भडगावात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंती निमित्त भव्य मिरवणुक 

भडगावात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंती निमित्त भव्य मिरवणुक 

भडगाव:(जावेद शेख)

येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.११ एप्रिल रोजी सकाळी क्रांतीसुर्य महात्मा फुले चौक येथे महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन माळी समाजबांधव व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सायंकाळी सात वाजता सजवलेल्या ट्रॅक्टरवर भक्तिमय गीते वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक महात्मा फुले चौक येथून, मेन रोड,बालाजी गल्ली, जागृती चौक, शनी चौक, बाजार चौक, खोल गल्ली येथून रथ मार्ग महात्मा फुले चौक येथे सांगता करण्यात आली.

यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये भडगाव नगरपालिकेचे गटनेते लखिचंद पाटील,नगरसेवक सचिन चोरडिया,नगरसेवक देवाजी अहिरे,एकलव्य संघटनेचे रविंद्र सोनवणे,संजय सोनवणे, हर्षल पाटील,निलेश मालपुरे, रवि अहिरे,विजय महाजन,ज्येष्ठ पत्रकार शिवदास महाजन, महात्मा फुले बहुद्देशीय संस्थेचे भिकन महाजन,साहेबराव महाजन, विनोद महाजन, जग्गू भोई,सुनील महाजन, अमोल महाजन,प्रदीप महाजन,गणेश महाजन,पत्रकार नितीन महाजन,देवराम(आबा) महाजन, पत्रकार सागर महाजन,पत्रकार चेतन महाजन,पत्रकार विजय महाजन,दीपक महाजन, मुकुंदा महाजन, विष्णू महाजन,दिनेश महाजन,छोटू महाजन,गोरख महाजन, विकास महाजन,अशोक महाजन, रमेश महाजन, संतोष महाजन, गोकुळ महाजन, रावसाहेब महाजन,बबलू महाजन,दत्तात्रय महाजन, अनिल महाजन यांच्यासह महात्मा फुले बहुद्देशीय सेवा मंडळ व माळी पंच मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन व आभार प्रविण महाजन सर यांनी केले.

५० शेळ्या, ५ बोकडांसाठी ८.५ लाखांपर्यंत अनुदान; ग्रामीण भागात स्वयंरोजगाराला चालना

५० शेळ्या, ५ बोकडांसाठी ८.५ लाखांपर्यंत अनुदान; ग्रामीण भागात स्वयंरोजगाराला चालना

५० शेळ्या, ५ बोकडांसाठी ८.५ लाखांपर्यंत अनुदान; ग्रामीण भागात स्वयंरोजगाराला चालना

५० शेळ्या, ५ बोकडांसाठी ८.५ लाखांपर्यंत अनुदान; ग्रामीण भागात स्वयंरोजगाराला चालना

ग्रामीण भागातील शेतकरी, वनहक्क धारक तसेच महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने ‘शेळी-मेंढी पालन उद्योजकता विकास योजना’ सुरू केली असून, या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ५० शेळ्या किंवा मेंढ्या आणि ५ बोकड किंवा मेंढे असा पूर्ण प्रकल्प उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जात आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागात स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होत आहे.

या योजनेत एकूण प्रकल्प खर्च सुमारे ११ लाख ३८ हजार ५५४ रुपये इतका असून, प्रवर्गानुसार अनुदानाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के म्हणजे ५ लाख ६९ हजार २७७ रुपये अनुदान मिळते, तर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी ७५ टक्के म्हणजे ८ लाख ५३ हजार ९१५ रुपये इतके अनुदान देण्यात येते. अनुदानाची रक्कम दोन टप्प्यांत वितरित केली जाते. पहिला हप्ता शेड बांधकाम व साधनसामुग्री खरेदीनंतर, तर दुसरा हप्ता पशुधन खरेदीनंतर थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.

या प्रकल्पांतर्गत ५० शेळ्या किंवा मेंढ्या व ५ बोकड किंवा मेंढे खरेदीसाठी सुमारे ६ लाख ७५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. याशिवाय शेड बांधणीसाठी २ लाख रुपये, कडबा कुट्टी यंत्रासाठी ३० हजार रुपये, ३ किलोवॅट सौरऊर्जा यंत्रणेसाठी १ लाख ३२ हजार रुपये आणि पशुधनाच्या तीन वर्षांच्या विम्यासाठी १ लाख १ हजार ५५४ रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे.

