भोला शेतकर्यावर भोला महादेवाची माया. चक्क बसलेल्या शेतकर्याच्या पाठीवर चढला सर्प.शेतकर्याने असाही सर्पाचा उधळला डाव.वाडे येथील ( भोला ) शशिकांत महाजन यांचे धाडस.

भोला शेतकर्यावर भोला महादेवाची माया. चक्क बसलेल्या शेतकर्याच्या पाठीवर चढला सर्प.शेतकर्याने असाही सर्पाचा उधळला डाव.वाडे येथील ( भोला ) शशिकांत महाजन यांचे धाडस.

भोला शेतकर्यावर भोला महादेवाची माया. चक्क बसलेल्या शेतकर्याच्या पाठीवर चढला सर्प.शेतकर्याने असाही सर्पाचा उधळला डाव.वाडे येथील ( भोला ) शशिकांत महाजन यांचे धाडस.भोला शेतकर्यावर भोला महादेवाची माया. चक्क बसलेल्या शेतकर्याच्या पाठीवर चढला सर्प.शेतकर्याने असाही सर्पाचा उधळला डाव.वाडे येथील ( भोला ) शशिकांत महाजन यांचे धाडस.

भडगाव प्रतिनिधी :-

शेतकरी शेतात ज्वारीच्या पिकाजवळ पसरलेली आग विझवुन ज्वारीचे होणारे नुकसान वाचवितो. आंब्याच्या झाडाचा सावलीचा आधार घेत थकवा काढत असतांना अचानक या शेतकर्याच्या पाठीवर सर्प ( नाग ) सळसळ करीतो चढतो.शेतकर्याची घाबरगुंढीने ञेधाञिपट उडते. माञ शेतकरी स्तब्ध बसत आपल्या शर्टाच्या गुंडया तोडुन मागे झटक्याने सर्पाला फेकतो. अन उडी मारुन शेतकरी आपला जीव सर्पापासुन वाचवितो. अशा या भडगाव तालुक्यातील वाडे येथील ( भोला ) शशिकांत रामदास महाजन या शेतकर्यावर संकटाचे मोठे ढग पसरले होते. माञ देव तारी त्यास कोण मारी असा प्रत्यय या शेतकर्याला आला. या शेतकर्याला सर्वजण गावात प्रेमाने भोला म्हणतात. अशा या भोला शेतकर्याला भोला महादेवाने वाचविल्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. चक्क बसलेल्या शेतकर्याच्या अंगावर चढला सर्प. शेतकर्याने असाही उधळला सर्पाचा डाव असे या जिवन मरणाच्या संकटातुन हा शेतकरी वाचलेला आहे. माञ या शेतकर्याच्या धाडसाचे सर्वञ कौतुक होत आहे.

