डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित 'कचरा व्यवस्थापन' या पुस्तकाचे प्रकाशन

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशनडॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित 'कचरा व्यवस्थापन' या पुस्तकाचे प्रकाशन

भडगाव प्रतिनिधी :-

बुद्ध पौर्णिमेच्या पर्वावर तसेच महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित भडगाव येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील डॉ. प्राजक्ता विजयकुमार देशमुख आणि पाचोरा येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील डॉ. शारदा दशरथ शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन (Waste Management)’ या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय ओंकार वाघ यांच्या शुभहस्ते पुस्तक प्रकाशन संपन्न झाले. याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व्ही.टी. जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

नवीन शैक्षणिक धोरण – 2020 (NEP- 2020)नुसार द्वितीय वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान वर्गांच्या मुक्त वैकल्पिक विषयांच्या (Open Elective) अभ्यासक्रमावर हे पुस्तक आधारित आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा हे पुस्तक उपयुक्त आहे.

यावेळी पाचोरा महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ.जे.व्ही. पाटील, सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. अतुल देशमुख, एरंडोल महाविद्यालयाचे प्रा. योगेश सूर्यवंशी, गो. से. हायस्कूलचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक शांताराम चौधरी उपस्थित होते.

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार दिलीप ओंकार वाघ, मानद सचिव ॲड. महेश सदाशिवराव देशमुख, सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड व श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे यांचे पुस्तक प्रकाशनानिमित्त अभिनंदन केले.

साप्ताहिक सूक्ष्मलोक वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा संपन्न

साप्ताहिक सूक्ष्मलोक वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा संपन्न.!!!

साप्ताहिक सूक्ष्मलोक वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा संपन्न.!!!साप्ताहिक सूक्ष्मलोक वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा संपन्न.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने दिनांक १ मे रोजी साप्ताहिक सूक्ष्मलोक या वृत्तपत्राचा भव्य प्रकाशन सोहळा मा. तहसीलदार यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

या प्रसंगी वृत्तपत्राचे संपादक विठ्ठल कौतिक पाटील यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली साप्ताहिक सूक्ष्मलोक हे वृत्तपत्र समाजातील विविध प्रश्न, स्थानिक घडामोडी आणि जनहिताचे मुद्दे प्रभावीपणे मांडण्याचा संकल्प घेऊन सुरू करण्यात आले आहे.

मा. तहसीलदार शीतल सोलाट यांनी आपल्या मनोगतात वृत्तपत्राच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत निष्पक्ष व निर्भीड पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमास विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

गॅस एजन्सी गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी; अट्टल टोळी जेरबंद ४.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गॅस एजन्सी गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी; अट्टल टोळी जेरबंद ४.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईगॅस एजन्सी गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी; अट्टल टोळी जेरबंद ४.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव, प्रतिनिधी :-

फैजपूर व वरणगाव परिसरातील गॅस एजन्सींच्या गोडाऊनचे कुलूप तोडून मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून दोन्ही गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश आले आहे.

फैजपूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७८/२०२६ व वरणगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते.

काय घडले होते.?दि. २५ एप्रिल रोजी फैजपूर येथील श्रीधर गॅस एजन्सीचे संचालक ललित रघुनाथ राणे यांनी त्यांच्या गोडाऊनचे कुलूप तोडून ३.११ लाख रुपये किमतीचे १०० भरलेले गॅस सिलेंडर चोरीस गेल्याची तक्रार दाखल केली होती.

तसेच, दि. २६ फेब्रुवारी रोजी वरणगाव येथेही अशाच प्रकारे ५७ गॅस सिलेंडर चोरी झाल्याची तक्रार भारत गॅस वितरक नरेंद्र अहिरे यांनी नोंदवली होती.

तपासात मिळाले यश,दोन्ही गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी विशेष पथके तयार केली होती.

गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि घटनास्थळावरील पुरावे यांच्या आधारे संशयित वाहनांचा मागोवा घेण्यात आला. त्यातून आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींची नावे

शेख बिलाल शेख नबी (रा. कासोदा, ता. एरंडोल)

वसीम खान शाबीर खान (रा. तांबापुरा, जि. जळगाव)

चेतन सुरेश काळे (रा. नशिराबाद, ता. भुसावळ)

चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून इतर साथीदारांचाही शोध सुरू आहे.

जप्त मुद्देमाल

६२ भरलेले गॅस सिलेंडर – ₹१,५५,०००

९५ रिकामे गॅस सिलेंडर – ₹१,४२,५००

सुझुकी बर्गमन मोपेड – ₹१,३०,०००

एकूण: ₹४,२७,५००

पुढील तपास सुरू

अटक आरोपींना फैजपूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सैय्यद व विनोद गाभणे करीत आहेत.