लाभार्थ्यांची निवड ‘उतरत्या प्राधान्यक्रमानुसार’ केली जाते. यात अत्यल्प भूधारक (१ हेक्टरपर्यंत जमीन) यांना प्रथम प्राधान्य देण्यात येते. त्यानंतर अल्प भूधारक, वनहक्क धारक व महिला बचत गटांचा समावेश केला जातो. योजनेत महिलांसाठी ३० टक्के व दिव्यांगांसाठी ५ टक्के आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी काही महत्त्वाच्या अटी घालण्यात आल्या आहेत. पशुधनाची खरेदी समितीच्या उपस्थितीत करणे बंधनकारक आहे. जनावरांचे वय १ ते ३ वर्षे असणे आवश्यक असून ती स्थानिक वातावरणास अनुकूल असावीत. निवड झाल्यानंतर एका महिन्याच्या आत शेड बांधकाम, साधनसामुग्री व पशुधन खरेदी पूर्ण करणे बंधनकारक आहे. अन्यथा लाभार्थ्याचे नाव प्रतीक्षा यादीत खाली ढकलले जाते. तसेच पशुधनाचा तीन वर्षांसाठी विमा काढणे अनिवार्य असून, जनावरांचा मृत्यू झाल्यास विम्याच्या रकमेतील नवीन पशुधन खरेदी करणे आवश्यक आहे.

पात्रतेसाठी अर्जदाराकडे किमान एक एकर जमीन किंवा किमान पाच वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा असणे आवश्यक आहे. वनहक्क धारकांना या अटीत सवलत देण्यात आली आहे. तसेच पशुपालनाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय किंवा तालुका पशुसंवर्धन कार्यालयात अर्ज सादर करावा. प्राथमिक पडताळणीनंतर पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असून, ठराविक कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण केल्यानंतर अनुदान थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहे.

ग्रामीण भागात शेतीला पूरक व्यवसाय वाढवून शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असून, यामुळे बेरोजगारी कमी होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सॅमसनचा शतकी झंझावात, ओव्हरटनचा घातक मारा; चेन्नईचा दिल्लीवर २३ धावांनी दमदार विजय

सॅमसनचा शतकी झंझावात, ओव्हरटनचा घातक मारा; चेन्नईचा दिल्लीवर २३ धावांनी दमदार विजय

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील १८व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सवर २३ धावांनी प्रभावी विजय मिळवत हंगामातील पुनरागमनाला भक्कम दिशा दिली. एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेपॉक, चेन्नई येथे झालेल्या या उच्च दर्जाच्या लढतीत चेन्नईने २० षटकांत २१२/२ धावांचा भक्कम डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात दिल्लीचा डाव २० षटकांत १८९ धावांवर आटोपला. संजू सॅमसनच्या शतकी झंझावाताने आणि जेमी ओव्हरटनच्या अचूक गोलंदाजीने सामन्याचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकला.

चेन्नईची सुरुवात आत्मविश्वासपूर्ण झाली. संजू सॅमसनने पहिल्याच षटकापासून आक्रमक सूर लावत दिल्लीच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. त्याने अवघ्या ५६ चेंडूत ११५ नाबाद धावांची वादळी खेळी साकारली. चौकार आणि षटकारांचा सुंदर मिलाफ त्याच्या डावात पाहायला मिळाला. दुसऱ्या टोकाला आयुष म्हात्रेने ३६ चेंडूत ५९ धावांची झंझावाती खेळी करत त्याला तितकीच भक्कम साथ दिली. सॅमसन–म्हात्रे यांची १५० पेक्षा अधिक धावांची निर्णायक भागीदारी हा चेन्नईच्या डावाचा खरा कणा ठरली. याच भागीदारीमुळे संघाने २१० पार मजल मारली.