याबाबत माहिती अशी कि,

सर्प हा शेतकर्याचा खरा मिञ मानला जातो. शेतात कामे करतांना शेतकर्याला सर्प, बिबटया आदि प्राण्यांची मनात भिती असते. त्यात सध्या तापमानाने उग्र रुप धारण केले असुन ४१ डिग्री सेल्सीयस तापमान वाढलेले आहे. शेतकरी जिवाची पर्वा न करता रणरणत्या उन्हात शेतीची कामे करतांना घामोघाम होतो. असाच शेतीची कामे करतांना भडगाव तालुक्यातील वाडे येथील शशिकांत रामदास महाजन या शेतकर्याच्या चांगलीच जिवावर बितली. आणि हा शेतकरी जिवघेण्या मोठया संकटातुन वाचल्याचे दिसुन आले. हा शेतकरी जेव्हा शेतात जुनारी केळीची घान जाळतांना अचानक शेजारच्या त्यांच्याच कापणी केलेल्या ज्वारीच्या शेताच्या बांधावर आग पसरते. शेतकर्याला जवळ पाण्याचा ठाव दिसत नाही. ज्वारीचे पिक जळण्यापासुन वाचविण्यासाठी शेतकर्याने केळीचे पिल व कापलेल्या ज्वारीच्या धांडयांनी लागलेली आग विझवायचा पुरेपुर प्रयत्न केला. आग विझली अन (भोला ) शशिकांत महाजन हा शेतकरी मोबाईल पाहत थकवा काढायला शेताच्या बांधावरील आंब्याच्या झाडाखाली सावलीचा आधार घेत बसलेले होते. मागुन झाडांच्या पालापाचोळयात सळसळण्याचा आवाज आला. माञ त्यांनी त्याकडे खडीखाप अथवा सरडा असे काही तरी प्राणी असेल म्हणुन दुर्लक्ष केले. माञ पाठीवर काही तरी सळसळल्या सारखे अन वळवळल्यासारखे वाटले. सर्प हा झाडाचा बुंधाड म्हणुन त्यांचे अंगावर चढला कि काय? शशिकांत महाजन या शेतकर्याच्या मनात सर्प आपल्या पाठीवर चढलेला आहे मनात भितीचे काहुर उठत खुपच घाबरले. पण त्यांनी हालचाल न करता तसेच स्तब्ध बसुन राहीले. मनात विचारांचे वादळ उठले. काय करावे सुचेना. या शेतकर्याने आपला जीव सर्पापासुन वाचविण्यासाठी क्षणाचा विचार न करता क्षणार्धात अनोखी शक्कल लढविली. हर हर महादेव असे महादेवाचे नाव मनातुन घेत हालचाल न करता क्षणात एका हाताने शर्टाच्या गुंडया तोडुन शर्ट जोरात मागील बाजुला झटकला अन क्षणार्धात बसल्या जागेवरुन बेडकासारखी उडी मारुन पुढे धाव घेतली. पुढे बसुन हा शेतकरी पाहतो तर काय चक्क ३ ते ४ फुटाचा असली नाग झाडांच्या पालापाचोळयातुन सळसळतांना घाणीत घुसतांना पाहीला. पुन्हा या शेतकर्याने जय भोले महाराज म्हणत देवाचे पाय पडले. आणि आपल्याला या सर्पापासुन महादेवाने वाचविले. असे म्हणत सुटकेचा निश्वास सोडला. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. असे जणु असा महादेवाचा जणु चमत्कार पहायला मिळाला. या शेतकर्याचे अंग सर्पाच्या या संकटमय स्थितीने थरथर कापत होते. काही वेळ ते शेताच्या झाडाच्या सावलीचा आधार घेत स्वताला सावरत होते. काही वेळाने त्यांनी घाबरल्या स्थितीत वाडे गावात घर गाठले. आणि घरात आई आणि आजीसह परीवाराला आपबिती सांगीतली. ग्रामिण भागात समजुतप्रमाणे व वयोवृद्धांच्या जुन्या जाणत्या मनाप्रमाणे आजी कौशल्याबाई माळी यांनी भोला शेतकरी नातुला सांगीतले कि, सापले देवनी आज्ञा नव्हती. म्हणुन देवनी हाऊ टाईम टाया. भोला महादेवनी म्हना नातुले वाचडं असे आनंदाने उदगार आजींच्या तोंडुन निघाल्याचे दिसुन आले. या शेतकरी कुटुंबात आनंदाश्रु तरारल्याचे चिञ पहायला मिळाले. शेतकरी शेतात राञंदिवस कष्ट करतो. सोन्याचे पिक धरणीमातेच्या उदरातुन पिकवितो. कष्टाला फळ आल्याने शेतकर्याच्या कुटुंबालाही सोन्याचे दिवस येतात. शेतकर्याला उन्हातान्हा, थंडीत, पाऊसात जिव धोक्यात घालुन जिवाचे रानं करुन शेती मातेची सेवा करावी लागते. कधी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका तर कधी दुष्काळी चटके तर कधी अतिवृष्टीचा फटका बसल्याने शेती हंगाम धोक्यात येतो. कधी शेतकर्याच्या जीवाला धोका पोहचतो. जगाचा पोशिंदा शेतकरी राजा न डगमगता मनोधैर्य वाढवित आपल्या शेती मातेची सेवा अविरत करतो. आणि आपल्या संसाराचा गाडा हाकतो. सुख, दुखात राहुन संकटाशी सामना करतो. अशा बळीराजाची जणु

अशा कष्टकरी शेतकर्यांसाठी कहानीच बनु पाहत आहे.

प्रतिक्रीया —

आमच्या वाडे शिवारातील शेतात ज्वारीचे पिक कापणी करुन जमिनीवर पडलेले होते. मी बाजुच्या आमच्या शेतातील जुनारी केळीची काही घाण जाळली. अचानक ज्वारीच्या शेताच्या बांधाजवळुन आगीचा वणवा आमच्या शेतात पोहोचायला सुरुवात झाली. मी केळीचे पिलांनी व ज्वारीच्या धांडयांनी धावपळीत आग विझविली. आंब्याच्या झाडाखाली सावलीत बसलो असतांना माझ्या पाठीवर सर्प चढत असल्याचे जाणवले. मी खुपच घाबरलेलो होतो. क्षणात मी शर्टच्या गुंडया तोडुन शर्ट मागील बाजुस जोरात झटकला. अन पुढे उडी मारली. माझ्यासमोर नाग घाणीत जातांना पाहीला. काही तरी पुण्य आडवे आले म्हणुन मला महादेवाने वाचविले.

(भोला ) शशिकांत रामदास महाजन. शेतकरी. वाडे. ता. भडगाव. जि. जळगाव.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल?

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल?

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल?महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल?