पाचोर्यात एका फळविक्रेताचा उष्माघाताने मृत्यू.

पाचोर्यात एका फळविक्रेताचा उष्माघाताने मृत्यू.

पाचोरा प्रतिनिधी

पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील फळ विक्रेता आंनद नथ्थु भोई (32) याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. भर उन्हात काकडी विक्री करणारा आंनद भोई याने दिवसभर डोक्यावर काहीच घेतले नव्हते म्हणून मृत्यू झाला.

यावेळी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात भेट देवुन मयताच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. मयत हा घरातील कर्ता पुरुष होता त्यामुळे शासनाने तातडीने भोई कुटुंबाला मदत करावी अशी मागणी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे. मयतास विधवा आई पत्नी तिन वर्षाची मुलगी आहे.

मंडप सजला… पण टायर फुटल्याने नवरीसह वहिनीचा मृत्यू; पाचोरा तालुक्यात हृदयद्रावक अपघात.!!!

मंडप सजला… पण टायर फुटल्याने नवरीसह वहिनीचा मृत्यू; पाचोरा तालुक्यात हृदयद्रावक अपघात.!!!मंडप सजला… पण टायर फुटल्याने नवरीसह वहिनीचा मृत्यू; पाचोरा तालुक्यात हृदयद्रावक अपघात.!!!

पाचोरा प्रतिनिधी :

लग्नाची धामधूम सुरू असतानाच अचानक घडलेल्या भीषण अपघाताने एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील बांबरुड (महादेव) गावाजवळ कारचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात होणारी नवरी आणि तिच्या वहिनीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परतवाडा येथील शिखा बेलसरे हिचा साखरपुडा 21 एप्रिल रोजी पार पडला होता. 8 मे रोजी तिचा विवाह होणार होता. घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. मंडप उभारण्यात आला होता आणि नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

दरम्यान, लग्नाची पहिली पत्रिका देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी बेलसरे कुटुंब नाशिक येथील सप्तशृंगी गडावर गेले होते. देवदर्शन आटोपून परतत असताना पाचोरा-भडगाव मार्गावरील बांबरुड गावाजवळ त्यांच्या कारचा टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कारचा भीषण अपघात झाला.

या अपघातात शिखा बेलसरे आणि तिची वहिनी मीना मानकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर शुभम बेलसरे आणि सुनील मानकर हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

काही दिवसांवर असलेल्या विवाहामुळे घरात आनंदाचे वातावरण असताना या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या घरातून काही दिवसांत वधूची पाठवणी होणार होती, त्या घरात आता अंत्यविधीची तयारी करण्याची वेळ आल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

या अपघातामुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भडगावमध्ये पोलिसांची धडक मोहीम,अवैध दारू, जुगार अड्ड्यांवर कारवाई ३१ वॉरंट बजावणी २३ वाहतूक कारवाया

भडगावमध्ये पोलिसांची धडक मोहीम,अवैध दारू, जुगार अड्ड्यांवर कारवाई ३१ वॉरंट बजावणी २३ वाहतूक कारवायाभडगावमध्ये पोलिसांची धडक मोहीम,अवैध दारू, जुगार अड्ड्यांवर कारवाई ३१ वॉरंट बजावणी २३ वाहतूक कारवाया

भडगाव प्रतिनिधी :-

जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत भडगाव पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात धडक कारवाई करण्यात आली. सकाळी १०.०० ते रात्री ११.०० वाजेपर्यंत सुरू असलेल्या या मोहिमेत शहरी तसेच ग्रामीण भागात एकाच वेळी विविध ठिकाणी छापे टाकून अवैध धंदे व गुन्हेगारीवर कठोर कारवाई करण्यात आली.

या मोहिमेसाठी पोलीस अधिकारी व अंमलदारांची विशेष पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी अवैध हातभट्टी दारू तयार करणारे व विक्री करणारे, जुगार खेळणारे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे तसेच संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींवर लक्ष केंद्रीत करून कारवाई केली.

कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे :

अवैध दारू/हातभट्टी : ०६ प्रकरणे नोंद; ग्रामीण व शहरी भागात कारवाई

जुगार अड्ड्यांवर छापे : ०४ प्रकरणे

वाहतूक नियमभंग (मोटार वाहन कायदा) : २३ कारवाया; ₹१४,०००/- दंड वसूल

(ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर प्लेट, नो-पार्किंग उल्लंघन)

एम.व्ही. अॅक्ट कलम २८५ : ०२ प्रकरणे; सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा

ड्रंक अँड ड्राईव्ह : ०२ चालकांवर कारवाई

कोप्ता अंतर्गत कारवाई : १० प्रकरणे; ₹२,०००/- दंड

(सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर)

बी.पी. अॅक्ट कलम १२२ : ०२ संशयितांवर कारवाई

बी.पी. अॅक्ट कलम ११२/११७ : ०२ प्रकरणे; शांतता भंग करणाऱ्यांवर कारवाई

NDPS अंतर्गत : ०१ प्रकरण; गांजा सेवन करणाऱ्यावर गुन्हा

हरवलेले (Missing) : ०३ व्यक्तींचा शोध लावण्यात यश

BW/NBW वॉरंट बजावणी : ३१ प्रकरणांमध्ये आरोपी/साक्षीदार शोधून कारवाई

लॉज तपासणी : ०२ ठिकाणी तपासणी

रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी : ०३ जणांची पडताळणी

या मोहिमेदरम्यान पोलिसांनी विविध ठिकाणी अचानक छापे टाकून अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी धास्ती निर्माण केली. विशेषतः हातभट्टी दारू व जुगार अड्ड्यांवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर गतिविधींना मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करत पोलिसांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचा इशारा दिला. तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, मद्यपान करून वाहन चालविणे व शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवरही कारवाई करून कायदा सुव्यवस्थेचा संदेश दिला.

ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

भडगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. प्रदीप एकशिंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.

पोलीस प्रशासनाकडून अशा प्रकारच्या विशेष मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले असून नागरिकांनी कायद्याचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बिर्याणी-कलिंगडामुळे मृत्यू? पायधुनीतील चौघांच्या मृत्यूमागे अन्न विषबाधेचा संशय; पोस्टमार्टेममध्ये किडनी फेल्युअरचे संकेत

बिर्याणी-कलिंगडामुळे मृत्यू? पायधुनीतील चौघांच्या मृत्यूमागे अन्न विषबाधेचा संशय; पोस्टमार्टेममध्ये किडनी फेल्युअरचे संकेत

बिर्याणी-कलिंगडामुळे मृत्यू? पायधुनीतील चौघांच्या मृत्यूमागे अन्न विषबाधेचा संशय; पोस्टमार्टेममध्ये किडनी फेल्युअरचे संकेतबिर्याणी-कलिंगडामुळे मृत्यू? पायधुनीतील चौघांच्या मृत्यूमागे अन्न विषबाधेचा संशय; पोस्टमार्टेममध्ये किडनी फेल्युअरचे संकेत

 

मुंबई, दि. २८ एप्रिल (प्रतिनिधी): मुंबईतील पायधुनी परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेत एका कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सुरुवातीला बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची चर्चा रंगली होती; मात्र पोस्टमार्टेमच्या प्राथमिक अहवालातून या दाव्याला दुजोरा मिळत नसून, अन्न विषबाधेमुळे किडनी निकामी होणे हे संभाव्य कारण असल्याचे संकेत मिळाले आहेत.

मृतांमध्ये अब्दुल्ला दोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन दोकाडिया तसेच मुली आएशा आणि जेनब यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी रात्री कुटुंबातील एकूण नऊ सदस्यांनी सुमारे १०.३० वाजता एकत्र जेवण केले. त्यानंतर नातेवाईक आपापल्या घरी परतले. रात्री उशिरा, सुमारे १ ते १.३० च्या दरम्यान, कुटुंबातील या चौघांनी कलिंगड खाल्ले होते.

यानंतर पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास चौघांची प्रकृती अचानक बिघडली. उलट्या, अस्वस्थता आणि अशक्तपणा अशी लक्षणे दिसू लागल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, कुटुंबातील इतर सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांनी रात्रीच्या जेवणात बिर्याणी खाल्ली होती तसेच उशिरा कलिंगडही खाल्ले होते. यानंतर “बिर्याणी आणि कलिंगड एकत्र खाल्ल्यामुळे विषबाधा झाली का?” असा प्रश्न उपस्थित झाला होता. तथापि, वैद्यकीय तज्ज्ञांनी या दाव्याला कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पोस्टमार्टेमच्या प्राथमिक अहवालात चौघांच्या शरीरात गंभीर अन्न विषबाधेचे परिणाम दिसून आले असून, त्यातून किडनी फेल्युअर झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विषारी द्रव्ये शरीरात गेल्यानंतर किडनीवर ताण येऊन ती निकामी होण्याची प्रक्रिया घडू शकते, असे डॉक्टरांचे मत आहे.