दिल्लीकडून अक्षर पटेलने मधल्या षटकांत एक महत्त्वाचा बळी घेत काहीसा ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र सामन्याचा पहिला टर्निंग पॉइंट १७व्या षटकात दिसला. त्या षटकात सॅमसनने सलग मोठे फटके खेचत धावगती अचानक वाढवली. शेवटच्या चार षटकांत चेन्नईने वेगाने धावा उभारत दिल्लीसमोर प्रचंड लक्ष्य ठेवले. याच अतिरिक्त १५ ते २० धावा अखेरीस निर्णायक ठरल्या.

२१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात वेगवान झाली. केएल राहुल आणि पाथुम निस्संका यांनी पॉवरप्लेमध्ये धडाकेबाज फटकेबाजी केली. निस्संकाने २४ चेंडूत ४१ धावा केल्या. मात्र मधल्या षटकांत जेमी ओव्हरटनने सामन्याचा संपूर्ण रंग बदलला. त्याने अचूक टप्प्यावर मारा करत दिल्लीच्या मधल्या फळीला हादरे दिले. ट्रिस्टन स्टब्सने ३८ चेंडूत ६० धावा करत लढा जिवंत ठेवला, पण वाढती धावगती दिल्लीला महाग पडली. अखेरीस संपूर्ण संघ १८९ धावांवर रोखला गेला.

सामन्याचा खरा टर्निंग पॉइंट १४व्या ते १६व्या षटकांत दिसला. या टप्प्यात ओव्हरटनने स्टब्ससह दोन महत्त्वाच्या विकेट्स घेत दिल्लीचा कणा मोडला.

१४व्या षटकातील सलग दोन चौकारांनी दिल्लीच्या विजयाचा मार्ग जवळजवळ निश्चित झाला होता; मात्र लगेचच ओव्हरटनच्या अचूक स्पेलने संपूर्ण समीकरण उलटवले.

त्या एका स्पेलमुळे आवश्यक धावगती नियंत्रणाबाहेर गेली. त्यानंतर अंशुल कांबोजनेही अचूक गोलंदाजी करत ३ बळी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.

या सामन्यात अनेक महत्त्वाचे विक्रम नोंदले गेले. संजू सॅमसनचे ११५ नाबाद हे चेन्नईसाठी हंगामातील पहिले शतक ठरले. चेन्नईचा सलग पराभवाचा दुष्काळ संपुष्टात आला. जेमी ओव्हरटनचे ४/१८ हे या हंगामातील चेन्नईकडून सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन ठरले. चेपॉकवर २०० पेक्षा अधिक धावा करून यशस्वी बचाव करण्याची चेन्नईची परंपरा या सामन्याने अधिक मजबूत केली.

या विजयाने चेन्नई सुपर किंग्जचा आत्मविश्वास निश्चितच उंचावला आहे. या विजयाने पुढील १९व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स लढतीसाठीही मधल्या षटकांतील नियंत्रण, फिरकीचा प्रभाव आणि मोठ्या भागीदाऱ्या किती निर्णायक असतात, याची ठळक पार्श्वभूमी तयार केली आहे. त्याचवेळी २०व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या मुंबईतील रंगतदार सामन्यात घरच्या मैदानावरील आक्रमक फलंदाजी, पॉवरप्लेतील धडाका आणि डेथ ओव्हर्समधील अचूक अंमलबजावणी या तीन घटकांवर सामन्याचे भविष्य ठरणार आहे.

चेन्नईसमोर आता डेथ बॉलिंगमधील सातत्य, मधल्या फळीतील स्थिरता आणि मोठ्या धावसंख्येचा बचाव करताना दबावाखाली शांत राहणे ही तीन मोठी आव्हाने उभी आहेत. या विजयाने मात्र संघाला नवसंजीवनी मिळाली असून स्पर्धेला नवी ऊर्जा आणि नवा थरार प्राप्त झाला आहे.