 

आमदार 288 वरून 432, खासदार 48 वरून 72 होण्याची शक्यता; महिला आरक्षणामुळे समीकरणे बदलणार

 

मुंबई : देशातील मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रस्तावित बदलांनुसार राज्यातील लोकसभा आणि विधानसभेतील जागांमध्ये लक्षणीय वाढ होणार असून, त्याचा थेट परिणाम सत्तासमीकरणांवर होण्याची चिन्हे आहेत.

 

सध्या महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. मात्र, संभाव्य पुनर्रचनेनंतर ही संख्या 72 पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यापैकी सुमारे 24 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव असतील. त्याचप्रमाणे विधानसभेतील 288 जागा वाढून 432 होण्याचा अंदाज असून, त्यात सुमारे 143 महिला आमदार निवडून येऊ शकतात.

 

मतदारसंघ पुनर्रचनेचा हा निर्णय Delimitation Commission of India मार्फत घेतला जाणार असून, तो आगामी जनगणनेच्या आकडेवारीवर आधारित असेल. 2026 नंतर या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.

दरम्यान,  (महिला आरक्षण विधेयक) लागू झाल्यानंतर राजकारणात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे पारंपरिक राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संभाव्य पुनर्रचनेत मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या वेगाने वाढणाऱ्या शहरी पट्ट्यात लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यामुळे शहरी भागातील प्रतिनिधित्व वाढेल, मात्र ग्रामीण भागातील मतदारसंघ कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे

या पार्श्वभूमीवर विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते Rahul Gandhi यांनी या निर्णयामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला आहे. तसेच Sanjay Raut यांनी “नारीशक्ती नव्हे तर भाजपशक्ती विधेयक” अशी टीका करत सरकारवर निशाणा साधला. तर Arvind Sawant यांनी या बदलामुळे सत्तासमतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली आहे.

विरोधकांनी काही महत्त्वाचे प्रश्नही उपस्थित केले आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तोंडावरच हे विधेयक का आणले, लोकसभा जागा कोणत्या निकषांवर वाढवल्या जाणार, जनगणनेशिवाय जागावाढ कशी होणार, तसेच दक्षिण आणि ईशान्येकडील राज्यांच्या प्रतिनिधित्वावर त्याचा काय परिणाम होणार, असे प्रश्न विचारले जात आहेत.

दरम्यान, काही राजकीय पक्षांनी या बदलांचे स्वागत केले असून, महिला प्रतिनिधित्व वाढणार असल्यास त्याला विरोध का केला जातो, असा सवालही उपस्थित केला आहे

एकूणच, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण या दुहेरी बदलांमुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात मोठे परिवर्तन घडण्याची शक्यता असून, येत्या काळात यावर अधिक स्पष्टता येणे अपेक्षित आहे.

लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे मंथन प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ संपन्न

लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे मंथन प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ संपन्न

लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे मंथन प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ संपन्नलाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे मंथन प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ संपन्न

भडगाव प्रतिनिधी :-

कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित,लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे मंथन प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

मंथन प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंतांचा गौरव

मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी मनस्वी अभिजीत शिसोदे हिने जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळवला.इयत्ता चौथीतील विद्यार्थी निर्भय भास्कर तायडे याने तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला. अर्णव रावसाहेब भदाणे इयत्ता तिसरी याने तालुक्यातून द्वितीय क्रमांक मिळवला. यशवर्धन तुषार देवरे इयत्ता दुसरीतून तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला. सदर विद्यार्थ्यांना डिजिटल टॅब,बॅडमिंटनसंच व पुष्पगुच्छ देऊन नानासाहेबांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने घेतलेल्या वकृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण

अ गटात सोहम योगेश गुरव प्रथम तर दक्षता जितेंद्र पाटील द्वितीय क्रमांक मिळवला.

ब गटात दिशा नितीन बच्छाव प्रथम तर पूर्वा कैलास वाघ द्वितीय क्रमांक मिळवला. सदर विद्यार्थ्यांना नानासाहेब तसेच मंचावरील मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