या प्रकरणात नेमके दूषित अन्न कोणते होते, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मृतांच्या अवयवांचे (व्हिसेरा) नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. तसेच हिस्टोपॅथॉलॉजिकल अहवाल आल्यानंतर मृत्यूचे अचूक कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोग्य विभागाने अन्न हाताळताना स्वच्छतेचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः उन्हाळ्यात अन्न पटकन खराब होण्याची शक्यता लक्षात घेऊन, कापलेली फळे दीर्घकाळ उघडी ठेवू नयेत, तसेच उरलेले अन्न योग्य तापमानात साठवावे, असेही सांगण्यात आले आहे.

(पुढील तपास सुरू आहे.)

डोंबिवलीत शब्दसाज साहित्य संस्थेचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साहात

डोंबिवलीत शब्दसाज साहित्य संस्थेचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साहातडोंबिवलीत शब्दसाज साहित्य संस्थेचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साहात

डोंबिवली (गुरुदत्त वाकदेकर): डोंबिवली पूर्व येथे रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी शब्दसाज साहित्य संस्थेतर्फे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साही वातावरणात पार पडले. वृषाली जोशी, मानसी आंब्रे आणि वैभव बटावले यांनी आयोजित केलेल्या या संमेलनात राज्यभरातून अनेक साहित्यिक सहभागी झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सुनीता परब आणि त्यांच्या चमूने सादर केलेल्या स्वरचित स्वागत गीताने झाली. योगिता खानविलकर आणि संगीता कासले यांनी साकारलेल्या सुबक व आकर्षक रांगोळीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ज्येष्ठ साहित्यिक वाणी वेणूमाधव केरकलमट्टी यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध लेखक रमेश पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.

या प्रसंगी काव्यगंध प्रकाशनाच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये ‘शब्दसाज विशेषांक’ (प्रातिनिधिक काव्यसंग्रह), ‘शब्दांकुर’ (विनोद डंबे लिखित काव्यसंग्रह) आणि ‘काव्यामृत’ (रघुनाथ भिसे लिखित काव्यसंग्रह) यांचा समावेश होता. या सोहळ्यात विविध कवींनी सादर केलेल्या कवितांनी सभागृह भारावून गेले.

संमेलनातील विशेष आकर्षण ठरलेले ‘सखाराम बाइंडर’ या विजय तेंडुलकर यांच्या लघुनाटिकेचे काही प्रसंग संतोष जाधव आणि मानसी आंब्रे यांनी प्रभावी अभिनयातून सादर केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अविनाश ढळे, योगिता खानविलकर, प्रियांका कुटे, सुनीता परब, विद्या थोरात, इंदिरा शिंगणे, रघुनाथ भिसे, विनोद डंबे, संगीता कासले आणि संतोष जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्वांना ‘मानाचे शिलेदार’ म्हणून गौरविण्यात आले.

साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल संतोष जाधव, स्मिता शिंदे, जीवा मोरे, विवेक जोशी आणि विकास पाटील यांना ‘साहित्य रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१० फेब्रुवारी २०२६ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शब्दसाज साहित्य संस्थेतर्फे यूट्यूबवर स्वरचित अभिवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सुनीता परब यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर दीपाली साबळे धांडे यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. या दोघींनाही संमेलनात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. शब्दसाज साहित्य संस्थेचे हे तिसरे साहित्य संमेलन साहित्यप्रेमींसाठी प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरले.

अपॅक संस्थेतर्फे फोटोग्राफी व चित्रकला स्पर्धांचे प्रदर्शन उत्साहात पार पडले

अपॅक संस्थेतर्फे फोटोग्राफी व चित्रकला स्पर्धांचे प्रदर्शन उत्साहात पार पडले

अपॅक संस्थेतर्फे फोटोग्राफी व चित्रकला स्पर्धांचे प्रदर्शन उत्साहात पार पडले

अपॅक संस्थेतर्फे फोटोग्राफी व चित्रकला स्पर्धांचे प्रदर्शन उत्साहात पार पडले

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): अपॅक या शैक्षणिक संस्थेतर्फे एकोणीसावी इंटरनॅशनल फोटोफ्राय फोटोग्राफी तसेच आठवी एगाता चित्रकला स्पर्धेचे प्रदर्शन उत्साहात पार पडले. द बॉम्बे आर्ट सोसायटी, वांद्रे पश्चिम, मुंबई येथे २५ आणि २६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित या उपक्रमाला कला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

२५ एप्रिल रोजी प्रमुख पाहुणे म्हणून ख्यातनाम मूर्तिकार किरणजी जहांगीर उपस्थित होत्या. भारतातील एकमेव क्ले पोर्ट्रेट आर्टिस्ट म्हणून ओळख असलेल्या किरणजी जहांगीर यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रख्यात निवेदिका निता माळी यांनी केले. चित्रकला परीक्षक फाइन आर्टिस्ट शार्दूलजी कदम यांनी सहभागींच्या कलाकृतींचे परीक्षण करून विजेत्यांची घोषणा केली.

