कासोदा येथे पूर्वीच्या आर्थिक वादातून दोन गटांमध्ये मारहाण; गुन्हे दाखल

65 / 100 SEO Score

कासोदा येथे पूर्वीच्या आर्थिक वादातून दोन गटांमध्ये मारहाण; गुन्हे दाखलकासोदा येथे पूर्वीच्या आर्थिक वादातून दोन गटांमध्ये मारहाण; गुन्हे दाखल

कासोदा प्रतिनिधी :–

येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्वीच्या आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून दोन गटांमध्ये मारहाणीच्या घटना घडल्या असून, दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी रात्री टी.टी.एस. चौक व गरीब नवाज चौक परिसरात या घटना घडल्या. पहिल्या घटनेत फिर्यादी शौएब मुस्तफाखान (वय २६, व्यवसाय – केटरिंग) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पूर्वीच्या आर्थिक व्यवहारावरून वाद सुरू होता. याच वादातून आरोपींनी त्यांना फोन करून बोलावले. रात्री सुमारे ९.३० वाजता टी.टी.एस. चौकात जात असताना काही जणांनी एकत्र येऊन त्यांना अडवून शिवीगाळ करत लोखंडी रॉड व काठ्यांनी मारहाण केली. या घटनेत फिर्यादीच्या हात व डोक्याला दुखापत झाली.

तसेच, याच रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या घटनेत फिर्यादीचा भाऊ शाकीब मुन्नाफखान यालाही आरोपींनी अडवून काठ्यांनी व धारदार हत्याराने मारहाण केली, ज्यात त्याच्या पाय व चेहऱ्यावर दुखापत झाली.

दरम्यान, दुसऱ्या बाजूने फिर्यादी हसीन खान जमशेर खान (वय ३३, व्यवसाय – चादर विक्री) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रात्री ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान काही आरोपींनी त्यांच्या दुकानात घुसून पूर्वीच्या पैशांच्या वादातून मारहाण केली. आरोपींनी लोखंडी फाट्याने तोंड, ओठ व डोक्यावर प्रहार करून दुखापत केली तसेच गळ्यातील चांदीची चैन जबरदस्तीने तोडून नुकसान केले व जीवे मारण्याची धमकी दिली.

दोन्ही घटनांमध्ये संबंधित आरोपींविरुद्ध कासोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!