नाविन्यपूर्ण स्पर्धा बक्षीस वितरण

लाडकुबाई शाळेत वर्षभर विविध नाविन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्यात येते या अंतर्गत पाढे पाठांतर, सुंदर हस्ताक्षर, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. पाढे पाठांतर स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी इयत्ता पहिली रितेश पाटील, हेमाक्षी पाटील इयत्ता दुसरी रुही सैंदाणे इयत्ता तिसरी सानवी शिंदे, सिद्धी चौधरी इयत्ता चौथी यज्ञेश पाटील व दिशा बच्छाव यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला. सदर विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे यांच्या वतीने रोख दोनशे रुपये प्रत्येकी देण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे यांनी बक्षिसाची घोषणा केली होती.बाल वर्गातील नवनियुक्त शिक्षिका अकसा आसीम खान यांचा सत्कार नानासाहेबांच्या वतीने करण्यात आला.तसेच शाळेतील आदर्श विद्यार्थिनी हिरण्या निरंजन पाटील हिचा वाढदिवस शुभेच्छा पत्र,पुष्पगुच्छ देऊन नानासाहेबांच्या हस्ते करण्यात आला. सदर प्रसंगी श्री अभिजीत सिसोदे, आर.डी महाजन,रावसाहेब भदाणे, भास्कर तायडे इत्यादी पालक उपस्थित होते. त्यांनी मनोगतात लाडकुबाई शाळेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर गांगुर्डे तर फलक लेखन श्री अनंत हिरे यांनी केले. व्हिडिओ निर्मिती श्री सुयोग पाटील यांनी केली.शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम संपन्न झाला. शाळेतील सर्व शिक्षक बंधु भगिनींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा

लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा

लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरालाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा

*कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे सर यांनी भूषवले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. लाडकुबाई शाळेचा आदर्श विद्यार्थी सोहम गुरव याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा साकारली तसेच त्यांचे विषयी प्रखर तेजस्वी विचार इंग्रजीमध्ये सादर केले.दोन गटात वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अ गटात सोहम गुरव प्रथम तर दक्षता पाटील यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच ब गटात दिशा बच्छाव प्रथम तर पूर्वा वाघ यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. सदर स्पर्धेत एकूण 42 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्रीमती अनिता सैंदाणे व श्री किरण पाटील यांनी काम पाहिले. सदर स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केले तर फलक लेखन श्री अनंत हिरे यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला. शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.*

ऑन द जॉब ट्रेनिंगमुळे विद्यार्थिनींच्या करिअरला नवी दिशा; प्रशिक्षणातून थेट रोजगार संधी

ऑन द जॉब ट्रेनिंगमुळे विद्यार्थिनींच्या करिअरला नवी दिशा; प्रशिक्षणातून थेट रोजगार संधी

ऑन द जॉब ट्रेनिंगमुळे विद्यार्थिनींच्या करिअरला नवी दिशा; प्रशिक्षणातून थेट रोजगार संधीऑन द जॉब ट्रेनिंगमुळे विद्यार्थिनींच्या करिअरला नवी दिशा; प्रशिक्षणातून थेट रोजगार संधी

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयात तृतीय वर्षातील विद्यार्थिनींना महाविद्यालयीन शिक्षणासोबतच नवीन शिक्षण प्रणाली अंतर्गत प्रत्यक्ष कामाचा अनुभव देणाऱ्या ऑन द जॉब ट्रेनिंग (ओजेटी) या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या करिअरला नवी दिशा मिळत असून, अनेक विद्यार्थिनींना प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उत्कृष्ट नोकरीच्या संधी प्राप्त झाल्याची आनंददायी बाब समोर आली आहे. शैक्षणिक ज्ञानाबरोबरच कौशल्य विकासावर भर देणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली आहे.

महाविद्यालयाच्या सर्व विभागांच्या पुढाकारातून आणि विविध संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत विद्यार्थिनी विविध शाळा, कार्यालये, प्रसार माध्यमे, स्वयंसेवी संस्था आणि उद्योग क्षेत्रात जाऊन १०० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करतात. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थिनींना केवळ कामाची ओळखच नाही, तर जबाबदारी, वेळेचे व्यवस्थापन, संवाद कौशल्य आणि समस्या सोडविण्याची क्षमता यांसारखी जीवनावश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली. या प्रशिक्षणाचा सर्वात सकारात्मक परिणाम म्हणजे अनेक विद्यार्थिनी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच संस्थांमध्ये नोकरीची संधी मिळाली.

मराठी विभागातील आठ विद्यार्थिनींनी रिटेल सेल्स असोसिएट ट्रेनिंग प्रोग्राम या प्रकल्पात ग्राहकांशी व्यावसायिक संवाद व विक्री कौशल्याचे प्रशिक्षण (ओजेटी) अंतर्गत पूर्ण केले. त्यानंतर त्यांना सेन्को गोल्ड अँड डायमंड्स, कॅरेटलेन, तनिष्क, त्रिभुवनदास भीमजी झवेरी आणि तनिष्क यांसारख्या नावाजलेल्या दागिन्यांच्या दुकानांमध्ये नोकरीची संधी मिळाली. हे विशेष प्रशिक्षण जीईएमएस कार्यक्रम (जेम्स कार्यक्रम) हा इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट (आयजीआय) यांचा सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) उपक्रम असून, अ‍ॅसेट्झ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असोसिएशन (एएसआरए) यांच्या माध्यमातून याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थिनींना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनवणे हा आहे.