२६ एप्रिल रोजी प्रमुख पाहुणे म्हणून एबीपी माझा कट्टा येथील प्रज्ञा पोवळे, डेप्युटी प्रोड्युसर व वृत्त निवेदिका, उपस्थित राहिल्या. अपॅकच्या गॅलरीत विजेत्यांची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेतील विजेती रेणुका घोरपडे यांचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे निवेदन कल्पना उबाळे यांनी केले, तसेच प्रमुख पाहुण्यांची मुलाखतही याच ठिकाणी घेण्यात आली.

फोटोग्राफी परीक्षक आणि ख्यातनाम फोटो जर्नालिस्ट मुकेशजी परपियानी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रदर्शनात उपस्थितांना विविध फोटो आणि चित्रकृती पाहण्याची संधी मिळाली. फोटोग्राफी स्पर्धेतील विजेत्यांचा पुरस्कार वितरण सोहळाही पार पडला.

फोटोग्राफी आणि चित्रकला स्पर्धांचे विषय ‘आईस’, ‘ग्लास’ आणि ‘ग्रीनरी’ असे होते. या उपक्रमातून नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळाले आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळाले. या स्पर्धेसाठी आणि या दोन दिवसीय उपक्रमाच्या यशासाठी अपॅकच्या संचालिका अर्चना देशपांडे जोशी यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचे कलाक्षेत्रात कौतुक होत आहे.

भडगाव उपबाजारात शेतमालाचा जाहीर लिलाव सुरू; शेतकऱ्यांना बाजारभावाचा फायदा

भडगाव उपबाजारात शेतमालाचा जाहीर लिलाव सुरू; शेतकऱ्यांना बाजारभावाचा फायदाभडगाव उपबाजारात शेतमालाचा जाहीर लिलाव सुरू; शेतकऱ्यांना बाजारभावाचा फायदा

पाचोरा , दि. २७ (प्रतिनिधी) – पाचोरा-भडगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या भडगाव येथील उपबाजार आवारात रब्बी हंगामातील भुसार शेतमालाच्या जाहीर लिलावास आजपासून प्रारंभ करण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना स्पर्धात्मक दर मिळण्यास मदत होणार असल्याची माहिती सभापती गणेश भिमराव पाटील यांनी दिली.

यंदाच्या रब्बी हंगामात मका, ज्वारी, हरभरा व गहू या पिकांची आवक पाचोरा-भडगाव कार्यक्षेत्रासह परिसरातून मोठ्या प्रमाणात होत आहे. वाढत्या आवकेच्या पार्श्वभूमीवर उपबाजार भडगाव येथे व्यापाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेतमालाच्या विक्री प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, लिलाव व्यवस्थापन, सुविधा व शेतकऱ्यांच्या हिताच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

चर्चेनंतर शेतमालाची विक्री पारदर्शक व स्पर्धात्मक पद्धतीने व्हावी यासाठी जाहीर लिलाव पद्धतीने व्यवहार करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आजपासून उपबाजारात जाहीर लिलाव प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.

बाजार समितीच्या वतीने लिलाव प्रक्रिया अधिक गतिमान करण्यावर भर देण्यात येणार असून, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य व जास्तीत जास्त बाजारभाव मिळावा यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये अचूक वजनमाप, तात्काळ देयक (पेमेंट) व पारदर्शक व्यवहार प्रणाली यांचा समावेश आहे. या सुविधांमुळे भडगाव उपबाजारात शेतमालाची आवक दिवसेंदिवस वाढत असल्याचेही सांगण्यात आले.

दरम्यान, शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीच्या आवारातच आणावा व खाजगी ठिकाणी विक्री टाळावी, असे आवाहन बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. खाजगी व्यवहारांमुळे फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे अधिकृत लिलाव प्रक्रियेलाच प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी उपसभापती प्रकाश अमृत पाटील, संचालक लखीचंद प्रकाश पाटील, सचिव बी.बी. बोरुडे, उपसचिव प्रतिक रमेश ब्राम्हणे, तसेच उपबाजार प्रमुख बलवीरसिंग प्रतापसिंग शिख यांच्यासह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!