अभिषेक–हेडचा झंझावात व्यर्थ; श्रेयस–प्रियांशच्या आक्रमणाने पंजाबची ६ गडी राखून हैदराबादवर दमदार मात

अभिषेक–हेडचा झंझावात व्यर्थ; श्रेयस–प्रियांशच्या आक्रमणाने पंजाबची ६ गडी राखून हैदराबादवर दमदार मात

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील १७व्या सामन्यात पंजाब किंग्जने सनरायझर्स हैदराबादवर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवत स्पर्धेतील आपले आव्हान अधिक भक्कम केले. महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यू चंदीगड येथे झालेल्या या धावांचा पाऊस पाडणाऱ्या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत २१९/६ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात पंजाबने १८.५ षटकांत २२३/४ धावा करत ७ चेंडू राखून लक्ष्य गाठले. श्रेयस अय्यर आणि प्रियांश आर्य यांच्या निर्णायक भागीदारीने सामन्याचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकला.

हैदराबादची सुरुवात वादळी झाली. अभिषेक शर्माने अवघ्या २८ चेंडूत ७४ धावांची तुफानी खेळी साकारत पॉवरप्लेमध्येच पंजाबवर दबाव निर्माण केला. ट्रॅव्हिस हेडने २३ चेंडूत ३८ धावा करत त्याला उत्तम साथ दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी केवळ ३६ चेंडूत १०० धावांची भागीदारी उभारत सामन्याला स्फोटक सुरुवात दिली. पॉवरप्लेमध्ये १०५/० ही नोंद या हंगामातील सर्वात वेगवान सुरुवातींपैकी एक ठरली. शेवटच्या टप्प्यात हेन्रिक क्लासेनने संयमी धावा जोडत संघाला २१९ पर्यंत पोहोचवले.

पंजाबकडून शशांक सिंगने अनपेक्षित पण प्रभावी गोलंदाजी करत ३ षटकांत २० धावांत २ बळी घेत सामन्याचा पहिला टर्निंग पॉइंट घडवला. पॉवरप्लेनंतर त्याने अभिषेक आणि हेड या दोघांना बाद करत हैदराबादच्या धावगतीला अचानक ब्रेक लावला. पहिल्या ६ षटकांत १०५ धावा करणाऱ्या हैदराबादला पुढील १४ षटकांत केवळ ११४ धावांवर रोखणे हे पंजाबच्या गोलंदाजीचे सर्वात मोठे यश ठरले.

२२० धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात तितकीच आक्रमक झाली. प्रियांश आर्याने अवघ्या २० चेंडूत ५७ धावांची झंझावाती खेळी करत लक्ष्याचा दबाव पूर्णपणे कमी केला. दुसऱ्या टोकाला कर्णधार श्रेयस अय्यरने ३३ चेंडूत ६९ धावांची नाबाद कर्णधार खेळी साकारत शेवटपर्यंत डाव सांभाळला. प्रियांश–श्रेयस यांची वेगवान भागीदारी हा विजयाचा खरा पाया ठरली. दोघांनी मधल्या षटकांत फिरकी आणि वेगवान गोलंदाजांवर अचूक हल्ला चढवत आवश्यक धावगती पूर्णपणे पंजाबच्या बाजूला ठेवली.

सामन्याचा खरा टर्निंग पॉइंट १५व्या षटकात दिसला. त्या षटकात श्रेयस अय्यरने सलग मोठे फटके खेचत समीकरण पूर्णपणे पंजाबच्या नियंत्रणात आणले. अखेरच्या ५ षटकांत पंजाबने ६४ धावा फटकावत हैदराबादच्या डेथ बॉलिंगची पूर्णपणे पोलखोल केली. त्यानंतर शशांक सिंगने शेवटच्या टप्प्यात शांत आणि परिपक्व फलंदाजी करत विजयावर शिक्कामोर्तब केले. १८.५ षटकांत २२३ धावांचा यशस्वी पाठलाग हा या हंगामातील सर्वात प्रभावी चेसपैकी एक ठरला.

हैदराबादकडून शिवांग कुमारने ३ बळी घेत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. हर्ष दुबेने मधल्या षटकांत एक महत्त्वाचा बळी घेत पंजाबला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र श्रेयस–प्रियांशसमोर गोलंदाजीचा प्रभाव कमी पडला. डेथ ओव्हर्सपूर्वीच पंजाबने विजय मिळवत आपल्या फलंदाजीची खोली दाखवून दिली.