या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी आपल्या अनुभवांविषयी सांगताना म्हटले की, “पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष काम करताना मिळणारा अनुभव खूप वेगळा असतो. सुरुवातीला थोडी भीती वाटत होती, पण हळूहळू आत्मविश्वास वाढला. शिक्षक आणि संस्थेतील मार्गदर्शकांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे आम्ही काम व्यवस्थित शिकू शकलो.” विद्यार्थिनींच्या कामातील प्रामाणिकपणा, वेळेचे पालन आणि कार्यक्षमता पाहून संबंधित संस्थांनी त्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे.

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी सांगितले की, “ओजेटी हा उपक्रम विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे विद्यार्थिनींना केवळ नोकरी मिळविण्यास मदत होत नाही, तर त्यांना जबाबदार नागरिक बनण्याची प्रेरणाही मिळते. भविष्यातही अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा आमचा प्रयत्न असेल.” तसेच सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या प्रमुखांनीही या उपक्रमाचे कौतुक करत म्हटले की, विद्यार्थिनींमध्ये काम करण्याची तयारी आणि शिकण्याची वृत्ती अत्यंत सकारात्मक आहे. त्यांच्या क्षमतेची ओळख करून त्यांना संधी देणे हे आमचे कर्तव्य आहे. या उपक्रमामुळे संस्थांना सक्षम आणि प्रशिक्षित मनुष्यबळ मिळत आहे.

या यशस्वी उपक्रमामागे प्राध्यापकांचे मार्गदर्शनही तेवढेच महत्त्वाचे ठरले आहे. विद्यार्थिनींना योग्य संस्था निवडणे, प्रशिक्षणाच्या काळात नियमित पाठपुरावा घेणे आणि त्यांच्या अडचणी सोडविणे यासाठी प्राध्यापकांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे विद्यार्थिनींनी प्रशिक्षण काळात उत्तम कामगिरी बजावली. शैक्षणिक क्षेत्रात केवळ गुणांपेक्षा कौशल्यांना महत्त्व दिले जात असताना ओजेटी सारखे उपक्रम विद्यार्थिनींसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. ‘शिका आणि कमवा’ या संकल्पनेला मूर्त रूप देणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना शिक्षणासोबतच आर्थिक स्वावलंबनाचीही जाणीव होत आहे. एकंदरीत, ऑन द जॉब ट्रेनिंग या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल घडून येत असून, त्यांना उज्ज्वल भविष्याची दिशा मिळत आहे.

आरसीबीची एलएसजीवर ५ गडी राखून दमदार मात

आरसीबीची एलएसजीवर ५ गडी राखून दमदार मात

आरसीबीची एलएसजीवर ५ गडी राखून दमदार मात

आरसीबीची एलएसजीवर ५ गडी राखून दमदार मात

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील २३व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौ सुपर जायंट्सवर ५ गडी राखून प्रभावी विजय मिळवत गुणतालिकेत आपली स्थिती अधिक भक्कम केली. एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे झालेल्या या सामन्यात लखनौने २० षटकांत १४६/१० धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने १५.१ षटकांत १४९/५ धावा करत विजय मिळवला.

लखनौची सुरुवात संमिश्र झाली. मिचेल मार्शने ४० धावांची संयमी खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. आयुष बदोनीने ३८ धावा करत मधल्या फळीत प्रतिकार केला. मात्र नियमित अंतराने पडलेल्या विकेट्समुळे लखनौला मोठी भागीदारी उभारता आली नाही. भुवनेश्वर कुमार, रासिख दर सलाम आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अचूक मारा करत लखनौला १४६ धावांवर रोखले.

भुवनेश्वर कुमारने ३ बळी घेत लखनौच्या मधल्या फळीला हादरवले. रासिख दर सलामने ४ बळी घेत डावाचा कणा मोडला. क्रुनाल पंड्याने २ बळी मिळवत दबाव कायम ठेवला. टप्प्याटप्प्याने पडलेल्या विकेट्समुळे लखनौचा डाव शेवटपर्यंत सावरू शकला नाही.

१४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात संथ झाली. फिल सॉल्ट लवकर बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीने ४९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत डाव स्थिर केला. रजत पाटीदारने २७ धावा करत वेग वाढवला. जितेश शर्मा आणि टिम डेव्हिड यांनी मधल्या षटकांत झटपट धावा करत सामना आरसीबीच्या बाजूने झुकवला.

कोहली–पाटीदार भागीदारीने डावाला दिशा दिली. जितेश शर्माच्या आक्रमक फलंदाजीमुळे आवश्यक धावगती कमी होत गेली. शेवटी टिम डेव्हिड आणि रोमॅरियो शेफर्ड यांनी नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला.

लखनौकडून प्रिन्स यादवने ३ बळी घेत प्रभाव टाकला. अवेश खानने २ बळी मिळवत प्रतिकार केला. मात्र शेवटच्या षटकांत आरसीबीने शांत डोके ठेवत सामना सहज जिंकला.

