भडगाव प्रतिनिधी :—
तालुक्यातील निंभोरा येथील रहिवाशी स्व.सुमनबाई निंबा पाटील यांच्या पुण्यस्मरणा निमित्त दि. २६ रोजी बुधवारी राञी ९ वाजता हभप. शिवानी गवळी तहाराबाद वृंदावन यांचा किर्तनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. हा कार्यक्रम निंभोरा येथील श्रीराम मंदिरासमोरील चौकात होणार आहे. तरी या कीर्तनाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे आव्हान निंभोरा येथील निंबा शिवराम पाटील यांच्या परीवारा मार्फत करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमास निंभोरा, पांढरद येथील भजनी मंडळाचे सहकार्य लाभणार आहे.