या सामन्यात अनेक महत्त्वाचे विक्रम नोंदले गेले. पॉवरप्लेमधील १०५/० ही हैदराबादची धावसंख्या हंगामातील सर्वोच्च सुरुवातींपैकी एक ठरली. पंजाबने २२० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग १९ षटकांपूर्वी पूर्ण करत या हंगामातील सर्वात दमदार पाठलागाची नोंद केली. श्रेयस अय्यरची ३३ चेंडूत ६९ नाबाद खेळी ही कर्णधार म्हणून दबावाखाली खेळलेल्या सर्वोत्तम डावांपैकी एक मानली जात आहे.

या विजयाने पंजाब किंग्जचा आत्मविश्वास आणखी उंचावला आहे, तर सनरायझर्स हैदराबादला पॉवरप्लेनंतरच्या मधल्या षटकांतील फलंदाजीवर नव्याने विचार करावा लागणार आहे.

मोंढाळे येथील जि.प. शाळेत सामान्य ज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात

मोंढाळे येथील जि.प. शाळेत सामान्य ज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहातमोंढाळे येथील जि.प. शाळेत सामान्य ज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात

मोंढाळे ता. पाचोरा :

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या “आपला महाराष्ट्र” सामान्य ज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शाळा व्यवस्थापन समितीच्या (SMC) पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी तसेच त्यांना आपल्या जिल्ह्याची सखोल माहिती मिळावी, या उद्देशाने दि. 4 एप्रिल 2026 रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत एकूण 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. “आपला महाराष्ट्र” या विषयावर आधारित 30 प्रश्नांची ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक ठरली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उत्कृष्ट कामगिरी केली.

शनिवारी सकाळी 8:10 वाजता आयोजित छोटेखानी समारंभात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, लेखन साहित्य, लेखन पॅड व कंपास बॉक्स देऊन गौरविण्यात आले.

यावेळी SMC सदस्य तथा शिक्षणप्रेमी धनराज पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला.

या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एकनाथ सोनवणे, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सर्व सदस्य, मुख्याध्यापक सुनील पाटील व शिक्षकवृंद उपस्थित होते.

विशेष म्हणजे, स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात आलेली प्रमाणपत्रे पदवीधर शिक्षक राजेंद्र कोळी यांनी स्वतःच्या घरी फोटो पेपरवर रंगीत प्रिंट काढून तयार केली होती.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपशिक्षक व्यंकट बोरशे, गोपाल पाटील, पदवीधर शिक्षक रविंद्र कुंभार, उपशिक्षिका मीना नेहरकर, राजश्री आहेर तसेच मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापकांनी उपस्थितांचे आभार मानले.

कासोदा पोलिसांची धडक कारवाई : 1200 लिटर हातभट्टी दारूसह रसायन नष्ट

कासोदा पोलिसांची धडक कारवाई : 1200 लिटर हातभट्टी दारूसह रसायन नष्टकासोदा पोलिसांची धडक कारवाई : 1200 लिटर हातभट्टी दारूसह रसायन नष्ट

कासोदा प्रतिनिधी :-

कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर कासोदा पोलिसांनी शनिवारी (दि. 11) पहाटे धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर रसायन, तयार दारू व साहित्य नष्ट केले.

ताडे, आडगाव, निपाणे व नांदखुर्द बु. या गावांच्या शिवारात सुरू असलेल्या बेकायदेशीर हातभट्टी अड्ड्यांवर पोलिसांनी नियोजनबद्ध छापे टाकले. या कारवाईत हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे सुमारे 1200 लिटर रसायन, तयार दारू तसेच साहित्य जप्त करून घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.

जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ₹60 हजार इतकी असून, या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात अवैध दारू संदर्भात चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

प्रभारी अधिकारी सपोनि श्रीकांत पाटील यांनी विशेष नियोजन करून चार पथके तयार केली होती. या पथकांनी समन्वय साधत एकाच वेळी छापे टाकून अवैध हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या.

या कारवाईत रामकृष्ण पाटील, नंदलाल परदेशी, किरण गाडीलोहार, अकिल मुजावर, योगेश पाटील, लहु हटकर, कुणाल देवरे व सोनू पाचुंदे यांनी सहभाग नोंदवला.