या सामन्यात काही महत्त्वाचे विक्रम नोंदले गेले. आरसीबीने चिन्नास्वामी स्टेडियमवर १४७ पेक्षा कमी लक्ष्याचा यशस्वी पाठलाग पुन्हा एकदा सिद्ध केला. रासिख दर सलामचा ४/२४ हा या हंगामातील लखनौविरुद्धचा सर्वात प्रभावी स्पेल ठरला. विराट कोहलीने सलग सामन्यांमध्ये स्थिर फलंदाजी करत संघाला मजबूत पाया दिला.

या विजयामुळे आरसीबीने स्पर्धेत आपली स्थिती अधिक मजबूत केली असून प्लेऑफच्या शर्यतीत महत्त्वाची झेप घेतली आहे. लखनौला मात्र मधल्या फळीतील अस्थिरता आणि डेथ ओव्हर्समधील अपयश पुन्हा एकदा महागात पडले. २४व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज ही लढत मुंबई येथे रंगणार आहे. वानखेडेच्या वेगवान खेळपट्टीवर मोठ्या धावा, पॉवरप्लेतील आक्रमण आणि डेथ ओव्हर्समधील अचूकता यांची खरी कसोटी लागणार आहे. त्यामुळे पुढील सामना अत्यंत रोमांचक होण्याची शक्यता आहे.

उन्हाळ्यात गरम की थंड पाणी? आरोग्यासाठी नेमकं काय योग्य

उन्हाळ्यात गरम की थंड पाणी? आरोग्यासाठी नेमकं काय योग्य

उन्हाळ्यात गरम की थंड पाणी? आरोग्यासाठी नेमकं काय योग्यउन्हाळ्यात गरम की थंड पाणी? आरोग्यासाठी नेमकं काय योग्य

उन्हाळ्याच्या कडाक्याच्या उष्णतेत शरीराला थंडावा मिळावा म्हणून बहुतांश लोक फ्रिजमधील थंडगार पाणी पिणं पसंत करतात. मात्र आरोग्य तज्ज्ञांच्या मते, खूप थंड पाणी पिणं नेहमीच फायदेशीर नसतं. उलट, सामान्य तापमानाचं किंवा कोमट पाणी पिणं शरीरासाठी अधिक हितावह ठरू शकतं.

तज्ज्ञ सांगतात की, थंड पाणी प्यायल्याने तात्पुरता थंडावा मिळतो, पण यामुळे पचनक्रिया मंदावू शकते. विशेषतः जेवणानंतर थंड पाणी पिणं टाळावं, कारण त्यामुळे अन्न पचण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. तसेच, उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी पिल्यास शरीराच्या तापमानात अचानक बदल होऊन त्रास होण्याची शक्यता असते.

दुसरीकडे, कोमट पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायल्यास चयापचय क्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. तसेच रक्ताभिसरण सुधारण्यासही मदत मिळते.

तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात खूप थंड किंवा खूप गरम पाण्याऐवजी सामान्य तापमानाचं पाणी पिणं हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे पाणी शरीराला सहज पचतं आणि हायड्रेशन टिकवून ठेवतं.

 

उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून दिवसाला किमान २.५ ते ३ लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. ज्या व्यक्तींना जास्त घाम येतो, त्यांनी अधिक पाणी प्यावं. यासोबतच नारळ पाणी, लिंबूपाणी, ताक आणि फळांचे रस यांचाही आहारात समावेश केल्यास शरीराला आवश्यक द्रवपदार्थ मिळतात.

उन्हाळ्यात आरोग्य टिकवण्यासाठी थंड पाण्याचा अतिरेक टाळून सामान्य तापमानाचं पाणी पिणं आणि सकाळी कोमट पाणी घेणं अधिक फायदेशीर ठरतं.

उत्साहात साजरी आंबेडकर जयंती; मिरवणुकीत नागरिकांचा सहभाग

उत्साहात साजरी आंबेडकर जयंती; मिरवणुकीत नागरिकांचा सहभाग

कासोदा प्रतिनिधी :– शैलेश पांडे

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती कासोदा येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कासोदा नगरीचे प्रथम नागरिक बंटी उर्फ पुरुषोत्तम चौधरी होते.

यावेळी समितीचे अध्यक्ष मिलिंद मोरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये माजी सरपंच महेश बापू पांडे, उमेश भाऊ पाटील, सपोनि श्रीकांत पाटील व त्यांचे कर्मचारी, सुदाम तात्या राक्षे, रवी चौधरी तसेच पत्रकार व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमात सपोनि श्रीकांत पाटील, महेश बापू पांडे, उमेश भाऊ पाटील, साहेबराव पानपाटील व सीआरपीएफ जवान स्वप्नील बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ८ वर्षीय रिया पानपाटील हिने केलेल्या भाषणाने उपस्थितांचे लक्ष वेधले.

