आणि प्रभावी चित्र उभे केले. विद्यार्थीनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहातसंविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आशादीप महिला आधार मंच या विश्वस्त संस्थेतर्फे राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. लेक लाडकी अभियान, महाराष्ट्र राज्य यांच्या संलग्नतेत आणि ॲड. वर्षाताई देशपांडे यांच्या प्रेरणेने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

रविवार दिनांक ३ मे २०२६ रोजी सायंकाळी आयोजित या कार्यक्रमात राष्ट्रसेवेसाठी कार्यरत व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान अमृत महोत्सव गौरव पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमास मुंबईच्या माजी महापौर ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर, लोकशाहीर नंदेश विठ्ठल उमप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू प्रा. अक्षय आंबेडकर आणि आशादीप महिला आधार मंचच्या अध्यक्ष आशा संतोष भोईर यांची विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे संयोजन मंगला गुरव यांनी केले. निमंत्रक म्हणून जया गाई, डॉ. मोनिका जगताप, सूरज भोईर, सुरेश साळवी, विजय भोसले, प्रभाकर कांबळे, तानाजी फणसे, संगीता मुख, गौतम खंडागळे, विजय वाघेला, जितेंद्र जोशी आणि ॲड. सोपान बुडबाडकर यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी हुंडा न घेण्याची आणि न देण्याची सार्वजनिक शपथ घेतली. सामाजिक बांधिलकी दृढ करणारा हा उपक्रम ठरला. पत्रकारिता प्रशिक्षण कार्यशाळा लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मैत्री संस्था, सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती, जय महाराष्ट्र पत्रकार संघ, माणुसकी फाउंडेशन आणि मराठी साहित्य व कला सेवा यांचे विशेष सहकार्य या उपक्रमाला लाभले.

कार्यक्रमाच्या समन्वयासाठी कवी व पत्रकार गुरुदत्त वाकदेकर, कवी व लेखक मोहन जाधव, योगशिक्षक संतोष खरटमोल, शिक्षिका मनीषा मांढरे, विकास कदम, संतोष तांबे, विनायक जवळेकर, विजय केदासे आणि अभिनेत्री निशा जाधव यांनी योगदान दिले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल संयोजक सूरज भोईर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

पत्रकारिता प्रशिक्षण कार्यशाळेची घोषणा

पत्रकारिता प्रशिक्षण कार्यशाळेची घोषणा

पत्रकारिता प्रशिक्षण कार्यशाळेची घोषणापत्रकारिता प्रशिक्षण कार्यशाळेची घोषणा

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक कवी महासंघ आणि अन्याय विरुद्ध लढणारे पुरोगामी विचारांचे ‘झुंजार लेखणी’ यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच ‘मूकनायक’ या उपक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारिता प्रशिक्षण कार्यशाळा लवकरच सुरू होणार आहे. या उपक्रमाद्वारे इच्छुकांना पत्रकारितेचे सर्वंकष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक व सल्लागार म्हणून ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक-राजकीय विश्लेषक हेमंत देसाई, वरिष्ठ पत्रकार व विश्लेषक प्रतिमा जोशी, प्रा. हेमंत सामंत, दिवाकर शेजवळ, अनिल गलगली, विलास बडे आणि सुरज भोईर मार्गदर्शन करणार आहेत. विविध मान्यवर व तज्ञांच्या सहभागातून पत्रकार बनण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे.

या प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये पत्रकारिता म्हणजे काय, पत्रकारांचे नीतिमूल्ये, कर्तव्य आणि व्यक्तिमत्त्व विकास, कॅमेरा कौशल्य कसे विकसित करावे, आशयलेखनाचे महत्त्व आणि पद्धती, बातमी कशी तयार करावी व लेखन कसे करावे, सामाजिक, राजकीय आणि शोध पत्रकारिता, गुन्हेगारी व छायाचित्रण पत्रकारिता, मुलाखत तंत्र तसेच मुद्रित माध्यम आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम यांची ओळख यांसारख्या विषयांचा समावेश आहे. वर्तमानपत्र नोंदणी प्रक्रियेबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या आयोजनात संतोष आंबेकर, मोहन जाधव, दिलीप नारद, डॉ. प्रभाकर कांबळे, गुरुदत्त वाकदेकर, मनीषा मांढरे, संतोष खरटमोल, सूर्यकांत चव्हाण, कल्पना शिंदे, मुकुंद कांबळे, ॲड. सोपान बुडबाडकर, विनायक जवळेकर, राजेश जाधव, घनश्याम आंबोकर, सुरेश साळवी, ॲड. आसिफ शेख, निशा जाधव, साई रामपूरकर, अमेय भोसले, विजय केदासे, विजय भोसले, ॲड. किरण म्हात्रे, तानाजी फणसे, डॉ. संतोष कांबळे, विनोद हिवाळे, विकास कदम, प्रा. सुभाष जाधव आणि संतोष तांबे यांचा सहभाग आहे.

मैत्री संस्था, सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती, माणुसकी फाउंडेशन आणि मराठी साहित्य व कला सेवा यांचे विशेष योगदान या उपक्रमाला लाभले आहे. कार्यशाळेसाठी प्रवेश मर्यादित ठेवण्यात आला आहे. इच्छुकांनी ९९६९६ ८६०१४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Don`t copy text!