भाजपा महिला मोर्चा भडगांव मंडल अध्यक्षपदी योजना पाटील यांची निवड.

भाजपा महिला मोर्चा भडगांव मंडल अध्यक्षपदी योजना पाटील यांची निवड.

भडगांव जावेद शेख

भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम भडगांव मंडळ कार्यकारणी मा. मुख्यमंत्री ना. देवेन्द्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या आदेशान्वये नामदार गिरीश महाजन, महामंत्री राजेश पांडे, प्रभारी रविंद्र अनासपुरे, खासदार स्मिताताई वाघ,

आमदार मंगेश चव्हाण, यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या मान्यतेने भडगांव मंडल अध्यक्ष विनोद नेरकर यांनी भडगांव मंडल भाजपा महिला मोर्चा अध्यक्षपदी योजना पाटील यांची निवड जाहीर केली आहे. योजना पाटील यांचे भडगांव शहर तालुक्यात सामाजिक, सांस्कृतिक, क्षौक्षणिक, धार्मिक, शासकीय योजना, सहकार क्षेत्रात मोठे योगदान आहे, सदर योगदानाची दखल घेत त्यांना ही जबाबदारी पक्षाकडून देण्यात आली आहे. योजनाताई पाटील यांनी भडगांव नगरपरिषद, शेतकरी सहकारी संघ, महिला दक्षता समिती,

संजय गांधी निराधार योजना, पिपल्स बँक, तनिष्का यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान, दामिनी महिला संघ आदी प्रमुख पदावर यशस्वीरित्या सेवा कार्य आहे. त्यांच्या निवडीचे पक्ष पदाधिकारींसह माजी आमदार दिलीप वाघ, निर्मल सिडस् संचालिका वैशाली सूर्यवंशी, युवा नेते अमोल शिंदे, किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रताप पाटील, पीटीसी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.

५ एकर नैसर्गिक शेती व दुग्धव्यवसायातून २८ लाखांचे उत्पन्न,इंजिनिअरिंगची नोकरी सोडून हर्षल पाटील यांचा यशस्वी प्रयोग

५ एकर नैसर्गिक शेती व दुग्धव्यवसायातून २८ लाखांचे उत्पन्न,इंजिनिअरिंगची नोकरी सोडून हर्षल पाटील यांचा यशस्वी प्रयोग

 

भडगाव वार्ताहर :

तालुक्यातील वाडे येथील तरुण शेतकरी हर्षल अशोक पाटील यांनी इंजिनिअरिंगची नोकरी सोडून शेतीत उतरून नैसर्गिक भाजीपाला शेती व दुग्धव्यवसायाचा यशस्वी संगम साधला आहे. या उपक्रमातून ते वर्षाकाठी सुमारे २७ ते २८ लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळवत असून त्यांच्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा होत आहे.

हर्षल पाटील यांनी ५ एकर क्षेत्रात कारले, गिलके, दोडके, गवार, भेंडी, वांगे, मिरची यांसह एकूण १८ प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली आहे. ही लागवड वर्षातून दोन टप्प्यांत केली जाते. विशेष म्हणजे या शेतीत रासायनिक खते किंवा औषधांचा वापर न करता पूर्णतः नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केला जातो.

शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी १३५ गिर गायींचे पालन केले असून दुग्धव्यवसायही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दररोज सुमारे १३५ ते १४० लिटर दूध मिळते. या दुधापासून तूप तयार करून त्याची विक्री केली जाते. तसेच गोमूत्र, ताक, जीवामृत व बिजामृत यांचा वापर भाजीपाला पिकासाठी केला जातो.

भाजीपाला उत्पादनासाठी मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन व मंडप पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. पिकांना गूळ व खाण्याचा सोडा ठिबकद्वारे दिला जातो. पूर्णपणे विषमुक्त व ताजा भाजीपाला तयार करून तो वाडे ते धुळे असा सुमारे ६० किलोमीटर अंतर पार करत ग्राहकांना घरपोच दिला जातो. यासाठी व्हॉट्सअॅप गट तयार करण्यात आला असून सुमारे ४० डॉक्टरांसह अनेक ग्राहक नियमित भाजीपाला खरेदी करतात.