संध्याकाळी डीजेच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पडली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

पुण्यात ‘यश प्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा दिमाखात संपन्न

पुण्यात ‘यश प्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा दिमाखात संपन्न

पुण्यात ‘यश प्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा दिमाखात संपन्नपुण्यात ‘यश प्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा दिमाखात संपन्न

 

पुणे (गुरुदत्त वाकदेकर): आत्मसिद्ध मिशन आणि विश्व मराठी परिवार यांच्या वतीने आयोजित ‘यश प्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा पुणे डेक्कन येथील हॉटेल ग्रीन सिग्नल, नीलमल हॉल येथे उत्साही आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. देश-विदेशातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांना प्रेरणेचा सन्मान मानला जाणारा हा पुरस्कार यंदाही विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्यकर्त्यांच्या गौरवाने विशेष ठरला.

या प्रसंगी वनराई संस्था — रवींद्र धारिया यांच्या वतीने संस्थेचे सचिव अमितजी, कविराज विजयराव सातपुते, प्रसिद्ध लेखक, पत्रकार व गीतकार श्रीपाद कुलकर्णी, व्यंगचित्रकार नीरज सबनीस तसेच नवीन आश्वासक नेतृत्व पूजा प्रतुल जागडे या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचा विशेष सत्कार करण्यात आला. सामाजिक, साहित्यिक, पत्रकारिता आणि सर्जनशील क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात करण्यात आला.

सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती कटके होते. त्यांच्या मार्गदर्शक आणि विचारप्रवर्तक व्याख्यानाने उपस्थित श्रोते भारावून गेले. प्रमुख पाहुणे म्हणून जयप्रकाश नेऊरगावकर आपल्या सौभाग्यवतींसह उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची प्रतिष्ठा अधिक उंचावली.

कार्यक्रमाचे संयोजन तपेंद्र, गजानन, समता आणि सोनाली यांनी यशस्वीपणे केले. संपूर्ण कार्यक्रमात शिस्तबद्ध मांडणी, प्रसन्न वातावरण आणि आकर्षक सादरीकरण यांची उठावदार छाप दिसून आली. चारुता आपटे यांच्या सुमधुर गायनाने सभागृहात भावस्पर्शी आणि मंत्रमुग्ध करणारा माहोल निर्माण झाला.

आत्मसिद्ध मिशनचे प्रमुख राजेशजी यांच्या प्रभावी संवादातून सकारात्मकता, प्रेरणा आणि आत्मविकासाचा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचला. त्यांच्या करिश्माई संवादाने कार्यक्रमात विशेष चैतन्य निर्माण झाले.

या सोहळ्यास प्रा. संजय पवार, श्रीलिंगम, सुमंगला बाकरे, सनील गाडेकर, माही मस्के, तहेसीन चिंचोलीकर, आकाश मोरे, प्रा. डॉ. प्रियांका जोशी, खाद्य संस्कृती तज्ज्ञ मानसी भोसले, सुयोग कुलकर्णी, प्रा. लहू काळे, निलेशजी, माधुरी ओरसे, कोमल जाधव, नम्रता, पौर्णिमा यादव, सिनेअभिनेत्री नंदिनी, समाजकल्याण अधिकारी शिरसाट साहेब, सातपुते परिवार, राष्ट्रीय पिस्तूल चॅम्पियन प्रथमेश गायकवाड, शृंगेरी शिष्य वेद अभ्यासक श्रीवल्लभजी, दीक्षांतजी यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याची भव्यता आणखी खुलून दिसली.

मराठी गुरु वाय. पी. बाबा यांच्या प्रेरणेतून साकारला जाणारा हा पुरस्कार सोहळा प्रेरणा, सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा उत्सव ठरला. पुणे क्षेत्रासाठी आयोजित हा कार्यक्रम उपस्थितांसाठी ऊर्जा, आनंद आणि प्रेरणेचा अविस्मरणीय अनुभव देणारा ठरला.

सॅमसन–ब्रेविसची झंझावाती भागीदारी, नूरचा फिरकीजादू चेन्नईची कोलकातावर ३२ धावांनी दमदार मात

सॅमसन–ब्रेविसची झंझावाती भागीदारी, नूरचा फिरकीजादू चेन्नईची कोलकातावर ३२ धावांनी दमदार मात

सॅमसन–ब्रेविसची झंझावाती भागीदारी, नूरचा फिरकीजादू चेन्नईची कोलकातावर ३२ धावांनी दमदार मातसॅमसन–ब्रेविसची झंझावाती भागीदारी, नूरचा फिरकीजादू चेन्नईची कोलकातावर ३२ धावांनी दमदार मात

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील २२व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सवर ३२ धावांनी प्रभावी विजय मिळवत स्पर्धेत पुनरागमनाची लय कायम राखली. एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेपॉक, चेन्नई येथे झालेल्या या उच्च दर्जाच्या सामन्यात चेन्नईने २० षटकांत १९२/५ धावांचा भक्कम डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात कोलकाताचा डाव २० षटकांत १६०/७ धावांवर रोखला गेला. संजू सॅमसनच्या आक्रमक फलंदाजीने, डेवाल्ड ब्रेविसच्या वेगवान साथीनं आणि नूर अहमदच्या फिरकीच्या जादूने सामन्याचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकला.