आर्थिकदृष्ट्या पाहता ५ एकर भाजीपाला शेतीसाठी वर्षाकाठी २ ते ३ लाख रुपये खर्च येतो, तर यातून सुमारे १४ ते १५ लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते. दुग्धव्यवसायासाठी सुमारे ७ लाख खर्च येतो, तर त्यातून १३ लाखांपर्यंत निव्वळ उत्पन्न मिळते. अशा प्रकारे दोन्ही व्यवसायातून मिळून एकूण २७ ते २८ लाख रुपयांचे वार्षिक निव्वळ उत्पन्न मिळत आहे

हर्षल पाटील यांचे वडील प्रा. अशोक डिगांबर पाटील (सेवानिवृत्त) यांच्या मालकीची १५ एकर शेती असून पूर्वी पारंपरिक पिके घेतली जात होती. मात्र हर्षल यांनी बी.ई. (ऑटोमोबाईल) पूर्ण केल्यानंतर शेतीत नवीन प्रयोग सुरू केले.

“नैसर्गिक शेतीमुळे खर्च कमी होतो आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढते. दुग्धव्यवसायाच्या मदतीने शेती अधिक सक्षम होते,” असे हर्षल पाटील यांनी सांगितले.

नैसर्गिक शेती व दुग्धव्यवसायाचा हा यशस्वी प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी त्यांच्या शेताला भेट देत असून हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.

फोटो कॅप्शन :

1. वाडे येथे भाजीपाला काढताना शेतकरी हर्षल पाटील व मजूर.

2. गायींपासून जीवामृत तयार करताना प्रा. अशोक पाटील व शेतातील भाजीपाला.

जिल्हा परिषद उर्दू शाळेत महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्सवात साजरी

जिल्हा परिषद उर्दू शाळेत महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्सवात साजरीजिल्हा परिषद उर्दू शाळेत महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्सवात साजरी

भडगाव ता. प्रतिनिधी :-अमीन पिंजारी

कजगाव (ता. भडगाव) येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महात्मा फुले समता परिषद व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी महात्मा ज्योतिबा फुले, आई सावित्रीबाई फुले तसेच शेख फातिमा यांचे थोर विचारवंतांच्या विचारांवर उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद चे तालुका अध्यक्ष भानुदास महाजन, अमिन शहा (पत्रकार), शाळा समितीचे अध्यक्ष अन्वर तांबोळी, मुख्याध्यापिका शेख बुरानुद्दीन, मोईनुद्दीन, सादिया बेगम, खालील अहमद शाहीना, आफिफ खान, शिक्षकवर्ग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख बुरानुद्दीन सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाहीना खान यांनी मानले.

 

कजगाव येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सवात साजरी

कजगाव येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सवात साजरीकजगाव येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सवात साजरी

भडगाव ता.प्रतिनिधी :- आमीन पिंजारी

कजगाव (ता. भडगाव) येथे क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त सावता माळी चौक परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

या कार्यक्रमाला लोकनियुक्त सरपंच रघुनाथ महाजन, माजी जिल्हा परिषद सभापती एकनाथ महाजन, पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन राजेंद्र पाटील, विक्रम महाजन, माजी पंचायत समिती सदस्य अशोक सोनवणे, विठ्ठल शिंदे, उत्तम मोरे, पोपट महाजन, आबा महाजन, कैलास महाजन, राजेंद्र चव्हाण, अनिल महाजन, अनिल टेलर, पुंडलिक सोनवणे, दिनेश टेलर, विजय गायकवाड, जयराम महाजन, शिवप्रसाद भालेराव, रामा चौधरी, भोजराज चव्हाण, शांताराम महाजन, विजय चव्हाण, रावसाहेब महाजन, विकास चव्हाण, संजय महाजन, विजय पाटील, बंटी महाजन, गोरख महाजन, पिंटू महाजन, दीपक जाधव, देविदास मिस्तरी, ज्ञानेश्वर महाजन, भाजू वाघ, मयूर महाजन यांच्यासह असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला असून त्यांच्या विचारांचे स्मरण करून समाजातील सर्व घटकांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

 

Don`t copy text!