चेन्नईची सुरुवात आत्मविश्वासपूर्ण झाली. संजू सॅमसनने ३२ चेंडूत ४८ धावांची आक्रमक खेळी साकारत डावाला वेगवान गती दिली. दुसऱ्या टोकाला डेवाल्ड ब्रेविसने २९ चेंडूत ४१ धावांची प्रभावी साथ देत मधल्या षटकांत धावगती कायम ठेवली. सॅमसन–ब्रेविस यांची वेगवान भागीदारी हा डावाचा खरा पाया ठरली. याच भागीदारीमुळे चेन्नईने १९० चा टप्पा पार केला. शेवटच्या षटकांत शिवम दुबे आणि जेमी ओव्हरटन यांनी जलद धावा जोडत कोलकातासमोर आव्हान अधिक भक्कम केले.

कोलकाताकडून कार्तिक त्यागीने ४ षटकांत ३५ धावांत २ बळी घेत सुरुवातीला काहीसा प्रतिकार केला. सुनील नरेननेही मधल्या षटकांत धावगती रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र सामन्याचा पहिला टर्निंग पॉइंट १७व्या षटकात दिसला. त्या षटकात चेन्नईच्या फलंदाजांनी सलग चौकार–षटकार ठोकत अतिरिक्त १५ ते २० धावा उभारल्या. हाच उशिराचा वेग अखेरीस निर्णायक ठरला.

१९३ धावांच्या पाठलागात कोलकाताची सुरुवात सावध झाली. अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांना मोठी खेळी करता आली नाही. मधल्या फळीत रामनदीप सिंगने २३ चेंडूत ३५ धावा करत लढा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या टोकाला रोव्हमन पॉवेलने २२ चेंडूत ३१ धावांची झुंजार खेळी केली. काही काळ ही भागीदारी आशादायक वाटत होती; मात्र आवश्यक धावगती सातत्याने वाढत गेल्याने दबाव कोलकातावरच राहिला.

सामन्याचा खरा टर्निंग पॉइंट १४व्या षटकात दिसला. त्या टप्प्यात नूर अहमदने अचूक फिरकी टाकत सलग महत्त्वाच्या विकेट्स घेत कोलकाताचा कणा मोडला. त्याच्या ४ षटकांत २१ धावांत ३ बळी या भेदक स्पेलने पाठलागाची लय पूर्णपणे विस्कळीत केली. दुसऱ्या टोकाला अंशुल कांबोजने २ बळी घेत नूरला प्रभावी साथ दिली. शेवटच्या षटकांत कोलकाताला मोठे फटके खेळता न आल्याने चेन्नईने ३२ धावांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.

या सामन्यात अनेक महत्त्वाचे विक्रम नोंदले गेले. चेन्नई सुपर किंग्जचा हा सलग दुसरा विजय ठरला. कोलकाता नाईट रायडर्सचा हंगामातील विजयविरहित प्रवास अधिकच कठीण झाला. नूर अहमदचे ३/२१ हे चेपॉकवरील या मोसमातील सर्वात प्रभावी फिरकी स्पेलपैकी एक ठरले. संजू सॅमसनने सलग दुसऱ्या सामन्यात प्रभावी खेळी करत मधल्या फळीतील सातत्य सिद्ध केले. या विजयामुळे चेन्नई गुणतालिकेत वर सरकली, तर कोलकाता तळाशी घसरली.

या विजयाने चेन्नई सुपर किंग्जचा आत्मविश्वास निश्चितच उंचावला आहे. पुढील २३व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स ही लढत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे रंगणार आहे. छोट्या मैदानावर पॉवरप्लेतील धडाका, मधल्या षटकांतील फिरकीविरुद्ध संयम आणि डेथ ओव्हर्समधील अचूक अंमलबजावणी किती निर्णायक ठरते, याची प्रभावी पार्श्वभूमी या चेन्नई–कोलकाता सामन्याने तयार करून दिली आहे. चिन्नास्वामीवरील आक्रमक फलंदाजी आणि लखनौच्या संतुलित गोलंदाजीची थेट कसोटी पाहायला मिळणार असल्याने पुढील सामना अधिकच रंगतदार ठरेल.

Don`t copy text!